पाच राज्यातल्या निवडणूक निकालांमधून आपल्या बदललेल्या राजकीय संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. भारतीय जनता पक्षानं १९९६च्या आणि १९९८च्या निवडणुकांमधे तयार केलेलं एक रसायन आता अधिकाधिक परिपक्व होतंय. या निकालांचे परिणाम काय होतील? भारतीय जनता पक्षाची सत्ता ही प्रस्थापित, प्रचलित आणि विस्तृत होत जाईल तसतसं या पक्षातल्या नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांचं काय करायचं? हा प्रश्न जटिल बनेल.
पाच राज्यातल्या निवडणूक निकालांमधून आपल्या बदललेल्या राजकीय संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. भारतीय जनता पक्षानं १९९६च्या आणि १९९८च्या निवडणुकांमधे तयार केलेलं एक रसायन आता अधिकाधिक परिपक्व होतंय. या निकालांचे परिणाम काय होतील? भारतीय जनता पक्षाची सत्ता ही प्रस्थापित, प्रचलित आणि विस्तृत होत जाईल तसतसं या पक्षातल्या नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांचं काय करायचं? हा प्रश्न जटिल बनेल......
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमधे भाजप सगळ्यात जास्त जागा मिळवणारा पक्ष म्हणून पुढं आलाय. याबरोबरच पंजाब वगळता उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा या चार राज्यांतली भाजपच्या मतांची टक्केवारी ३० ते ४४ टक्क्यांपर्यंत गेलीय. या निवडणूक निकालांचं वैशिष्ट्य म्हणजे उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चारही राज्यांमधे भाजपचं पुन्हा वर्चस्व निर्माण झालंय. केवळ पंजाबमधे सत्तांतर झालंय.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमधे भाजप सगळ्यात जास्त जागा मिळवणारा पक्ष म्हणून पुढं आलाय. याबरोबरच पंजाब वगळता उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा या चार राज्यांतली भाजपच्या मतांची टक्केवारी ३० ते ४४ टक्क्यांपर्यंत गेलीय. या निवडणूक निकालांचं वैशिष्ट्य म्हणजे उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चारही राज्यांमधे भाजपचं पुन्हा वर्चस्व निर्माण झालंय. केवळ पंजाबमधे सत्तांतर झालंय......
अनेक जातींचा प्रभाव असणाऱ्या उत्तर प्रदेशमधे जातीय समीकरणाचा समतोल टिकवणं ही सत्तेत राहण्याची पूर्वअट आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याविषयी राज्यात प्रचंड रोष आहे. संघ-भाजपच्या उच्चस्तरीय नेतृत्वाने सगळ्या आमदारांशी चर्चा केली. त्यातले २५० आमदार आदित्यनाथ विरोधी आहेत असंही म्हटलं जातंय. त्यांना हटवण्याचा निर्णय मात्र भाजपने घेतलेला नाही. आदित्यनाथांचं असलेलं उपद्रव मूल्य आणि निवडणुका तोंडावर असताना भाजप कोणताही धोका घेत नाहीय.
अनेक जातींचा प्रभाव असणाऱ्या उत्तर प्रदेशमधे जातीय समीकरणाचा समतोल टिकवणं ही सत्तेत राहण्याची पूर्वअट आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याविषयी राज्यात प्रचंड रोष आहे. संघ-भाजपच्या उच्चस्तरीय नेतृत्वाने सगळ्या आमदारांशी चर्चा केली. त्यातले २५० आमदार आदित्यनाथ विरोधी आहेत असंही म्हटलं जातंय. त्यांना हटवण्याचा निर्णय मात्र भाजपने घेतलेला नाही. आदित्यनाथांचं असलेलं उपद्रव मूल्य आणि निवडणुका तोंडावर असताना भाजप कोणताही धोका घेत नाहीय......