'पाच फुटाचा बच्चन' या एकपात्री नाट्यप्रयोगानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. एका अतिशय आगळ्यावेगळ्या आणि फारच संवेदनशील विषयावरचा हा एकपात्री नाट्यप्रयोग, कीर्तनासारख्या पारंपरिक कलाप्रकारातून मनोरंजन करता करता, सद्यस्थितीचं वास्तव मांडतोय. स्त्री-पुरुष समतेच्या महत्त्वाच्या मानवी मूल्याला तथाकथित गौरवशाली सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेच्या नावाखाली कसा छेद दिला जातो, हे अनुभवताना प्रेक्षक अंतर्मुख होतो.
'पाच फुटाचा बच्चन' या एकपात्री नाट्यप्रयोगानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. एका अतिशय आगळ्यावेगळ्या आणि फारच संवेदनशील विषयावरचा हा एकपात्री नाट्यप्रयोग, कीर्तनासारख्या पारंपरिक कलाप्रकारातून मनोरंजन करता करता, सद्यस्थितीचं वास्तव मांडतोय. स्त्री-पुरुष समतेच्या महत्त्वाच्या मानवी मूल्याला तथाकथित गौरवशाली सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेच्या नावाखाली कसा छेद दिला जातो, हे अनुभवताना प्रेक्षक अंतर्मुख होतो......
२०२१च्या बुद्धपौर्णिमेनिमित्त डॉ. आलोक जत्राटकर यांच्या आलोकशाही या यूट्युब चॅनलसाठी कोलाजचे संपादक सचिन परब यांनी व्याख्यान दिलं होतं. त्यात बौद्ध, वारकरी आणि आंबेडकरी विचारांमधला ऋणानुबंध मांडला होता. ‘सत्यशोधक प्रतिशब्द’ मासिकाच्या जून २०२१च्या अंकात योगेश सकपाळ यांनी या व्याख्यानाचं केलेलं शब्दांकन या आंबेडकर जयंतीनिमित्त इथं शेअर करत आहोत.
२०२१च्या बुद्धपौर्णिमेनिमित्त डॉ. आलोक जत्राटकर यांच्या आलोकशाही या यूट्युब चॅनलसाठी कोलाजचे संपादक सचिन परब यांनी व्याख्यान दिलं होतं. त्यात बौद्ध, वारकरी आणि आंबेडकरी विचारांमधला ऋणानुबंध मांडला होता. ‘सत्यशोधक प्रतिशब्द’ मासिकाच्या जून २०२१च्या अंकात योगेश सकपाळ यांनी या व्याख्यानाचं केलेलं शब्दांकन या आंबेडकर जयंतीनिमित्त इथं शेअर करत आहोत......
ग्रंथाली प्रकाशनाची 'पिपिलिका मुक्तिधाम' ही आजची एक महत्वाची कादंबरी आहे. मराठीचे प्राध्यापक असलेल्या बाळासाहेब लबडे यांनी ती लिहिलीय. ही कादंबरी वारकरी पंथाची पार्श्वभूमी घेऊन येते. तिचं प्रायोगिक स्वरूप आणि यातले वेगवेगळे प्रयोगही फार महत्वाचे आहेत. मराठी भाषेला वैश्विक दृष्ट्या समृद्ध करणारी कादंबरी म्हणून तिच्याकडे पहावं लागेल.
ग्रंथाली प्रकाशनाची 'पिपिलिका मुक्तिधाम' ही आजची एक महत्वाची कादंबरी आहे. मराठीचे प्राध्यापक असलेल्या बाळासाहेब लबडे यांनी ती लिहिलीय. ही कादंबरी वारकरी पंथाची पार्श्वभूमी घेऊन येते. तिचं प्रायोगिक स्वरूप आणि यातले वेगवेगळे प्रयोगही फार महत्वाचे आहेत. मराठी भाषेला वैश्विक दृष्ट्या समृद्ध करणारी कादंबरी म्हणून तिच्याकडे पहावं लागेल......
आज आषढ वद्द्य तृतीया. म्हणजे संत नामदेवांची पुण्यतिथी. वैदिक परंपरेला विरोध करत, सगळ्यांना साद घालत नामदेवांनी एक प्रकारची संयमित बंडखोरी केली. पंढरपूरपासून पंजाबपर्यंत सर्वत्र एक नवा आचारधर्म दिला. हे करताना त्यांनाही त्यांच्या काळात त्रास, अपमान आणि अवहेलनेला सामोरं जावं लागलं. तरीही या थोर राष्ट्रीय संताचा प्रभाव गेली साडेसातशे वर्षे भारतावर अखंडितपणे वाढतोय.
आज आषढ वद्द्य तृतीया. म्हणजे संत नामदेवांची पुण्यतिथी. वैदिक परंपरेला विरोध करत, सगळ्यांना साद घालत नामदेवांनी एक प्रकारची संयमित बंडखोरी केली. पंढरपूरपासून पंजाबपर्यंत सर्वत्र एक नवा आचारधर्म दिला. हे करताना त्यांनाही त्यांच्या काळात त्रास, अपमान आणि अवहेलनेला सामोरं जावं लागलं. तरीही या थोर राष्ट्रीय संताचा प्रभाव गेली साडेसातशे वर्षे भारतावर अखंडितपणे वाढतोय......
गाडगेबाबांचं चरित्र, विचार आणि कार्य यांचा आजच्या संदर्भात परिचय करून देणारं संतोष अरसोड यांचं एक नवं पुस्तक आलंय. 'प्रबोधन पंढरीचा क्रांतीकारी संत गाडगेबाबा' असं या पुस्तकाचं नाव आहे. पुण्याच्या मनोविकास प्रकाशनानं ते प्रकाशित केलंय. आजचा महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल तर गाडगेबाबांशिवाय आणि गाडगेबाबा समजून घ्यायचे असतील तर या पुस्तकाशिवाय पर्याय नाही.
गाडगेबाबांचं चरित्र, विचार आणि कार्य यांचा आजच्या संदर्भात परिचय करून देणारं संतोष अरसोड यांचं एक नवं पुस्तक आलंय. 'प्रबोधन पंढरीचा क्रांतीकारी संत गाडगेबाबा' असं या पुस्तकाचं नाव आहे. पुण्याच्या मनोविकास प्रकाशनानं ते प्रकाशित केलंय. आजचा महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल तर गाडगेबाबांशिवाय आणि गाडगेबाबा समजून घ्यायचे असतील तर या पुस्तकाशिवाय पर्याय नाही......
आज २४ जून. संत कबीर यांची जयंती. वारकरी परंपरा तर कबिरांना वारकरीच मानते. धर्माच्या पलीकडे जाऊन धर्माचं मर्म शोधण्याची महाराष्ट्रीय परंपरा आहे. त्याचा कबीर अविभाज्य भाग आहेत. त्यासाठीच पुन्हा एकदा कबिरांच्या विचारांची पालखी घेऊन वाराणसीहून पंढरपूरला यावं लागणार आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात कबिरांचा अभीर पुन्हा एकदा कोलसवावा लागणार आहे.
आज २४ जून. संत कबीर यांची जयंती. वारकरी परंपरा तर कबिरांना वारकरीच मानते. धर्माच्या पलीकडे जाऊन धर्माचं मर्म शोधण्याची महाराष्ट्रीय परंपरा आहे. त्याचा कबीर अविभाज्य भाग आहेत. त्यासाठीच पुन्हा एकदा कबिरांच्या विचारांची पालखी घेऊन वाराणसीहून पंढरपूरला यावं लागणार आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात कबिरांचा अभीर पुन्हा एकदा कोलसवावा लागणार आहे......
आज संत तुकामांची जयंती. देशाच्या संतपरंपरतेले ते अतिशय महत्त्वाचे संत. वारकरी संप्रदायात विठ्ठल या देवतेबरोबरच संतांची मंदिरही उभारण्याची परंपरा आहे. त्यामुळे कीर्तनकार प्राचार्य परशुराम मराडे यांनी बीड जिल्हात तुकोबारायांचं अतिशय देखणं मंदिर उभारलंय. या मंदिरासोबत स्थापन केलेल्या सेवापीठातून अनेक उपक्रमही आयोजित केले जातात.
आज संत तुकामांची जयंती. देशाच्या संतपरंपरतेले ते अतिशय महत्त्वाचे संत. वारकरी संप्रदायात विठ्ठल या देवतेबरोबरच संतांची मंदिरही उभारण्याची परंपरा आहे. त्यामुळे कीर्तनकार प्राचार्य परशुराम मराडे यांनी बीड जिल्हात तुकोबारायांचं अतिशय देखणं मंदिर उभारलंय. या मंदिरासोबत स्थापन केलेल्या सेवापीठातून अनेक उपक्रमही आयोजित केले जातात......
आज मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी. आजच्याच तिथीला संत सोपानदेवांनी पुण्याजवळ सासवड इथे समाधी घेतली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या चार भावंडांमधे सोपानदेवांचं चरित्र आणि कर्तृत्व दुर्लक्षितच राहिलं. तरीही वार्षिक `रिंगण`ने २०२०च्या आषाढी एकादशीला संत सोपानदेव विशेषांक प्रकाशित केलाय. त्याच्या संपादकांनी लिहिलेला अंकातला हा लेख.
आज मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी. आजच्याच तिथीला संत सोपानदेवांनी पुण्याजवळ सासवड इथे समाधी घेतली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या चार भावंडांमधे सोपानदेवांचं चरित्र आणि कर्तृत्व दुर्लक्षितच राहिलं. तरीही वार्षिक `रिंगण`ने २०२०च्या आषाढी एकादशीला संत सोपानदेव विशेषांक प्रकाशित केलाय. त्याच्या संपादकांनी लिहिलेला अंकातला हा लेख. .....
कैकाडी महाराजांचे पुतणे शिवराज ऊर्फ रामदास महाराज जाधव यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातल्या 'बडवे हटाव' मोहिमेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. शेवटपर्यंत त्यांनी असंख्य लोकांना प्रेम, हिंमत दिली. त्यामुळेच कीर्तनकार, प्रवचनकार, मठाधिपती असूनही त्यांनी 'योद्धा' ही ओळख अखेर सार्थ केलीच !
कैकाडी महाराजांचे पुतणे शिवराज ऊर्फ रामदास महाराज जाधव यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातल्या 'बडवे हटाव' मोहिमेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. शेवटपर्यंत त्यांनी असंख्य लोकांना प्रेम, हिंमत दिली. त्यामुळेच कीर्तनकार, प्रवचनकार, मठाधिपती असूनही त्यांनी 'योद्धा' ही ओळख अखेर सार्थ केलीच !.....
कित्येक वर्षांपासून नियमित सुरू असणारी वारी कोविड -१९ या महामारीमुळे यंदा नाही. वारी ही महाराष्ट्राच्या सामुदायिक एकात्मतेचे प्रतीक आहे. महाराष्ट्राच्या मनावर वारीचा अमीट संस्कार आहे. वारीची सांस्कृतिक वैशिष्ट्ये विशद करणारा डॉ. अजय देशपांडे यांचा लेख.
कित्येक वर्षांपासून नियमित सुरू असणारी वारी कोविड -१९ या महामारीमुळे यंदा नाही. वारी ही महाराष्ट्राच्या सामुदायिक एकात्मतेचे प्रतीक आहे. महाराष्ट्राच्या मनावर वारीचा अमीट संस्कार आहे. वारीची सांस्कृतिक वैशिष्ट्ये विशद करणारा डॉ. अजय देशपांडे यांचा लेख......
भागवत संप्रदायाचे दुसरे नाव वारकरी संप्रदाय. नामदेवांनी स्वतःला वीर वारीकर म्हटले. ज्ञानोबांनीही आपल्या अभंगात वारीकर शब्द योजला आहे. म्हणजे वारी हे या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. संत नामदेव-ज्ञानदेवांच्या पूर्वीपासून आषाढी-कार्तिकी वारीचा सोहळा चालू आहे. परंतु या वारीला दिंडी पताका घेऊन येणाऱ्या वारकऱ्यांचे सुसंघटित रूप दिले नामदेवादी संतांनीच.
भागवत संप्रदायाचे दुसरे नाव वारकरी संप्रदाय. नामदेवांनी स्वतःला वीर वारीकर म्हटले. ज्ञानोबांनीही आपल्या अभंगात वारीकर शब्द योजला आहे. म्हणजे वारी हे या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. संत नामदेव-ज्ञानदेवांच्या पूर्वीपासून आषाढी-कार्तिकी वारीचा सोहळा चालू आहे. परंतु या वारीला दिंडी पताका घेऊन येणाऱ्या वारकऱ्यांचे सुसंघटित रूप दिले नामदेवादी संतांनीच......
शारीरिक अंतर पाळून चैत्र वारी सहभागी होत वारकऱ्यांनी महिनाभराआधीच एक आदर्श घालून दिला होता. आता आषाढी वारीकरता कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सरकारनं मध्यम मार्ग काढलाय. आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपुरात हवाई मार्गे नेण्याचा निर्णय घेऊन त्यांनी विवेकनिष्ठ वारकरी धर्माची भगवी पताका गगनावरी नेली आहे. याची इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद होईल.
शारीरिक अंतर पाळून चैत्र वारी सहभागी होत वारकऱ्यांनी महिनाभराआधीच एक आदर्श घालून दिला होता. आता आषाढी वारीकरता कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सरकारनं मध्यम मार्ग काढलाय. आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपुरात हवाई मार्गे नेण्याचा निर्णय घेऊन त्यांनी विवेकनिष्ठ वारकरी धर्माची भगवी पताका गगनावरी नेली आहे. याची इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद होईल......
कीर्तनकार निवृत्तीबाबा वक्ते हे सध्या शरद पवारांविरोधात काढलेल्या पत्रकामुळे वादात सापडलेत. पण वादग्रस्त विधानं आणि कृती करण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही. त्यांची कीर्तनं माणसामाणसात द्वेष पसरवणारी असतात. सहिष्णू असलेल्या वारकरी संप्रदायावर प्रतिगामी, सनातनी विचारांची मंडळी कब्जा करण्याचा प्रयत्न करताहेत. अशा मंडळींचे निवृत्तीबाबा वक्ते हे प्रतिनिधी आहेत.
कीर्तनकार निवृत्तीबाबा वक्ते हे सध्या शरद पवारांविरोधात काढलेल्या पत्रकामुळे वादात सापडलेत. पण वादग्रस्त विधानं आणि कृती करण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही. त्यांची कीर्तनं माणसामाणसात द्वेष पसरवणारी असतात. सहिष्णू असलेल्या वारकरी संप्रदायावर प्रतिगामी, सनातनी विचारांची मंडळी कब्जा करण्याचा प्रयत्न करताहेत. अशा मंडळींचे निवृत्तीबाबा वक्ते हे प्रतिनिधी आहेत......
‘ब्राह्मणी अरेरावीपणा आणि मुसलमानी धर्मवेडेपणा या दोन्हीला आव्हान देण्याची नामदेवाची पद्धत अतिशय सूक्ष्म आणि नम्र, क्षमायाचक पण प्रतिस्पर्ध्याला जिंकून घेणारी अशी होती,’ अशा शब्दांत ज्येष्ठ भाष्यकार भालचंद्र नेमाडे यांनी नामदेवांच्या बंडखोरीचं वर्णन केलं. नामदेवांच्या मोठेपणाची नेमाडे यांनी केलेली ही मीमांसा.
‘ब्राह्मणी अरेरावीपणा आणि मुसलमानी धर्मवेडेपणा या दोन्हीला आव्हान देण्याची नामदेवाची पद्धत अतिशय सूक्ष्म आणि नम्र, क्षमायाचक पण प्रतिस्पर्ध्याला जिंकून घेणारी अशी होती,’ अशा शब्दांत ज्येष्ठ भाष्यकार भालचंद्र नेमाडे यांनी नामदेवांच्या बंडखोरीचं वर्णन केलं. नामदेवांच्या मोठेपणाची नेमाडे यांनी केलेली ही मीमांसा......
वारीच्या सोहळ्याचा मूलभूत संदेश प्रेम, भक्ती, शांती आणि मानवतेची समानता हा असतो. म्हणून आचार विचार आणि उच्चार यातली शुद्धता, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा यांच प्रतीक म्हणून वारकऱ्यांकडे बघितलं जातं. वारकरी संप्रदायात जात, धर्म आणि भेदाभेद मानले जात नाहीत. वारकरी संप्रदायाचं हे वर्तन आध्यात्मिकतेच्या अंगानं जाणारं आहे. आषाढी एकादशी निमित्त हा 'वारी' विशेष लेख.
वारीच्या सोहळ्याचा मूलभूत संदेश प्रेम, भक्ती, शांती आणि मानवतेची समानता हा असतो. म्हणून आचार विचार आणि उच्चार यातली शुद्धता, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा यांच प्रतीक म्हणून वारकऱ्यांकडे बघितलं जातं. वारकरी संप्रदायात जात, धर्म आणि भेदाभेद मानले जात नाहीत. वारकरी संप्रदायाचं हे वर्तन आध्यात्मिकतेच्या अंगानं जाणारं आहे. आषाढी एकादशी निमित्त हा 'वारी' विशेष लेख......
मानवी जीवनातलं परमात्मसुख सामूहिकरीत्या लुटण्याचा आणि वाटण्याचा, शेअर करण्याचा मार्ग म्हणजे वारी. वारी हा मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन आहे. पंढरपूरला जायचं ते एकट्याने नाही आणि गूपचूपही नाही. एकत्रितपणे, गात, नाचत, खेळत. अशाप्रकारे गात नाचत पंढरीची वारी करणं म्हणजे ईश्वरी प्रेमाचे अधिकारी आणि वाटेकरी होणं. वारीचं वैशिष्ट्य सांगणारा हा लेख.
मानवी जीवनातलं परमात्मसुख सामूहिकरीत्या लुटण्याचा आणि वाटण्याचा, शेअर करण्याचा मार्ग म्हणजे वारी. वारी हा मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन आहे. पंढरपूरला जायचं ते एकट्याने नाही आणि गूपचूपही नाही. एकत्रितपणे, गात, नाचत, खेळत. अशाप्रकारे गात नाचत पंढरीची वारी करणं म्हणजे ईश्वरी प्रेमाचे अधिकारी आणि वाटेकरी होणं. वारीचं वैशिष्ट्य सांगणारा हा लेख......
आज चैत्र वद्य त्रयोदशी. महाराष्ट्राला घडवणाऱ्या संत गोरा कुंभारांची आज परंपरेनुसार पुण्यतिथी. महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणाऱ्या रिंगण या वार्षिकाने २०१८ला संत गोरा कुंभार विशेषांक काढला होता. त्याचे संपादक सचिन परब यांनी गोरा कुंभारांचं नेहमीची चाकोरी सोडून गोरा कुंभारांची थोरवी शोधण्याचा प्रयत्न केलाय.
आज चैत्र वद्य त्रयोदशी. महाराष्ट्राला घडवणाऱ्या संत गोरा कुंभारांची आज परंपरेनुसार पुण्यतिथी. महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणाऱ्या रिंगण या वार्षिकाने २०१८ला संत गोरा कुंभार विशेषांक काढला होता. त्याचे संपादक सचिन परब यांनी गोरा कुंभारांचं नेहमीची चाकोरी सोडून गोरा कुंभारांची थोरवी शोधण्याचा प्रयत्न केलाय......