युक्रेनमधलं युद्ध संपताना दिसत नाही. एकीकडे रशिया आणि दुसरीकडे अमेरिकेच्या पाठिंब्यानं युक्रेन असं स्वरूप असलेलं हे युद्ध दोन महासत्त्तांमधला संघर्ष ठरलाय. त्यात चीन आणि रशिया एकत्र आहेत. या पार्श्वभूमीवर नुकत्याच युक्रेनच्या परराष्ट्र उपमंत्री एमिन झापारोवा भारतात मदत मागायला आल्या होत्या. त्यामुळे आजवर अलिप्त राहिलेल्या भारताची अडचण आता वाढताना दिसतेय.
युक्रेनमधलं युद्ध संपताना दिसत नाही. एकीकडे रशिया आणि दुसरीकडे अमेरिकेच्या पाठिंब्यानं युक्रेन असं स्वरूप असलेलं हे युद्ध दोन महासत्त्तांमधला संघर्ष ठरलाय. त्यात चीन आणि रशिया एकत्र आहेत. या पार्श्वभूमीवर नुकत्याच युक्रेनच्या परराष्ट्र उपमंत्री एमिन झापारोवा भारतात मदत मागायला आल्या होत्या. त्यामुळे आजवर अलिप्त राहिलेल्या भारताची अडचण आता वाढताना दिसतेय......
शीत-युद्धकालीन राजकारणाच्या मुशीतून तयार झालेल्या जो बायडेन यांनी अमेरिकी धुर्तपणाच्या आणि सामर्थ्याच्या बळावर जगाला पुन्हा एकदा शीतयुद्धाच्या उंबरठ्यावर आणून सोडलंय. अमेरिकेच्या या उद्दिष्टांची दखल रशिया आणि चीन या दोन्ही देशांनी घेतली आहे. बायडेन यांच्या युक्रेन आणि पोलंड भेटीच्याच दिवशी पुतीन यांनी केलेल्या भाषणात रशियाच्या धोरणाचा रोख स्पष्ट केलाय.
शीत-युद्धकालीन राजकारणाच्या मुशीतून तयार झालेल्या जो बायडेन यांनी अमेरिकी धुर्तपणाच्या आणि सामर्थ्याच्या बळावर जगाला पुन्हा एकदा शीतयुद्धाच्या उंबरठ्यावर आणून सोडलंय. अमेरिकेच्या या उद्दिष्टांची दखल रशिया आणि चीन या दोन्ही देशांनी घेतली आहे. बायडेन यांच्या युक्रेन आणि पोलंड भेटीच्याच दिवशी पुतीन यांनी केलेल्या भाषणात रशियाच्या धोरणाचा रोख स्पष्ट केलाय......
कोरोनातून सावरण्याचा प्रयत्न करत असताना गेल्यावर्षी जगाला रशिया-युक्रेन युद्धानं एका नव्या संकटाच्या खाईत लोटलं. वर्षभरात लाखो जणांचा बळी जाऊनही युक्रेनच्या अवघ्या १८ टक्के भूभागावरच रशियाला कब्जा मिळवता आला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला या युद्धामुळे बसलेला फटका ३२ लाख कोटींहून अधिक आहे. इतकं नुकसान होऊनही हे युद्ध कधी संपेल, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
कोरोनातून सावरण्याचा प्रयत्न करत असताना गेल्यावर्षी जगाला रशिया-युक्रेन युद्धानं एका नव्या संकटाच्या खाईत लोटलं. वर्षभरात लाखो जणांचा बळी जाऊनही युक्रेनच्या अवघ्या १८ टक्के भूभागावरच रशियाला कब्जा मिळवता आला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला या युद्धामुळे बसलेला फटका ३२ लाख कोटींहून अधिक आहे. इतकं नुकसान होऊनही हे युद्ध कधी संपेल, हा प्रश्न अनुत्तरीत आहे......
रशियाच्या कच्च्या तेलासाठी ६० डॉलर प्रति बॅरल इतकी किंमत 'जी ७' संघटना आणि युरोपियन युनियननं निश्चित केलीय. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसारखे देश रशियाच्या आर्थिक नाड्या आवळण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळेच 'प्राईस कॅपिंग'चा डाव टाकला गेलाय. त्याला रशियाने आव्हान देत या देशांचा तेल पुरवठा रोखण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे हे तेलयुद्ध भडकण्याची चिन्ह आहेत.
रशियाच्या कच्च्या तेलासाठी ६० डॉलर प्रति बॅरल इतकी किंमत 'जी ७' संघटना आणि युरोपियन युनियननं निश्चित केलीय. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसारखे देश रशियाच्या आर्थिक नाड्या आवळण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळेच 'प्राईस कॅपिंग'चा डाव टाकला गेलाय. त्याला रशियाने आव्हान देत या देशांचा तेल पुरवठा रोखण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे हे तेलयुद्ध भडकण्याची चिन्ह आहेत......
रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोएगू यांनी युक्रेन 'डर्टी बॉम्ब' तयार करत असल्याचा दावा केलाय. तशी तक्रारच त्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे केलीय. 'डर्टी बॉम्ब' हा काही हलक्यात घेण्यासारखा विषय नाहीय. हा बॉम्ब अणुबॉम्ब इतकाच घातक समजला जातो. त्यातून मोठा विध्वंसही होऊ शकतो. त्यामुळेच तिथल्या भारतीय दूतावासानं भारतीय नागरिकांना युक्रेन सोडायचा आदेश दिलाय.
रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोएगू यांनी युक्रेन 'डर्टी बॉम्ब' तयार करत असल्याचा दावा केलाय. तशी तक्रारच त्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे केलीय. 'डर्टी बॉम्ब' हा काही हलक्यात घेण्यासारखा विषय नाहीय. हा बॉम्ब अणुबॉम्ब इतकाच घातक समजला जातो. त्यातून मोठा विध्वंसही होऊ शकतो. त्यामुळेच तिथल्या भारतीय दूतावासानं भारतीय नागरिकांना युक्रेन सोडायचा आदेश दिलाय......
रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध गेले सहा महिने सुरू आहे. वेगवेगळ्या आघाड्यांवर युक्रेनला नामोहरम करायचा प्रयत्न रशिया करतोय. पण त्याला जशास तसं उत्तर देण्याचं युक्रेननं ठरवलंय. त्याचाच एक भाग म्हणून युक्रेननं 'आर्मी ऑफ ड्रोन' नावाचा उपक्रम सुरू केलाय. ड्रोनसाठी जगभरातल्या देशांना आवाहन केलं जातंय. युक्रेनियन सैन्याचा जीव वाचावा आणि रशियाला टक्कर देता यावी हा त्यामागचा उद्देश आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध गेले सहा महिने सुरू आहे. वेगवेगळ्या आघाड्यांवर युक्रेनला नामोहरम करायचा प्रयत्न रशिया करतोय. पण त्याला जशास तसं उत्तर देण्याचं युक्रेननं ठरवलंय. त्याचाच एक भाग म्हणून युक्रेननं 'आर्मी ऑफ ड्रोन' नावाचा उपक्रम सुरू केलाय. ड्रोनसाठी जगभरातल्या देशांना आवाहन केलं जातंय. युक्रेनियन सैन्याचा जीव वाचावा आणि रशियाला टक्कर देता यावी हा त्यामागचा उद्देश आहे......
भारतातल्या खाद्यतेलाचा वापर दरवर्षी २२५ दशलक्ष टन इतका आहे. त्यात आठ दशलक्ष टन पामतेलाचा समावेश आहे. खाण्यापासून ते साबण, बिस्किटं, टूथपेस्ट, शॅम्पू या दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंच्या निर्मितीमधे पामतेलाचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत पामतेलाचं संकट गडद झाल्यामुळे खाद्यतेलाव्यतिरिक्त इतर वस्तूही महागल्या आहेत.
भारतातल्या खाद्यतेलाचा वापर दरवर्षी २२५ दशलक्ष टन इतका आहे. त्यात आठ दशलक्ष टन पामतेलाचा समावेश आहे. खाण्यापासून ते साबण, बिस्किटं, टूथपेस्ट, शॅम्पू या दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंच्या निर्मितीमधे पामतेलाचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत पामतेलाचं संकट गडद झाल्यामुळे खाद्यतेलाव्यतिरिक्त इतर वस्तूही महागल्या आहेत......
‘सेव द चिल्ड्रन’च्या अहवालानुसार, युक्रेनमधे ८० हजार मुलं अजूनही मातेच्या पोटात आहेत. त्यांना अजून जन्म घ्यायचाय. युद्धाच्या परिस्थितीत या मातांना प्रसूतीच्या सुविधा कशा पुरवल्या जाणार? हॉस्पिटल कोलमडून पडलेले असताना, औषधांचा आणि इतर सुविधांचा दुष्काळ असताना हे सर्व कसं काय होणार? युनिसेफ आणि संयुक्त राष्ट्रांनी तोंड बंद का ठेवलंय?
‘सेव द चिल्ड्रन’च्या अहवालानुसार, युक्रेनमधे ८० हजार मुलं अजूनही मातेच्या पोटात आहेत. त्यांना अजून जन्म घ्यायचाय. युद्धाच्या परिस्थितीत या मातांना प्रसूतीच्या सुविधा कशा पुरवल्या जाणार? हॉस्पिटल कोलमडून पडलेले असताना, औषधांचा आणि इतर सुविधांचा दुष्काळ असताना हे सर्व कसं काय होणार? युनिसेफ आणि संयुक्त राष्ट्रांनी तोंड बंद का ठेवलंय?.....
युक्रेन आणि रशिया युद्धाला जवळपास ५ आठवडे होतायत. युक्रेनच्या खेरसन, खार्कोव आणि मेलिटोपोल या शहरांवर ताबा मिळवल्यावर रशियन सरकारने आता मारियूपोलकडे आपला मोर्चा वळवलाय. युक्रेनच्या दक्षिण पूर्व भागात असणारं हे मुख्य बंदराचं शहर रशियन बॉम्ब हल्ल्यांमुळे हादरलंय. ते लवकर ताब्यात यावं म्हणून पुतीन वेगवेगळे डावपेच खेळतायत.
युक्रेन आणि रशिया युद्धाला जवळपास ५ आठवडे होतायत. युक्रेनच्या खेरसन, खार्कोव आणि मेलिटोपोल या शहरांवर ताबा मिळवल्यावर रशियन सरकारने आता मारियूपोलकडे आपला मोर्चा वळवलाय. युक्रेनच्या दक्षिण पूर्व भागात असणारं हे मुख्य बंदराचं शहर रशियन बॉम्ब हल्ल्यांमुळे हादरलंय. ते लवकर ताब्यात यावं म्हणून पुतीन वेगवेगळे डावपेच खेळतायत......
लोकांची मतं, विचार, आवडीनिवडी, वागणं हे सगळं नीट नियंत्रित करणं आणि त्यातून त्यांना अपेक्षित असा सामाजिक-राजकीय प्राणी बनवणं यासाठी केला जाणारा प्रचार म्हणजे प्रोपगंडा. युद्धप्रसंगी हा प्रोपगंडा कसा केला जातो, त्यात कोणती तंत्रं वापरली जातात, प्रोपगंडा निष्प्रभ करण्यासाठी काय केलं जातं, हे पाहण्याची एक संधी रशिया-युक्रेन युद्धाने आपल्यासमोर ठेवलीय.
लोकांची मतं, विचार, आवडीनिवडी, वागणं हे सगळं नीट नियंत्रित करणं आणि त्यातून त्यांना अपेक्षित असा सामाजिक-राजकीय प्राणी बनवणं यासाठी केला जाणारा प्रचार म्हणजे प्रोपगंडा. युद्धप्रसंगी हा प्रोपगंडा कसा केला जातो, त्यात कोणती तंत्रं वापरली जातात, प्रोपगंडा निष्प्रभ करण्यासाठी काय केलं जातं, हे पाहण्याची एक संधी रशिया-युक्रेन युद्धाने आपल्यासमोर ठेवलीय......
युक्रेनमधे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने 'ऑपरेशन गंगा' सुरू केलं. युद्धजन्य काळात परदेशातल्या भारतीयांना बाहेर काढून एअरलिफ्टिंग करणं पहिल्यांदाच घडलं नाही. याआधीही अशा मोहिमा भारताने यशस्वी केल्यात. पण ५ राज्यांच्या निवडणुकांमुळे 'ऑपरेशन गंगा' चर्चेत ठेवलं गेलं.
युक्रेनमधे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने 'ऑपरेशन गंगा' सुरू केलं. युद्धजन्य काळात परदेशातल्या भारतीयांना बाहेर काढून एअरलिफ्टिंग करणं पहिल्यांदाच घडलं नाही. याआधीही अशा मोहिमा भारताने यशस्वी केल्यात. पण ५ राज्यांच्या निवडणुकांमुळे 'ऑपरेशन गंगा' चर्चेत ठेवलं गेलं......
रशिया आणि युक्रेनमधे सुरु असलेल्या युद्धाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. महासत्ता बनण्याचं स्वप्न उराशी बाळगत सामर्थ्यवान देशांनी कमकुवत देशांवर आक्रमण करण्याची ही पहिलीच वेळ नाही. राष्ट्रीय वर्चस्ववादातून बलाढ्य राष्ट्रांनी केलेल्या जुन्या सैनिकी कारवायांचा इतिहास मांडणारा ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र गुहा यांचा साधना साप्ताहिकातला लेख.
रशिया आणि युक्रेनमधे सुरु असलेल्या युद्धाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. महासत्ता बनण्याचं स्वप्न उराशी बाळगत सामर्थ्यवान देशांनी कमकुवत देशांवर आक्रमण करण्याची ही पहिलीच वेळ नाही. राष्ट्रीय वर्चस्ववादातून बलाढ्य राष्ट्रांनी केलेल्या जुन्या सैनिकी कारवायांचा इतिहास मांडणारा ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र गुहा यांचा साधना साप्ताहिकातला लेख......
सध्या रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. रशिया आणि अमेरिका संबंधांमुळे भारत सावध पवित्र्यात आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांनी 'द वायर'ला भारताचे माजी परराष्ट्र सचिव श्याम सरन यांचा इंटरव्यू घेतलाय. त्यात सरन यांनी भारत हा रशिया, चीन आणि अमेरिकेच्या कचाट्यात सापडून एकटा पडण्याची भीती व्यक्त केलीय.
सध्या रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. रशिया आणि अमेरिका संबंधांमुळे भारत सावध पवित्र्यात आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांनी 'द वायर'ला भारताचे माजी परराष्ट्र सचिव श्याम सरन यांचा इंटरव्यू घेतलाय. त्यात सरन यांनी भारत हा रशिया, चीन आणि अमेरिकेच्या कचाट्यात सापडून एकटा पडण्याची भीती व्यक्त केलीय......
भारताच्या पुष्पाचं 'मैं झुकेगा नहीं' हे वर्जन युक्रेनमधे पहायला मिळतंय. युक्रेनचे ४४ वर्षांचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियाचे शक्तिशाली नेते व्लादिमीर पुतीन यांना आव्हान दिलंय. त्यासाठी स्वतः झेलेन्स्की रणभूमीवर उतरलेत. एक कॉमेडीयन ते थेट रशियाला भिडणारा राष्ट्राध्यक्ष हा त्यांचा प्रवास म्हणूनच फार इंटरेस्टिंग आहे.
भारताच्या पुष्पाचं 'मैं झुकेगा नहीं' हे वर्जन युक्रेनमधे पहायला मिळतंय. युक्रेनचे ४४ वर्षांचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियाचे शक्तिशाली नेते व्लादिमीर पुतीन यांना आव्हान दिलंय. त्यासाठी स्वतः झेलेन्स्की रणभूमीवर उतरलेत. एक कॉमेडीयन ते थेट रशियाला भिडणारा राष्ट्राध्यक्ष हा त्यांचा प्रवास म्हणूनच फार इंटरेस्टिंग आहे......
रशिया आणि युक्रेन यांच्यातला वाद दिवसेंदिवस चिघळत चाललाय. या वादात मध्यस्थी करायचं की मौनव्रत पाळायचं हा भारतासमोर मोठा पेच आहे. याच संदर्भाने आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक रोहन चौधरी यांनी भारताच्या भूमिकेवर आपलं मत व्यक्त केलंय. पुढारी ऑनलाईनवर त्यांनी केलेल्या विश्लेषणाचं हे शब्दांकन.
रशिया आणि युक्रेन यांच्यातला वाद दिवसेंदिवस चिघळत चाललाय. या वादात मध्यस्थी करायचं की मौनव्रत पाळायचं हा भारतासमोर मोठा पेच आहे. याच संदर्भाने आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक रोहन चौधरी यांनी भारताच्या भूमिकेवर आपलं मत व्यक्त केलंय. पुढारी ऑनलाईनवर त्यांनी केलेल्या विश्लेषणाचं हे शब्दांकन......
रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे कच्च्या तेलाचा भडका उडालाय. त्याचा परिणाम थेट पेट्रोल, डिझेलच्या किंमतींवर होतोय. अशावेळी कचऱ्यातून पेट्रोल, डिझेल बनवणाऱ्या आफ्रिकेतल्या झांबिया देशाची फार चर्चा होतेय. देशातल्या एका कंपनीनं पेट्रोलियम पदार्थांमधे झांबियाला स्वयंपूर्ण बनवायचा चंग बांधलाय. त्यामुळे जगही या प्रोजेक्टकडे आशेनं पाहतंय.
रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे कच्च्या तेलाचा भडका उडालाय. त्याचा परिणाम थेट पेट्रोल, डिझेलच्या किंमतींवर होतोय. अशावेळी कचऱ्यातून पेट्रोल, डिझेल बनवणाऱ्या आफ्रिकेतल्या झांबिया देशाची फार चर्चा होतेय. देशातल्या एका कंपनीनं पेट्रोलियम पदार्थांमधे झांबियाला स्वयंपूर्ण बनवायचा चंग बांधलाय. त्यामुळे जगही या प्रोजेक्टकडे आशेनं पाहतंय......
रशिया आणि युक्रेन यांच्यात संघर्षाची ठिणगी पेटते त्यावेळी नॉर्ड स्ट्रीम २ ही गॅस पाईपलाईन चर्चेत येते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. रशियन गॅस बाल्टिक समुद्रातून थेट जर्मनीपर्यंत पोचण्यासाठी ही पाईपलाईन बनवण्यात आलीय. पण अमेरिकेसोबत युरोपातले अनेक देश आधीपासून या पाईपलाईनला विरोध करतायत. यावेळेस विरोध करण्यासाठी त्यांना आयतं कोलीत मिळालंय.
रशिया आणि युक्रेन यांच्यात संघर्षाची ठिणगी पेटते त्यावेळी नॉर्ड स्ट्रीम २ ही गॅस पाईपलाईन चर्चेत येते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. रशियन गॅस बाल्टिक समुद्रातून थेट जर्मनीपर्यंत पोचण्यासाठी ही पाईपलाईन बनवण्यात आलीय. पण अमेरिकेसोबत युरोपातले अनेक देश आधीपासून या पाईपलाईनला विरोध करतायत. यावेळेस विरोध करण्यासाठी त्यांना आयतं कोलीत मिळालंय......