महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. बाळासाहेब ठाकरेंनंतर उपहासाच्या, उपरोधाच्या, दुर्लक्षाच्या, कोंडी करणार्या सर्व लाटांना समर्थपणे तोंड देत त्यांनी संघटनेवर पकड बसवली. कोरोनासारख्या अनेक संकटांचा सामना करत ते महाविकास आघाडीचं सरकार चालवतायत. याकाळात संकटमोचक, कुटुंबप्रमुख म्हणून त्यांचा प्रवास नेमका कसाय ते सांगतायत शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. बाळासाहेब ठाकरेंनंतर उपहासाच्या, उपरोधाच्या, दुर्लक्षाच्या, कोंडी करणार्या सर्व लाटांना समर्थपणे तोंड देत त्यांनी संघटनेवर पकड बसवली. कोरोनासारख्या अनेक संकटांचा सामना करत ते महाविकास आघाडीचं सरकार चालवतायत. याकाळात संकटमोचक, कुटुंबप्रमुख म्हणून त्यांचा प्रवास नेमका कसाय ते सांगतायत शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत......
रश्मी उद्धव ठाकरे सामनाच्या संपादक बनल्या आणि नव्याने चर्चेत आल्या. हे पद रूढार्थाने राजकीय नाही आणि तसं पाहिल्यास आहेही. तसंच रश्मी यांचंही आहे. त्या राजकारणात आहेत आणि नाहीतही. मध्यमवर्गीय संस्कारांना धरून ठेवत महाराष्ट्राची फर्स्ट लेडी बनण्याचा त्यांचा प्रवास म्हणूनच वेगळा ठरतो. आज ठाकरे सरकार देशभर गाजत असल्याचं श्रेय उद्धव यांच्या बरोबरीने रश्मी यांचंही आहे.
रश्मी उद्धव ठाकरे सामनाच्या संपादक बनल्या आणि नव्याने चर्चेत आल्या. हे पद रूढार्थाने राजकीय नाही आणि तसं पाहिल्यास आहेही. तसंच रश्मी यांचंही आहे. त्या राजकारणात आहेत आणि नाहीतही. मध्यमवर्गीय संस्कारांना धरून ठेवत महाराष्ट्राची फर्स्ट लेडी बनण्याचा त्यांचा प्रवास म्हणूनच वेगळा ठरतो. आज ठाकरे सरकार देशभर गाजत असल्याचं श्रेय उद्धव यांच्या बरोबरीने रश्मी यांचंही आहे......
उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास सोपा नव्हताच. प्रत्येक वळणावर एक नवं आव्हान त्यांच्यासाठी उभं असायचं. ते सारे चढउतार पार करत एक प्रगल्भ आणि प्रयोगशील राजकारणी म्हणून ते मुख्यमंत्रीपदाच्या आव्हानाला सामोरे जात आहेत. आता पुन्हा त्यांच्या क्षमतेवर नेहमीसारखीच प्रश्नचिन्हं उभी केली जात आहेत. पण त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड सांगतो, ते हे आव्हानही पेलू शकतील.
उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास सोपा नव्हताच. प्रत्येक वळणावर एक नवं आव्हान त्यांच्यासाठी उभं असायचं. ते सारे चढउतार पार करत एक प्रगल्भ आणि प्रयोगशील राजकारणी म्हणून ते मुख्यमंत्रीपदाच्या आव्हानाला सामोरे जात आहेत. आता पुन्हा त्यांच्या क्षमतेवर नेहमीसारखीच प्रश्नचिन्हं उभी केली जात आहेत. पण त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड सांगतो, ते हे आव्हानही पेलू शकतील......