नजरेतून होणारं पहिलं प्रेम. पहिल्या प्रेमाची सुरवात खरंतर. या प्रेमाचे किस्से आपण जगभर सांगत हिंडावं इतकं ते हवंहवंसं वाटतं. पण त्यात जात, धर्म आडवा आला तर? सगळं फिस्कटतं. प्रेम व्यक्त करण्याआधीच हे सगळं घडतं. अशावेळी निरपेक्ष प्रेमाच्या चिंधड्या उडतात. प्रेमाची स्वप्न ही स्वप्नच राहतात.
नजरेतून होणारं पहिलं प्रेम. पहिल्या प्रेमाची सुरवात खरंतर. या प्रेमाचे किस्से आपण जगभर सांगत हिंडावं इतकं ते हवंहवंसं वाटतं. पण त्यात जात, धर्म आडवा आला तर? सगळं फिस्कटतं. प्रेम व्यक्त करण्याआधीच हे सगळं घडतं. अशावेळी निरपेक्ष प्रेमाच्या चिंधड्या उडतात. प्रेमाची स्वप्न ही स्वप्नच राहतात......
कोरोना संकटाच्या काळात भेदाभेदाच्या पलीकडे जाऊन माणूस एकत्र येत असताना दुसरीकडे याला छेद देणाऱ्या घटना घडत आहेत. यूपीत जेवण बनवणारा व्यक्ती दलित आहेत म्हणून क्वारंटाईनमधे असलेले काहीजण जेवायला घरी जातात. जीवावर बेतलं असतानाही मनात खोलवर रुजलेल्या जातीच्या अस्मिता टोकदार कशा होतात, हे सांगण्यासाठी ही उदाहरणं पुरेशी बोलकी आहेत.
कोरोना संकटाच्या काळात भेदाभेदाच्या पलीकडे जाऊन माणूस एकत्र येत असताना दुसरीकडे याला छेद देणाऱ्या घटना घडत आहेत. यूपीत जेवण बनवणारा व्यक्ती दलित आहेत म्हणून क्वारंटाईनमधे असलेले काहीजण जेवायला घरी जातात. जीवावर बेतलं असतानाही मनात खोलवर रुजलेल्या जातीच्या अस्मिता टोकदार कशा होतात, हे सांगण्यासाठी ही उदाहरणं पुरेशी बोलकी आहेत......
भारताला प्रतिकं आणि त्यांचं राजकारण ही गोष्ट काही नवी नाही. आपल्या राजकीय पक्षांची वाटचालं ही याच प्रतिकांच्या आधाराने सुरू आहे. महाराष्ट्रात तर प्रतिकं एखाद्या चलनी नाण्यासारखी वापरली जातात. शाहू, फुले, आंबेडकर हे या प्रतिकांचे केंद्रबिंदू. गेल्या काही काळात या सगळ्यांना कॅप्चर करण्याचा प्रयत्न झालाय. मग त्यातून शिवरायही सुटले नाहीत. पण या सगळ्यांतून आपण वारसदारांनी एक महत्त्वाची संधी गमावलीय.
भारताला प्रतिकं आणि त्यांचं राजकारण ही गोष्ट काही नवी नाही. आपल्या राजकीय पक्षांची वाटचालं ही याच प्रतिकांच्या आधाराने सुरू आहे. महाराष्ट्रात तर प्रतिकं एखाद्या चलनी नाण्यासारखी वापरली जातात. शाहू, फुले, आंबेडकर हे या प्रतिकांचे केंद्रबिंदू. गेल्या काही काळात या सगळ्यांना कॅप्चर करण्याचा प्रयत्न झालाय. मग त्यातून शिवरायही सुटले नाहीत. पण या सगळ्यांतून आपण वारसदारांनी एक महत्त्वाची संधी गमावलीय......