दि. बा. मोकाशी यांच्या ‘आता अमोद सुनासि आले’ या कथेवर अलीकडेच ‘दिठी’ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. शब्दांच्या माध्यमातून सांगता न येण्यासारखं काहीतरी या कथेतून मनात उमटतं राहतं. एक विलक्षण समृद्ध करणारा अनुभव मोकाशी वाचकाला या कथेतून देतात. त्यानिमित्तानं या कथेची ओळख आजच्या पिढीला झालीय, त्याचबरोबर अमृतानुभवाच्या तत्वज्ञानाचीही.
दि. बा. मोकाशी यांच्या ‘आता अमोद सुनासि आले’ या कथेवर अलीकडेच ‘दिठी’ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. शब्दांच्या माध्यमातून सांगता न येण्यासारखं काहीतरी या कथेतून मनात उमटतं राहतं. एक विलक्षण समृद्ध करणारा अनुभव मोकाशी वाचकाला या कथेतून देतात. त्यानिमित्तानं या कथेची ओळख आजच्या पिढीला झालीय, त्याचबरोबर अमृतानुभवाच्या तत्वज्ञानाचीही......
‘दिठी’ या संपूर्ण सिनेमाला एक अनोखी ‘लय’ आहे. सतत दृश्यं एका लयीत सरकत राहतात. सिनेमात अतिशय मोजके संवाद आहेत. तसा यात दृश्यभाषेचा उत्तुंग आविष्कारही आहे. किशोर कदम आणि सुमित्रा भावे यांनी प्रेक्षकांना सिनेमा कसा पहायचा याच्यासोबतच मानवी जीवनातल्या सुख-दु:खाकडे, जन्म-मरणाकडे कसं पहायचं याची ‘दिठी’ दिलीय. दिठीबद्दलची प्रमोद मुनघाटे यांची फेसबुक पोस्ट इथं देत आहोत.
‘दिठी’ या संपूर्ण सिनेमाला एक अनोखी ‘लय’ आहे. सतत दृश्यं एका लयीत सरकत राहतात. सिनेमात अतिशय मोजके संवाद आहेत. तसा यात दृश्यभाषेचा उत्तुंग आविष्कारही आहे. किशोर कदम आणि सुमित्रा भावे यांनी प्रेक्षकांना सिनेमा कसा पहायचा याच्यासोबतच मानवी जीवनातल्या सुख-दु:खाकडे, जन्म-मरणाकडे कसं पहायचं याची ‘दिठी’ दिलीय. दिठीबद्दलची प्रमोद मुनघाटे यांची फेसबुक पोस्ट इथं देत आहोत......
सुमित्रा भावेंनी ज्या वेळी मराठी सिनेमे दिग्दर्शित करायला सुरवात केली, तेव्हा मराठी सिनेसृष्टीची अवस्था खूपच कठीण होती. कौतुक करावेत असे सिनेमे अपवादानेच बनायचे. पण त्यांचे ‘दोघी’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘दहावी फ’ यासारखे सिनेमे आले आणि सगळं चित्रच पालटलं. अंगभूत हुशारी, साहित्याची जाण आणि प्रचंड कष्टाच्या तयारीमुळे सुमित्राताईंचे सर्वच सिनेमे वैश्विक ठरले.
सुमित्रा भावेंनी ज्या वेळी मराठी सिनेमे दिग्दर्शित करायला सुरवात केली, तेव्हा मराठी सिनेसृष्टीची अवस्था खूपच कठीण होती. कौतुक करावेत असे सिनेमे अपवादानेच बनायचे. पण त्यांचे ‘दोघी’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘दहावी फ’ यासारखे सिनेमे आले आणि सगळं चित्रच पालटलं. अंगभूत हुशारी, साहित्याची जाण आणि प्रचंड कष्टाच्या तयारीमुळे सुमित्राताईंचे सर्वच सिनेमे वैश्विक ठरले......