आपल्या डीएनएत मराठीपण घेऊन मिरवणारी शिवसेना आता मुंबईतल्या गुजराती समाजावर राजकीय जाळं टाकतेय. पुढच्या वर्षी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ‘जलेबी अने फाफडा अने उद्धव ठाकरे आपडा’ अशी साद घातली जातेय. यामागचं कारण म्हणजे गुजराती समाजाचा मुंबईत वाढत असलेला प्रभाव. भाजपबरोबर युती तुटल्यापासून महानगरपालिकेतल्या जागा जिंकण्यासाठी लागणाऱ्या मतांची रुखरुख नक्कीच शिवसेनेला लागून राहिलीय.
आपल्या डीएनएत मराठीपण घेऊन मिरवणारी शिवसेना आता मुंबईतल्या गुजराती समाजावर राजकीय जाळं टाकतेय. पुढच्या वर्षी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ‘जलेबी अने फाफडा अने उद्धव ठाकरे आपडा’ अशी साद घातली जातेय. यामागचं कारण म्हणजे गुजराती समाजाचा मुंबईत वाढत असलेला प्रभाव. भाजपबरोबर युती तुटल्यापासून महानगरपालिकेतल्या जागा जिंकण्यासाठी लागणाऱ्या मतांची रुखरुख नक्कीच शिवसेनेला लागून राहिलीय......
आजपासून अण्णा भाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष संपलं. यानिमित्त मोठे समारंभ, पुतळ्यांची पूजा, पुरस्कार, स्वागत-सत्कार होतील. प्रामाणिकपणे काही उपक्रमही राबवले गेले. पण या सगळ्यात अण्णा भाऊंचं साहित्य, कार्य समजून घेताना ‘अण्णा भाऊ’ नावाच्या माणसाला समजून घेण्याचं राहून जाऊ नये.
आजपासून अण्णा भाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष संपलं. यानिमित्त मोठे समारंभ, पुतळ्यांची पूजा, पुरस्कार, स्वागत-सत्कार होतील. प्रामाणिकपणे काही उपक्रमही राबवले गेले. पण या सगळ्यात अण्णा भाऊंचं साहित्य, कार्य समजून घेताना ‘अण्णा भाऊ’ नावाच्या माणसाला समजून घेण्याचं राहून जाऊ नये......
संजय नहार गेली चार दशकं पंजाब, काश्मीर आणि ईशान्येकडच्या राज्यांत `सरहद`वरच्या माणसांना देशाशी जोडण्याचं काम करत आहेत. त्यांना तिथे सापडलेली `आयडिया ऑफ महाराष्ट्र` काय आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. त्यांना सापडलेला महाराष्ट्र विचार आहे देशभक्तीचा आणि सर्वसमावेशकतेचा. त्याशिवाय ते सांगत असलेला अनेकांतवादही महाराष्ट्र विचारांच्या दृष्टीने आवर्जून समजून घ्यावा, असाच आहे.
संजय नहार गेली चार दशकं पंजाब, काश्मीर आणि ईशान्येकडच्या राज्यांत `सरहद`वरच्या माणसांना देशाशी जोडण्याचं काम करत आहेत. त्यांना तिथे सापडलेली `आयडिया ऑफ महाराष्ट्र` काय आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. त्यांना सापडलेला महाराष्ट्र विचार आहे देशभक्तीचा आणि सर्वसमावेशकतेचा. त्याशिवाय ते सांगत असलेला अनेकांतवादही महाराष्ट्र विचारांच्या दृष्टीने आवर्जून समजून घ्यावा, असाच आहे......
महाराष्ट्र विचारांतून महाराष्ट्राची जडणघडण होत गेली आहे. ती होता होता, महाराष्ट्रानं देशालाही आकार आणि विचार दिला. महाराष्ट्रात रुजलेली संत परंपरा, मानवतावाद, सर्ववमावेशकता यामुळं ‘आयडिया ऑफ इंडिया’ला दिशा मिळत गेली. त्याची मुळं ‘आयडिया ऑफ महाराष्ट्र’मधेच आहे, सांगत आहेत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत कुमार सप्तर्षी.
महाराष्ट्र विचारांतून महाराष्ट्राची जडणघडण होत गेली आहे. ती होता होता, महाराष्ट्रानं देशालाही आकार आणि विचार दिला. महाराष्ट्रात रुजलेली संत परंपरा, मानवतावाद, सर्ववमावेशकता यामुळं ‘आयडिया ऑफ इंडिया’ला दिशा मिळत गेली. त्याची मुळं ‘आयडिया ऑफ महाराष्ट्र’मधेच आहे, सांगत आहेत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत कुमार सप्तर्षी......
महाराष्ट्राची निर्मिती फक्त भाषक अस्मितेतून झाल्याचं आजच्या पिढीला वाटतं. या गैरसमजाचं कारण या पिढीला संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा लढा नीट माहीत नाही. हा संघर्ष प्रामुख्याने मुंबईतले अमराठी भांडवलदार आणि मराठी कामगार यांच्यातला होता. हा वर्गसंघर्ष होता. कष्टकऱ्यांचं राज्य व्हावं, म्हणून हा महाराष्ट्र निर्माण झालाय. `आयडिया ऑफ महाराष्ट्र` या लेखमालेत आजची मांडणी करत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार कुमार केतकर.
महाराष्ट्राची निर्मिती फक्त भाषक अस्मितेतून झाल्याचं आजच्या पिढीला वाटतं. या गैरसमजाचं कारण या पिढीला संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा लढा नीट माहीत नाही. हा संघर्ष प्रामुख्याने मुंबईतले अमराठी भांडवलदार आणि मराठी कामगार यांच्यातला होता. हा वर्गसंघर्ष होता. कष्टकऱ्यांचं राज्य व्हावं, म्हणून हा महाराष्ट्र निर्माण झालाय. `आयडिया ऑफ महाराष्ट्र` या लेखमालेत आजची मांडणी करत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार कुमार केतकर......
दि.पु. चित्रेंनी म्हटलंय, `समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूल्य शोधण्यासाठी मला फ्रेंच राज्यक्रांतीत जावं लागत नाही, ती मला इथेच वारकरी विचारांत सापडतात.` हाच महाराष्ट्रधर्म आहे आणि आयडिया ऑफ महाराष्ट्रही. ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी या लेखात इतिहास भूगोलाचा धांडोळा घेत महाराष्ट्रातला महान मूल्यसंचय नेमकेपणाने मांडलाय. कोलाजच्या `आयडिया ऑफ महाराष्ट्र` या लेखमालेतला एक महत्त्वाचा लेख.
दि.पु. चित्रेंनी म्हटलंय, `समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूल्य शोधण्यासाठी मला फ्रेंच राज्यक्रांतीत जावं लागत नाही, ती मला इथेच वारकरी विचारांत सापडतात.` हाच महाराष्ट्रधर्म आहे आणि आयडिया ऑफ महाराष्ट्रही. ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी या लेखात इतिहास भूगोलाचा धांडोळा घेत महाराष्ट्रातला महान मूल्यसंचय नेमकेपणाने मांडलाय. कोलाजच्या `आयडिया ऑफ महाराष्ट्र` या लेखमालेतला एक महत्त्वाचा लेख......
संयुक्त महाराष्ट्र प्रत्यक्षात येण्याच्या पाच महिने आधीच यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राचा विकासाचा रोडमॅप सांगितला होता. ते तेव्हा विशाल द्वैभाषिक राज्याचे मुख्यमंत्री होते. ५ जानेवारी १९६०ला सांगलीत झालेल्या सभेत त्यांनी अगदी सविस्तर नव्या महाराष्ट्राचा विचार सांगितला होता. त्यांची आयडिया ऑफ महाराष्ट्र सांगणारं हे भाषण नव्या राज्यासमोरच्या समस्या, त्यांच्यावरचे अक्सीर इलाज आणि नवनिर्मितीची दिशा सांगतं. हे त्यांचं महत्त्वाचं भाषण.
संयुक्त महाराष्ट्र प्रत्यक्षात येण्याच्या पाच महिने आधीच यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राचा विकासाचा रोडमॅप सांगितला होता. ते तेव्हा विशाल द्वैभाषिक राज्याचे मुख्यमंत्री होते. ५ जानेवारी १९६०ला सांगलीत झालेल्या सभेत त्यांनी अगदी सविस्तर नव्या महाराष्ट्राचा विचार सांगितला होता. त्यांची आयडिया ऑफ महाराष्ट्र सांगणारं हे भाषण नव्या राज्यासमोरच्या समस्या, त्यांच्यावरचे अक्सीर इलाज आणि नवनिर्मितीची दिशा सांगतं. हे त्यांचं महत्त्वाचं भाषण. .....
छत्रपती शिवराय. यशवंतराव चव्हाणांच्या शब्दांत सांगायचं तर महाराष्ट्राचा परमेश्वर. या परमेश्वराच्या जयंतीला २७ एप्रिल १९६०ला नव्या राज्याचा आनंदोत्सव सुरू झाला. यशवंतरावांनी शिवनेरीवर जाऊन नवं राज्य घडवण्याचा विडा उचलला. महाराष्ट्र हे शिवरायांच्या विचारांवर चालणारं राज्य असेल, म्हणजे नेमकं काय, याचा उहापोह करणारं एक भाषणही तिथे दिलं. आजही साठ वर्षांनंतरही हे भाषण आपल्याला दिशा दाखवतं.
छत्रपती शिवराय. यशवंतराव चव्हाणांच्या शब्दांत सांगायचं तर महाराष्ट्राचा परमेश्वर. या परमेश्वराच्या जयंतीला २७ एप्रिल १९६०ला नव्या राज्याचा आनंदोत्सव सुरू झाला. यशवंतरावांनी शिवनेरीवर जाऊन नवं राज्य घडवण्याचा विडा उचलला. महाराष्ट्र हे शिवरायांच्या विचारांवर चालणारं राज्य असेल, म्हणजे नेमकं काय, याचा उहापोह करणारं एक भाषणही तिथे दिलं. आजही साठ वर्षांनंतरही हे भाषण आपल्याला दिशा दाखवतं......
नवं महाराष्ट्र राज्य १ मे १९६०ला अस्तित्त्वात आलं, तरी त्याचा उत्सव तीन दिवस आधी म्हणजे २७ एप्रिललाच सुरू झाला. तेव्हाच्या रितीनुसार हा दिवस शिवजयंतीचा होता. त्या दिवशी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी आकाशवाणीवर एक भाषण केलं. त्या काळातल्या सर्वात महत्त्वाच्या माध्यमात बोलताना यशवंतरावांनी वेगवेगळ्या भागांतल्या मराठी माणसाला त्यांच्याशी समान व्यवहाराचं आश्वासन दिलं.
नवं महाराष्ट्र राज्य १ मे १९६०ला अस्तित्त्वात आलं, तरी त्याचा उत्सव तीन दिवस आधी म्हणजे २७ एप्रिललाच सुरू झाला. तेव्हाच्या रितीनुसार हा दिवस शिवजयंतीचा होता. त्या दिवशी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी आकाशवाणीवर एक भाषण केलं. त्या काळातल्या सर्वात महत्त्वाच्या माध्यमात बोलताना यशवंतरावांनी वेगवेगळ्या भागांतल्या मराठी माणसाला त्यांच्याशी समान व्यवहाराचं आश्वासन दिलं......
राजभवनात १ मे १९६०ला महाराष्ट्र राज्याच्या उद्घाटनाचा समारंभ पार पडला. तेव्हा पंतप्रधान जवाहरलाल नेहरू उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत नव्या संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी छोटंसं भाषण केलं. हिमालयावर संकट आलं तर सह्याद्री काळ्या पत्थराची छाती करून संरक्षणासाठी उभा राहिल, अशी ग्वाही या भाषणात दिली आणि पुढे हे आश्वासन सत्यात उतरवलंही. ते हे भाषण.
राजभवनात १ मे १९६०ला महाराष्ट्र राज्याच्या उद्घाटनाचा समारंभ पार पडला. तेव्हा पंतप्रधान जवाहरलाल नेहरू उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत नव्या संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी छोटंसं भाषण केलं. हिमालयावर संकट आलं तर सह्याद्री काळ्या पत्थराची छाती करून संरक्षणासाठी उभा राहिल, अशी ग्वाही या भाषणात दिली आणि पुढे हे आश्वासन सत्यात उतरवलंही. ते हे भाषण......
आज कोरोनाशी झुंजणारा महाराष्ट्र आपल्याला `आयडिया ऑफ महाराष्ट्र` खऱ्या अर्थाने समजावून सांगतोय. पुढची आव्हानं पेलण्यासाठीही हीच `आयडिया ऑफ महाराष्ट्र` आपल्याला उपयोगी पडणार आहे. त्याची मुहूर्तमेढ आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी घातलीय. तो यशवंतराव नावाचा विचार काय आहे, ते हीरक महोत्सवी महाराष्ट्र दिनानिमित्त सांगत आहेत, महाराष्ट्राचे नेते शरद पवार.
आज कोरोनाशी झुंजणारा महाराष्ट्र आपल्याला `आयडिया ऑफ महाराष्ट्र` खऱ्या अर्थाने समजावून सांगतोय. पुढची आव्हानं पेलण्यासाठीही हीच `आयडिया ऑफ महाराष्ट्र` आपल्याला उपयोगी पडणार आहे. त्याची मुहूर्तमेढ आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी घातलीय. तो यशवंतराव नावाचा विचार काय आहे, ते हीरक महोत्सवी महाराष्ट्र दिनानिमित्त सांगत आहेत, महाराष्ट्राचे नेते शरद पवार......
महाराष्ट्र हा फक्त एक जमिनीचा तुकडा नाही. महाराष्ट्र हा फक्त नकाशाचा आकार नाही. महाराष्ट्र हा एक विचार आहे. महाराष्ट्र हा एक मूल्यसंचय आहे. महाराष्ट्र हे एक तत्त्व आहे. पण आज साठाव्या महाराष्ट्र दिनानिमित्त ते नव्याने शोधायला हवंय. त्यासाठी कोलाज `आयडिया ऑफ महाराष्ट्र` या मालिकेत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना लिहितं करतंय.
महाराष्ट्र हा फक्त एक जमिनीचा तुकडा नाही. महाराष्ट्र हा फक्त नकाशाचा आकार नाही. महाराष्ट्र हा एक विचार आहे. महाराष्ट्र हा एक मूल्यसंचय आहे. महाराष्ट्र हे एक तत्त्व आहे. पण आज साठाव्या महाराष्ट्र दिनानिमित्त ते नव्याने शोधायला हवंय. त्यासाठी कोलाज `आयडिया ऑफ महाराष्ट्र` या मालिकेत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना लिहितं करतंय......
कोरोना वायरसविरोधातल्या लढ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलंय. तसंच जीव धोक्यात घालत कोरोनाविरोधात काम करणाऱ्यांसाठी कृतज्ञता म्हणून टाळ्या वाजवण्याचं आवाहन केलंय. टाळ्या वाजवणं हे मुंबई, महाराष्ट्रासाठी नवं असलं तरी जनता कर्फ्यूशी मराठी माणसाचं अनोखं कनेक्शन आहे. मग टाळ्या वाजवण्याचं कनेक्शन कुणाशी आहे?
कोरोना वायरसविरोधातल्या लढ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलंय. तसंच जीव धोक्यात घालत कोरोनाविरोधात काम करणाऱ्यांसाठी कृतज्ञता म्हणून टाळ्या वाजवण्याचं आवाहन केलंय. टाळ्या वाजवणं हे मुंबई, महाराष्ट्रासाठी नवं असलं तरी जनता कर्फ्यूशी मराठी माणसाचं अनोखं कनेक्शन आहे. मग टाळ्या वाजवण्याचं कनेक्शन कुणाशी आहे?.....
आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा इथे सैराटकार नागराज मंजुळे यांना लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार दिला जातोय. लोकशाहिरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गेल्या वर्षीपासून आजरेकर जनतेने एक पुरस्कार सुरू केलाय. गेल्या वर्षी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळूंखे यांना देण्यात आला. यानिमित्ताने गव्हाणकरांच्या व्यक्तिमत्त्वावर टाकलेला प्रकाश.
आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा इथे सैराटकार नागराज मंजुळे यांना लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार दिला जातोय. लोकशाहिरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गेल्या वर्षीपासून आजरेकर जनतेने एक पुरस्कार सुरू केलाय. गेल्या वर्षी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळूंखे यांना देण्यात आला. यानिमित्ताने गव्हाणकरांच्या व्यक्तिमत्त्वावर टाकलेला प्रकाश......
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते, पालघरचे पहिले आमदार नवनीतभाई शहा यांचं काल सोमवारी २६ ऑगस्टला निधन झालं. सात दशकांच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी पालघर परिसराच्या विकासासाठी अनेक आंदोलनं केली. संस्था उभारल्या. ज्येष्ठ पत्रकार, पालघरचे रहिवासी समीर मणियार यांनी नवनीतभाईंच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारी फेसबूक पोस्ट टाकलीय. त्या पोस्टचा हा संपादित अंश.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते, पालघरचे पहिले आमदार नवनीतभाई शहा यांचं काल सोमवारी २६ ऑगस्टला निधन झालं. सात दशकांच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी पालघर परिसराच्या विकासासाठी अनेक आंदोलनं केली. संस्था उभारल्या. ज्येष्ठ पत्रकार, पालघरचे रहिवासी समीर मणियार यांनी नवनीतभाईंच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारी फेसबूक पोस्ट टाकलीय. त्या पोस्टचा हा संपादित अंश......
आज १ ऑगस्ट अण्णा भाऊ साठेंचा जन्मदिन. अण्णा भाऊंचं एवढं विपुल साहित्य असूनही त्यांना साहित्यिकाचा दर्जा मिळाला नाही. त्यावर लेखक अंकुश कदम म्हणतात, अण्णा भाऊंसारखा आरपार जगणारा आणि आरपार लिहिणारा कलावंत विटाळवादी मराठी साहित्याला झेपणं त्यांच्या औकातीत नव्हतं.
आज १ ऑगस्ट अण्णा भाऊ साठेंचा जन्मदिन. अण्णा भाऊंचं एवढं विपुल साहित्य असूनही त्यांना साहित्यिकाचा दर्जा मिळाला नाही. त्यावर लेखक अंकुश कदम म्हणतात, अण्णा भाऊंसारखा आरपार जगणारा आणि आरपार लिहिणारा कलावंत विटाळवादी मराठी साहित्याला झेपणं त्यांच्या औकातीत नव्हतं......
आज १ मे. आपण सगळे मराठी माणसं महाराष्ट्र दिन साजरा करतो. पण इथवरचा हा प्रवास निव्वळ संघर्षाचा, लढ्याचा नाही. दोन राज्यांमधे फारकत होताना तिथे वाटाघाटींना खूप महत्त्व येतं. त्यासाठी कुणाचं तरी आर्थिक नुकसान होतं. अशा नुकसान भरपाईपोटी महाराष्ट्रानेही गुजरातला कोट्यवधी रुपये दिले. पण तिथे यशवंतरावांनी खूप भारी फॉर्म्युला काढला.
आज १ मे. आपण सगळे मराठी माणसं महाराष्ट्र दिन साजरा करतो. पण इथवरचा हा प्रवास निव्वळ संघर्षाचा, लढ्याचा नाही. दोन राज्यांमधे फारकत होताना तिथे वाटाघाटींना खूप महत्त्व येतं. त्यासाठी कुणाचं तरी आर्थिक नुकसान होतं. अशा नुकसान भरपाईपोटी महाराष्ट्रानेही गुजरातला कोट्यवधी रुपये दिले. पण तिथे यशवंतरावांनी खूप भारी फॉर्म्युला काढला......
मुंबई महाराष्ट्राशी जोडली जावी, यासाठी मुंबईतल्या मराठी माणसाने तरुण रक्तांचे बळी दिलेत. वर्षानुवर्षं बलिदान दिलंय. शिव्या खाल्ल्यात. शांतपणे अपमान सहन केलेत. म्हणून आम्ही मुंबईचे मराठी लोक आजही अभिमानाने म्हणतो की मुंबई आमचीच. मुंबई सगळ्यांची आहे, हे आम्हालाही माहिती आहे, तरीही आम्ही असं म्हणतोच. त्याला कारण असलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातल्या या प्रेरणादायी आणि वेदनादायी आठवणी.
मुंबई महाराष्ट्राशी जोडली जावी, यासाठी मुंबईतल्या मराठी माणसाने तरुण रक्तांचे बळी दिलेत. वर्षानुवर्षं बलिदान दिलंय. शिव्या खाल्ल्यात. शांतपणे अपमान सहन केलेत. म्हणून आम्ही मुंबईचे मराठी लोक आजही अभिमानाने म्हणतो की मुंबई आमचीच. मुंबई सगळ्यांची आहे, हे आम्हालाही माहिती आहे, तरीही आम्ही असं म्हणतोच. त्याला कारण असलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातल्या या प्रेरणादायी आणि वेदनादायी आठवणी......
आज महाराष्ट्र दिन. आपल्याला महाराष्ट्र हे राज्य लढून मिळालंय. ते आपल्या बापजाद्यांनी कमावलंय. त्या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात सगळ्यात आघाडीवर होते ते शाहीर. या शाहिरांनी महाराष्ट्र पेटवला. लढण्यासाठी तयार केला. पण ते काम शाहीर महाराष्ट्रात वर्षानुवर्षं करत आहेत. आपल्या त्या वारशाबद्दल नव्या पिढीने समजून घ्यायला हवं. म्हणून आज शाहिरांविषयी वाचायलाच हवं.
आज महाराष्ट्र दिन. आपल्याला महाराष्ट्र हे राज्य लढून मिळालंय. ते आपल्या बापजाद्यांनी कमावलंय. त्या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात सगळ्यात आघाडीवर होते ते शाहीर. या शाहिरांनी महाराष्ट्र पेटवला. लढण्यासाठी तयार केला. पण ते काम शाहीर महाराष्ट्रात वर्षानुवर्षं करत आहेत. आपल्या त्या वारशाबद्दल नव्या पिढीने समजून घ्यायला हवं. म्हणून आज शाहिरांविषयी वाचायलाच हवं. .....
महाराष्ट्राला सत्यशोधकी बहुजनवादी राजकारणाची थोर परंपरा आहे. या परंपरेचे शिलेदार असलेल्या भाई उद्धवराव पाटील यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालंय. घरात शिक्षणाचा, राजकारणाचा कुठलाही वारसा नसलेल्या भाईंनी वकिलीचं शिक्षण घेऊन राजकारणात स्वकर्तृत्वाने विचारवंत नेता म्हणून नाव कमावलं. यशवंतराव चव्हाणांसारख्या अनेकांनी भाईंचं मोठेपण मान्य केलं. पण आज उभ्या महाराष्ट्राला हे मोठेपण कधी आणि कसं कळणार?
महाराष्ट्राला सत्यशोधकी बहुजनवादी राजकारणाची थोर परंपरा आहे. या परंपरेचे शिलेदार असलेल्या भाई उद्धवराव पाटील यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालंय. घरात शिक्षणाचा, राजकारणाचा कुठलाही वारसा नसलेल्या भाईंनी वकिलीचं शिक्षण घेऊन राजकारणात स्वकर्तृत्वाने विचारवंत नेता म्हणून नाव कमावलं. यशवंतराव चव्हाणांसारख्या अनेकांनी भाईंचं मोठेपण मान्य केलं. पण आज उभ्या महाराष्ट्राला हे मोठेपण कधी आणि कसं कळणार?.....