तब्बल दोन दशकं सत्ता गाजवल्यानंतर पुन्हा पाच वर्षांसाठी तुर्कस्तानच्या जनतेनं कौल एर्दोगन यांच्या बाजूने कौल दिलाय. एर्दोगन स्वत:ला ओटोमन साम्राज्याच्या सुल्तानाच्या रुपात बघतात. त्यांना राष्ट्राध्यक्ष पदावरून पायउतार करण्याची पाश्चिमात्य देशांना घाई झाल्याचं प्रचारयंत्रणेनं मतदारांच्या मनावर ठसवलं होतं. पण मतदारांनी राष्ट्रीय अस्मितेच्या भावनेखाली पुन्हा एकदा एर्दोगन यांना निवडून दिलं.
तब्बल दोन दशकं सत्ता गाजवल्यानंतर पुन्हा पाच वर्षांसाठी तुर्कस्तानच्या जनतेनं कौल एर्दोगन यांच्या बाजूने कौल दिलाय. एर्दोगन स्वत:ला ओटोमन साम्राज्याच्या सुल्तानाच्या रुपात बघतात. त्यांना राष्ट्राध्यक्ष पदावरून पायउतार करण्याची पाश्चिमात्य देशांना घाई झाल्याचं प्रचारयंत्रणेनं मतदारांच्या मनावर ठसवलं होतं. पण मतदारांनी राष्ट्रीय अस्मितेच्या भावनेखाली पुन्हा एकदा एर्दोगन यांना निवडून दिलं......
तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवड झालेले एर्दोगान पूर्वी ब्रेड आणि सरबत विकायचे. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल वाद आहे. धर्म हा त्यांच्या राजकारणाचा पाया आहे. सर्व सत्ता स्वतःकडे असावी अशी त्यांची कार्यपद्धती आहे. त्यांनी अर्थव्यवस्थेची वाट लावली, असा त्यांच्यावर आरोप होतोय. तरीही त्यांना मिळालेला निसटता विजय भारतासाठी अनेक अर्थानं महत्त्वाचा आहे, कारण त्यांचा भारतद्वेष लपलेला नाही.
तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवड झालेले एर्दोगान पूर्वी ब्रेड आणि सरबत विकायचे. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल वाद आहे. धर्म हा त्यांच्या राजकारणाचा पाया आहे. सर्व सत्ता स्वतःकडे असावी अशी त्यांची कार्यपद्धती आहे. त्यांनी अर्थव्यवस्थेची वाट लावली, असा त्यांच्यावर आरोप होतोय. तरीही त्यांना मिळालेला निसटता विजय भारतासाठी अनेक अर्थानं महत्त्वाचा आहे, कारण त्यांचा भारतद्वेष लपलेला नाही......