एकानं सुरू केलं की ते बघून दुसरा करतो, हा माणसाचा स्वभाव आहे. गावागावातही तसंच होतं. दोन महिन्यांपूर्वी सांगलीतल्या एका ग्रामपंचायतीनं संध्याकाळी गावातले सर्व टीवी-मोबाईल बंद करण्याचा निर्णय घेतला. आता यवतमाळमधेही त्याचं अनुकरण झालंय. सगळ्या गावानं टीवी-मोबाईल बंद करणं, याकडं 'डिग्लोबलायझेशन'च्या दृष्टिनं पाहता येईल. पण ते नेमकं कसं?
एकानं सुरू केलं की ते बघून दुसरा करतो, हा माणसाचा स्वभाव आहे. गावागावातही तसंच होतं. दोन महिन्यांपूर्वी सांगलीतल्या एका ग्रामपंचायतीनं संध्याकाळी गावातले सर्व टीवी-मोबाईल बंद करण्याचा निर्णय घेतला. आता यवतमाळमधेही त्याचं अनुकरण झालंय. सगळ्या गावानं टीवी-मोबाईल बंद करणं, याकडं 'डिग्लोबलायझेशन'च्या दृष्टिनं पाहता येईल. पण ते नेमकं कसं?.....
यवतमाळ-वाशिम मतदारसंघात पाचव्यांदा खासदार होण्यास इच्छूक असलेल्या शिवसेनेच्या भावना गवळी आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यात थेट लढत झाली. भाजप बंडखोराने लढतीत चांगलीच रंगत आणली. शेतकरी आत्महत्यांचा शिक्का बसलेल्या या मतदारसंघातल्या ग्रामीण भागात मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले. भंडारा-गोंदियातही भाजप बंडखोर रिंगणात होता.
यवतमाळ-वाशिम मतदारसंघात पाचव्यांदा खासदार होण्यास इच्छूक असलेल्या शिवसेनेच्या भावना गवळी आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यात थेट लढत झाली. भाजप बंडखोराने लढतीत चांगलीच रंगत आणली. शेतकरी आत्महत्यांचा शिक्का बसलेल्या या मतदारसंघातल्या ग्रामीण भागात मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले. भंडारा-गोंदियातही भाजप बंडखोर रिंगणात होता......
उमेदवार बदलण्यावरून झालेल्या राड्याने चंद्रपुरात काँग्रेसचं हसं झालं. त्याचा काँग्रेसला सुरवातीच्या टप्प्यातल्या प्रचारातही बसला. भाजपला निवडणूक एकतर्फी जाईल, असं वाटतं असतानाच आता चंद्रपुरात चांगलीच टस्सल लागलीय. हमखास निवडून येतील असं वाटणारे केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांना त्यांनी चांगलंच अडचणीत आणलंय.
उमेदवार बदलण्यावरून झालेल्या राड्याने चंद्रपुरात काँग्रेसचं हसं झालं. त्याचा काँग्रेसला सुरवातीच्या टप्प्यातल्या प्रचारातही बसला. भाजपला निवडणूक एकतर्फी जाईल, असं वाटतं असतानाच आता चंद्रपुरात चांगलीच टस्सल लागलीय. हमखास निवडून येतील असं वाटणारे केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांना त्यांनी चांगलंच अडचणीत आणलंय......
देशात शेतकरी आत्महत्यांचं सर्वाधिक प्रमाण असलेला जिल्हा म्हणजे यवतमाळ. तिथे सरकारी धोरणांना जबाबदार धरत शेतकरी आत्महत्या करत आहेत. पण या जिल्ह्यात निवडणुकीच्या वातावरणात शेतीच्या भीषण समस्येची चर्चाच नाही. सगळेच पक्ष गुंतले आहेत ते जातीची गणितं जोडण्यात. ११ तारखेच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात मतदानासाठी सज्ज झालेल्या या जिल्ह्याचा ग्राऊंड झीरो रिपोर्ट.
देशात शेतकरी आत्महत्यांचं सर्वाधिक प्रमाण असलेला जिल्हा म्हणजे यवतमाळ. तिथे सरकारी धोरणांना जबाबदार धरत शेतकरी आत्महत्या करत आहेत. पण या जिल्ह्यात निवडणुकीच्या वातावरणात शेतीच्या भीषण समस्येची चर्चाच नाही. सगळेच पक्ष गुंतले आहेत ते जातीची गणितं जोडण्यात. ११ तारखेच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात मतदानासाठी सज्ज झालेल्या या जिल्ह्याचा ग्राऊंड झीरो रिपोर्ट. .....
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तीन मतदारसंघातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल आलेत. हे निकाल सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांसाठीही डोकेदुखीचं कारण ठरलेत. मतदारांनी संमिश्र कौल देत भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना कामाला लावलंय. वंचित बहुजन आघाडीसाठीही या निकालाने आशादायी वातावरण निर्माण केलंय.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तीन मतदारसंघातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल आलेत. हे निकाल सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांसाठीही डोकेदुखीचं कारण ठरलेत. मतदारांनी संमिश्र कौल देत भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना कामाला लावलंय. वंचित बहुजन आघाडीसाठीही या निकालाने आशादायी वातावरण निर्माण केलंय......
वेगवेगळ्या क्षेत्रात महिला संधी मिळताच आपलं कर्तृत्व गाजवताहेत. आता काही दिवसांतच एसटीचं स्टेअरिंगही महिलांच्या हातात येणार आहे. एसटी महामंडळाने त्या दिशेने पाऊल टाकलंय. गाडीचं स्टेअरिंग हाती असलेली बाई हे शहरापुरतं मर्यादित असलेलं चित्र. पण एसटीमुळे गावखेड्यातही स्टेअरिंग सांभाळणारी बाई आपल्याला दिसणार आहे. या प्रयोगशील उपक्रमावर टाकलेला हा प्रकाश.
वेगवेगळ्या क्षेत्रात महिला संधी मिळताच आपलं कर्तृत्व गाजवताहेत. आता काही दिवसांतच एसटीचं स्टेअरिंगही महिलांच्या हातात येणार आहे. एसटी महामंडळाने त्या दिशेने पाऊल टाकलंय. गाडीचं स्टेअरिंग हाती असलेली बाई हे शहरापुरतं मर्यादित असलेलं चित्र. पण एसटीमुळे गावखेड्यातही स्टेअरिंग सांभाळणारी बाई आपल्याला दिसणार आहे. या प्रयोगशील उपक्रमावर टाकलेला हा प्रकाश......
जगाच्या नकाशावर सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा अशी यवतमाळ जिल्ह्याची नोंद आहे. एका विदेशी पत्रकाराने या जिल्ह्यास 'पृथ्वीवरील शेतकऱ्यांची स्मशानभूमी' असं विशेषण लावलंय. अशा यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी केंद्र सरकारच्या आजच्या बजेटकडे कोणत्या अर्थाने बघतात, हे जाणून घ्यायचा हा प्रयत्न.
जगाच्या नकाशावर सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा अशी यवतमाळ जिल्ह्याची नोंद आहे. एका विदेशी पत्रकाराने या जिल्ह्यास 'पृथ्वीवरील शेतकऱ्यांची स्मशानभूमी' असं विशेषण लावलंय. अशा यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी केंद्र सरकारच्या आजच्या बजेटकडे कोणत्या अर्थाने बघतात, हे जाणून घ्यायचा हा प्रयत्न......
यवतमाळ इथल्या साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करून आयोजकच अडचणीत सापडले. उद्घाटनासाठी ऐनवेळी कुणीच सापडेना. कुणाला बोलवावं हेही कळेना. अशावेळी धावून आल्या वैशालीताई येडे. शेतकरी नवऱ्याने आत्महत्या केल्यानंतर खंबीरपणे परिस्थिती सांभाळणाऱ्या वैशालीताईंचं भाषण मराठी माणसाला खूप भावलं. वैशालीताईंना घडवणाऱ्या तेरवं या नाटकाची ही कहाणी.
यवतमाळ इथल्या साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करून आयोजकच अडचणीत सापडले. उद्घाटनासाठी ऐनवेळी कुणीच सापडेना. कुणाला बोलवावं हेही कळेना. अशावेळी धावून आल्या वैशालीताई येडे. शेतकरी नवऱ्याने आत्महत्या केल्यानंतर खंबीरपणे परिस्थिती सांभाळणाऱ्या वैशालीताईंचं भाषण मराठी माणसाला खूप भावलं. वैशालीताईंना घडवणाऱ्या तेरवं या नाटकाची ही कहाणी......
यवतमाळच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अजूनही नयनतारा सहगल यांच्या निमंत्रण वापसीचंच सावट आहे. त्याचा निषेध झाला. इतकंच नाही तर अनेक शहरांत निषेधाचे आणि भाषण वाचनाचे कार्यक्रम झाले. गेली अनेक वर्षं शहराचं साहित्य संमेलन आयोजित करणाऱ्या अंबाजोगाई शहरात तर प्रतिसंमेलनाचं यशस्वी आयोजन झालं. त्याचा हा वृत्तांत.
यवतमाळच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अजूनही नयनतारा सहगल यांच्या निमंत्रण वापसीचंच सावट आहे. त्याचा निषेध झाला. इतकंच नाही तर अनेक शहरांत निषेधाचे आणि भाषण वाचनाचे कार्यक्रम झाले. गेली अनेक वर्षं शहराचं साहित्य संमेलन आयोजित करणाऱ्या अंबाजोगाई शहरात तर प्रतिसंमेलनाचं यशस्वी आयोजन झालं. त्याचा हा वृत्तांत. .....
कोलाजचे संपादक सचिन परब यवतमाळच्या साहित्य संमेलनात वक्ते होते. दोन कार्यशाळांत ते बोलणार होते. पण नयनतारा सहगल यांच्या निमंत्रण वापसीच्या पार्श्वभूमीवर ते संमेलनाला गेले नाहीत. त्याविषयीची भूमिका मांडणारं हे मनोगत.
कोलाजचे संपादक सचिन परब यवतमाळच्या साहित्य संमेलनात वक्ते होते. दोन कार्यशाळांत ते बोलणार होते. पण नयनतारा सहगल यांच्या निमंत्रण वापसीच्या पार्श्वभूमीवर ते संमेलनाला गेले नाहीत. त्याविषयीची भूमिका मांडणारं हे मनोगत......
वि. भि. कोलते यांच्या नावाने असलेल्या संशोधन केंद्राला यवतमाळ संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी मिळालीय. पण कथित दबावाला बळी पडून उद्घाटक नयनतारा सहगल यांचं निमंत्रणच आयोजकांनी रद्द केलंय. त्यामुळे वि. भि. कोलतेंचा वारसाचं धोक्यात आलाय. व्यवस्थाशरण न जाणाऱ्या कोलते यांच्या बंडखोर वारशावर टाकलेला हा प्रकाश.
वि. भि. कोलते यांच्या नावाने असलेल्या संशोधन केंद्राला यवतमाळ संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी मिळालीय. पण कथित दबावाला बळी पडून उद्घाटक नयनतारा सहगल यांचं निमंत्रणच आयोजकांनी रद्द केलंय. त्यामुळे वि. भि. कोलतेंचा वारसाचं धोक्यात आलाय. व्यवस्थाशरण न जाणाऱ्या कोलते यांच्या बंडखोर वारशावर टाकलेला हा प्रकाश......
नयनतारा सहगल या महाराष्ट्रापासून लांब असल्या तरी महाराष्ट्राची लेक आहेत. आपल्याच मुलीला घरी यायचं निमंत्रण द्यायचं आणि नंतर तिला येऊ नकोस असं सांगायचं. हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नाही. साहित्य महामंडळ झालं असेल लाचार, पण महाराष्ट्र लेचापेचा झालेला नाही. आणि विदर्भाचं आदरातिथ्य अजून पातळ झालेलं नाही. आपण मराठी माणसांनी मिळून नयनतारा सहगल यांचा समांतर कार्यक्रम आयोजित करायलाच हवा.
नयनतारा सहगल या महाराष्ट्रापासून लांब असल्या तरी महाराष्ट्राची लेक आहेत. आपल्याच मुलीला घरी यायचं निमंत्रण द्यायचं आणि नंतर तिला येऊ नकोस असं सांगायचं. हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नाही. साहित्य महामंडळ झालं असेल लाचार, पण महाराष्ट्र लेचापेचा झालेला नाही. आणि विदर्भाचं आदरातिथ्य अजून पातळ झालेलं नाही. आपण मराठी माणसांनी मिळून नयनतारा सहगल यांचा समांतर कार्यक्रम आयोजित करायलाच हवा......
वाघ नाही तर माणसं मतदान करतात. त्यामुळे अवनी वाघिण मारल्याने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विदर्भात राजकीय फायदाच होतोय. त्यांच्यावर जगभर जितकी टीका होईल, तितका त्यांना स्थानिक पातळीवर फायदाच आहे. फक्त भाजपच नाही तर स्थानिक पातळीवर सगळेच पक्ष अवनीला मारल्याचं समर्थनच करत आहेत.
वाघ नाही तर माणसं मतदान करतात. त्यामुळे अवनी वाघिण मारल्याने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विदर्भात राजकीय फायदाच होतोय. त्यांच्यावर जगभर जितकी टीका होईल, तितका त्यांना स्थानिक पातळीवर फायदाच आहे. फक्त भाजपच नाही तर स्थानिक पातळीवर सगळेच पक्ष अवनीला मारल्याचं समर्थनच करत आहेत......