इंटरनेटवरचे मीम आपल्या वर्च्युअल जगातली एक भन्नाट गोष्ट बनलेत. गेल्या आठवड्यातच साने गुरूजींच्या शामची आई कादंबरीतल्या पात्रांवर मीम बनवल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. आजच्या तरूण पिढीचं अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून या मीमकडे पाहिलं जातं. हा जमानाच मीमचा आहे, त्यामुळे या नव्या माध्यमाचं स्वागत आपल्याला करायलाच लागेल.
इंटरनेटवरचे मीम आपल्या वर्च्युअल जगातली एक भन्नाट गोष्ट बनलेत. गेल्या आठवड्यातच साने गुरूजींच्या शामची आई कादंबरीतल्या पात्रांवर मीम बनवल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. आजच्या तरूण पिढीचं अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून या मीमकडे पाहिलं जातं. हा जमानाच मीमचा आहे, त्यामुळे या नव्या माध्यमाचं स्वागत आपल्याला करायलाच लागेल......
शामची आई सिनेमातल्या एका दृशावर आधारलेल्या एका टेम्प्लेटवरचे अनेक मीम सोशल मीडियावर नेहमी वायरल होत असतात. यातल्या एका मीममुळे नवा वाद सुरू झालाय. शामच्या आईवर मीम बनवून त्या पात्रांचा अपमान केल्यामुळे आमच्या भावना दुखावल्याचं सांगून या मीमविरोधात गृहमंत्र्यांकडे तक्रार केलीय. दोन पिढ्यांमधल्या संघर्षाचं प्रतिक ठरलेल्या या मीमवादातल्या दोन्ही बाजु उलट सुलट तपासून घ्यायला हव्यात.
शामची आई सिनेमातल्या एका दृशावर आधारलेल्या एका टेम्प्लेटवरचे अनेक मीम सोशल मीडियावर नेहमी वायरल होत असतात. यातल्या एका मीममुळे नवा वाद सुरू झालाय. शामच्या आईवर मीम बनवून त्या पात्रांचा अपमान केल्यामुळे आमच्या भावना दुखावल्याचं सांगून या मीमविरोधात गृहमंत्र्यांकडे तक्रार केलीय. दोन पिढ्यांमधल्या संघर्षाचं प्रतिक ठरलेल्या या मीमवादातल्या दोन्ही बाजु उलट सुलट तपासून घ्यायला हव्यात......