महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. बाळासाहेब ठाकरेंनंतर उपहासाच्या, उपरोधाच्या, दुर्लक्षाच्या, कोंडी करणार्या सर्व लाटांना समर्थपणे तोंड देत त्यांनी संघटनेवर पकड बसवली. कोरोनासारख्या अनेक संकटांचा सामना करत ते महाविकास आघाडीचं सरकार चालवतायत. याकाळात संकटमोचक, कुटुंबप्रमुख म्हणून त्यांचा प्रवास नेमका कसाय ते सांगतायत शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. बाळासाहेब ठाकरेंनंतर उपहासाच्या, उपरोधाच्या, दुर्लक्षाच्या, कोंडी करणार्या सर्व लाटांना समर्थपणे तोंड देत त्यांनी संघटनेवर पकड बसवली. कोरोनासारख्या अनेक संकटांचा सामना करत ते महाविकास आघाडीचं सरकार चालवतायत. याकाळात संकटमोचक, कुटुंबप्रमुख म्हणून त्यांचा प्रवास नेमका कसाय ते सांगतायत शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत......
जिल्ह्याजिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागलीय. यंत्रणा अपुरी पडतेय. बेड मिळत नाहीत म्हणून पेशंट मरू लागलेत. वेंटिलेटरची गरज असलेल्या पेशंट्सचे नातेवाईक `वेंटिलेटर मिळेल का वेंटिलेटर…` म्हणून आकांत करताहेत. हे सगळे अपयश कोणत्या सरकारचं आहे? देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना ट्रोल करायला हरकत नाही, पण ज्यांची जबाबदारी आहे त्यांनाही जाब विचारायला पाहिजे.
जिल्ह्याजिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागलीय. यंत्रणा अपुरी पडतेय. बेड मिळत नाहीत म्हणून पेशंट मरू लागलेत. वेंटिलेटरची गरज असलेल्या पेशंट्सचे नातेवाईक `वेंटिलेटर मिळेल का वेंटिलेटर…` म्हणून आकांत करताहेत. हे सगळे अपयश कोणत्या सरकारचं आहे? देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना ट्रोल करायला हरकत नाही, पण ज्यांची जबाबदारी आहे त्यांनाही जाब विचारायला पाहिजे......
शारीरिक अंतर पाळून चैत्र वारी सहभागी होत वारकऱ्यांनी महिनाभराआधीच एक आदर्श घालून दिला होता. आता आषाढी वारीकरता कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सरकारनं मध्यम मार्ग काढलाय. आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपुरात हवाई मार्गे नेण्याचा निर्णय घेऊन त्यांनी विवेकनिष्ठ वारकरी धर्माची भगवी पताका गगनावरी नेली आहे. याची इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद होईल.
शारीरिक अंतर पाळून चैत्र वारी सहभागी होत वारकऱ्यांनी महिनाभराआधीच एक आदर्श घालून दिला होता. आता आषाढी वारीकरता कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सरकारनं मध्यम मार्ग काढलाय. आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपुरात हवाई मार्गे नेण्याचा निर्णय घेऊन त्यांनी विवेकनिष्ठ वारकरी धर्माची भगवी पताका गगनावरी नेली आहे. याची इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद होईल......
महाराष्ट्र सरकारने सुरवातीच्या टप्प्यात चांगलं काम केलं. पण नंतर ढिसाळपणा अनेक पातळ्यांवर दिसला. राज्य सरकारच्या त्रुटींवर, अपयशावर आता बोलायला हवं. चुकीच्या गोष्टी निदर्शनास आणून द्यायला हव्यात नाही तर विरोधकांच्या फजितीचा लाभ उठवत सत्ताधारी मुजोर होतील. आपले राज्य रामराज्य असल्याचा सत्ताधाऱ्यांचा गैरसमज होईल. त्यातून सामान्य माणसांचा छळ होईल.
महाराष्ट्र सरकारने सुरवातीच्या टप्प्यात चांगलं काम केलं. पण नंतर ढिसाळपणा अनेक पातळ्यांवर दिसला. राज्य सरकारच्या त्रुटींवर, अपयशावर आता बोलायला हवं. चुकीच्या गोष्टी निदर्शनास आणून द्यायला हव्यात नाही तर विरोधकांच्या फजितीचा लाभ उठवत सत्ताधारी मुजोर होतील. आपले राज्य रामराज्य असल्याचा सत्ताधाऱ्यांचा गैरसमज होईल. त्यातून सामान्य माणसांचा छळ होईल......
कोरोनाच्या काळात सोशल मीडियावर सध्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेत्यांना ट्रोल करणं चालू केलंय. हे असं ट्रोलिंग करून भाजपविरुद्धच्या चकमकी सहज जिंकता येतील. पण युद्ध जिंकणं कठीण आहे. त्यासाठी काय करावं लागेल याची रणनीती सांगणारा लेख.
कोरोनाच्या काळात सोशल मीडियावर सध्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेत्यांना ट्रोल करणं चालू केलंय. हे असं ट्रोलिंग करून भाजपविरुद्धच्या चकमकी सहज जिंकता येतील. पण युद्ध जिंकणं कठीण आहे. त्यासाठी काय करावं लागेल याची रणनीती सांगणारा लेख......
कोरोना संकटाच्या काळातच महाराष्ट्रावर नवं संकट घोंगावतंय. आमदारकीअभावी मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागण्याचा. विधान परिषदेवर नियुक्तीसाठी मंत्रिमंडळानं शिफारस करून १३ दिवस झाले तरी राज्यपालांनी निर्णय रेंगाळत ठेवलाय. पण ठाकरे आमदार होण्यात कायद्याचा कोणताच अडसर नाही. त्यामुळे राज्यपालांनी तत्काळ ठाकरेंच्या नियुक्तीला मंजुरी दिली पाहिजे, असं ख्यातनाम कायदेतज्ञ फैजान मुस्तफा सांगतात.
कोरोना संकटाच्या काळातच महाराष्ट्रावर नवं संकट घोंगावतंय. आमदारकीअभावी मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागण्याचा. विधान परिषदेवर नियुक्तीसाठी मंत्रिमंडळानं शिफारस करून १३ दिवस झाले तरी राज्यपालांनी निर्णय रेंगाळत ठेवलाय. पण ठाकरे आमदार होण्यात कायद्याचा कोणताच अडसर नाही. त्यामुळे राज्यपालांनी तत्काळ ठाकरेंच्या नियुक्तीला मंजुरी दिली पाहिजे, असं ख्यातनाम कायदेतज्ञ फैजान मुस्तफा सांगतात......
१९९५ मधे शिवसेना भाजपचं युती सरकार होतं तेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या इच्छेने मंत्रालयात कुसुमाग्रजांची स्वातंत्र्यदेवतेस विनवणीचे पोस्टर लावले होते. पण त्यानुसार कुणी वागताना दिसलं नाही. आता उद्धव ठाकरे त्याच्या दहा पावलं पुढं गेलेत. त्यांनी गाडगेबाबांची दशसुत्री मंत्रालयाच्या गेटवरच लावलीय. आता त्यानुसार वागण्याचं आव्हान त्यांच्या सरकारपुढे आहे. ते आव्हान सोपं नाही.
१९९५ मधे शिवसेना भाजपचं युती सरकार होतं तेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या इच्छेने मंत्रालयात कुसुमाग्रजांची स्वातंत्र्यदेवतेस विनवणीचे पोस्टर लावले होते. पण त्यानुसार कुणी वागताना दिसलं नाही. आता उद्धव ठाकरे त्याच्या दहा पावलं पुढं गेलेत. त्यांनी गाडगेबाबांची दशसुत्री मंत्रालयाच्या गेटवरच लावलीय. आता त्यानुसार वागण्याचं आव्हान त्यांच्या सरकारपुढे आहे. ते आव्हान सोपं नाही......
ठाकरे सरकारचं पहिलंवहिलं बजेट आज अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलं. कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर एकत्र येऊन सत्ता स्थापन करणाऱ्या सरकारचं बजेट नेमकं कसं असणार याकडे निव्वळ महाराष्ट्राचंच नाही तर अख्ख्या देशाचं लक्ष लागलं होतं. अशा या लक्षवेधी बजेटमधल्या ७ महत्त्वाच्या गोष्टी.
ठाकरे सरकारचं पहिलंवहिलं बजेट आज अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलं. कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर एकत्र येऊन सत्ता स्थापन करणाऱ्या सरकारचं बजेट नेमकं कसं असणार याकडे निव्वळ महाराष्ट्राचंच नाही तर अख्ख्या देशाचं लक्ष लागलं होतं. अशा या लक्षवेधी बजेटमधल्या ७ महत्त्वाच्या गोष्टी......
वेगवेगळी विचारधारा असलेल्या तीन पक्षांनी मिळून महाराष्ट्रात ठाकरे सरकार आणलं. पण गेल्या दोनेक दिवसांत महाविकास आघाडीतल्या मतभेदांना गंभीर वळण मिळालंय. कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर सत्तेवर आलेल्या या सरकारमधल्या तिन्ही पक्षांत धोरणात्मक मुद्द्यांवरून मतभेद असल्याचं समोर आलंय. त्याची कारण काय आहेत?
वेगवेगळी विचारधारा असलेल्या तीन पक्षांनी मिळून महाराष्ट्रात ठाकरे सरकार आणलं. पण गेल्या दोनेक दिवसांत महाविकास आघाडीतल्या मतभेदांना गंभीर वळण मिळालंय. कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर सत्तेवर आलेल्या या सरकारमधल्या तिन्ही पक्षांत धोरणात्मक मुद्द्यांवरून मतभेद असल्याचं समोर आलंय. त्याची कारण काय आहेत?.....
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'ला तासाभराची मुलाखत दिलीय. संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीत ठाकरे यांनी काँग्रेससोबत गेलो म्हणजे काँग्रेस सोडलं असं नसल्याचा दावा केला. तसंच सध्या कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसलेले मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपण विधान परिषद लढवणार असल्याचं स्पष्ट केलं. या मुलाखतीतले सहा ठळक मुद्दे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'ला तासाभराची मुलाखत दिलीय. संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीत ठाकरे यांनी काँग्रेससोबत गेलो म्हणजे काँग्रेस सोडलं असं नसल्याचा दावा केला. तसंच सध्या कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसलेले मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपण विधान परिषद लढवणार असल्याचं स्पष्ट केलं. या मुलाखतीतले सहा ठळक मुद्दे......
शिवसेनेच्या नेतृत्वात महाविकासआघाडीचं सरकार आल्यानंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेकओवर करण्याचा निर्णय घेतला. मराठीच्या मुद्द्याला बगल देत व्यापक हिंदुत्वाच्या दिशेने ते पावलं टाकतायत. २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी भगव्या झेंडा लाँच करून नवनिर्माणाचा नवा अजेंडा त्यांनी जाहीर केलाय. आता मात्र राज ठाकरेंना नवनिर्माणासाठी स्वनिर्मित, स्वयंप्रकाशित व्हावं लागेल.
शिवसेनेच्या नेतृत्वात महाविकासआघाडीचं सरकार आल्यानंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेकओवर करण्याचा निर्णय घेतला. मराठीच्या मुद्द्याला बगल देत व्यापक हिंदुत्वाच्या दिशेने ते पावलं टाकतायत. २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी भगव्या झेंडा लाँच करून नवनिर्माणाचा नवा अजेंडा त्यांनी जाहीर केलाय. आता मात्र राज ठाकरेंना नवनिर्माणासाठी स्वनिर्मित, स्वयंप्रकाशित व्हावं लागेल......
होणार होणार म्हणून शेवटी आज उद्धव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. अजितदादा पवार पुन्हा उपमुख्यमंत्री तर पहिल्यांदाच निवडून आलेले आदित्य ठाकरे मंत्री झाले. पण यापलीकडे या मंत्रिमंडळ विस्ताराचे काही महत्त्वाचे अर्थ आहेत. तीन पक्षांचं सरकार बनवताना जशी कसरत करावी लागली तशीच कसरत या विस्तारात आपल्याला बघायला मिळते.
होणार होणार म्हणून शेवटी आज उद्धव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. अजितदादा पवार पुन्हा उपमुख्यमंत्री तर पहिल्यांदाच निवडून आलेले आदित्य ठाकरे मंत्री झाले. पण यापलीकडे या मंत्रिमंडळ विस्ताराचे काही महत्त्वाचे अर्थ आहेत. तीन पक्षांचं सरकार बनवताना जशी कसरत करावी लागली तशीच कसरत या विस्तारात आपल्याला बघायला मिळते......
महाविकास आघाडी सरकारने नागपुरात विधिमंडळ अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली. या कर्जमाफीची नियमावली म्हणजेच शासनादेश काल रात्री उशिरा जारी करण्यात आला. या नियम अटींमुळे विरोधकांनी चहुबाजुंनी घेरत उद्धव ठाकरे सरकारवर सरसकट विश्वासघाताचा आरोप केलाय. ठाकरे सरकारच्या पहिल्या मोठ्या निर्णयावर टीका होतेय.
महाविकास आघाडी सरकारने नागपुरात विधिमंडळ अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली. या कर्जमाफीची नियमावली म्हणजेच शासनादेश काल रात्री उशिरा जारी करण्यात आला. या नियम अटींमुळे विरोधकांनी चहुबाजुंनी घेरत उद्धव ठाकरे सरकारवर सरसकट विश्वासघाताचा आरोप केलाय. ठाकरे सरकारच्या पहिल्या मोठ्या निर्णयावर टीका होतेय......
कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल आला. भाजपने १५ पैकी १३ जागांवर आघाडी घेतलीय. दुसरीकडे काँग्रेस आणि जेडीएस यांचा सुपडा साफ झालाय. या निकालाने पोटनिवडणुकीत पराभवाची आपली परंपरा भाजपने मोडीत काढलीय. पण महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या सरकारने या निकालातून धडा घेतला पाहिजे.
कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल आला. भाजपने १५ पैकी १३ जागांवर आघाडी घेतलीय. दुसरीकडे काँग्रेस आणि जेडीएस यांचा सुपडा साफ झालाय. या निकालाने पोटनिवडणुकीत पराभवाची आपली परंपरा भाजपने मोडीत काढलीय. पण महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या सरकारने या निकालातून धडा घेतला पाहिजे......