आजच्या काळात प्रेम हे कुठेतरी हरवलेलं दिसतंय. तरुणाईला आकर्षण आणि प्रेम यामधला फरक समजत नाही. आजच्या तरुणाईला स्पेस हवी असते. पण ही स्पेस घेताघेता ते एकमेकांपासून कधी दुरावतात, ते समजतही नाही. ग्लोबल जगासोबत वेगाने दौडणाऱ्या या तरुणाईने तितकीच वेगवान स्वरूपात आपल्या प्रेमाची व्याख्या केलेली दिसते.
आजच्या काळात प्रेम हे कुठेतरी हरवलेलं दिसतंय. तरुणाईला आकर्षण आणि प्रेम यामधला फरक समजत नाही. आजच्या तरुणाईला स्पेस हवी असते. पण ही स्पेस घेताघेता ते एकमेकांपासून कधी दुरावतात, ते समजतही नाही. ग्लोबल जगासोबत वेगाने दौडणाऱ्या या तरुणाईने तितकीच वेगवान स्वरूपात आपल्या प्रेमाची व्याख्या केलेली दिसते......
प्रेमाच्या संकल्पना प्रत्येकासाठी वेगवेगळ्या आहेत. नातं कोणतंही असो तुम्ही एकमेकांना किती समजून घेता, एकमेकांचा किती सन्मान करता आणि त्याचं पावित्र्य कसं जपता यावर त्या नात्याची वीण किती घट्ट असेल हे अवलंबून असतं. सो कॉल्ड प्रेमामुळे काहींच्या आयुष्याची गणितं बदलतात तर काहींच्या आयुष्याचाच गुंता होतो. कुणावर सर्वस्व उधळलं म्हणून त्या नात्याला चकाकी येत नाही.
प्रेमाच्या संकल्पना प्रत्येकासाठी वेगवेगळ्या आहेत. नातं कोणतंही असो तुम्ही एकमेकांना किती समजून घेता, एकमेकांचा किती सन्मान करता आणि त्याचं पावित्र्य कसं जपता यावर त्या नात्याची वीण किती घट्ट असेल हे अवलंबून असतं. सो कॉल्ड प्रेमामुळे काहींच्या आयुष्याची गणितं बदलतात तर काहींच्या आयुष्याचाच गुंता होतो. कुणावर सर्वस्व उधळलं म्हणून त्या नात्याला चकाकी येत नाही......