सोंगाड्या सिनेमातल्या ‘बिब्बं घ्या बिब्बं’ पासून ते ‘भारतात भाग्यवंत देश कोणता?’ हे महाराष्ट्र गीत लिहिणाऱ्या शाहीर कुंतिनाथ करके यांचं २२ मार्चला निधन झालं. अनेक पोवाडे, लावण्या, शाहिरी गाणी, सिनेमातली गाणी त्यांनी लिहिली. विशेष म्हणजे, ‘स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज, युनिवर्सिटी ऑफ लंडन’ या संस्थेनंही त्याचे पोवाडे आणि शाहिरी ध्वनीमुद्रीत केल्यात.
सोंगाड्या सिनेमातल्या ‘बिब्बं घ्या बिब्बं’ पासून ते ‘भारतात भाग्यवंत देश कोणता?’ हे महाराष्ट्र गीत लिहिणाऱ्या शाहीर कुंतिनाथ करके यांचं २२ मार्चला निधन झालं. अनेक पोवाडे, लावण्या, शाहिरी गाणी, सिनेमातली गाणी त्यांनी लिहिली. विशेष म्हणजे, ‘स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज, युनिवर्सिटी ऑफ लंडन’ या संस्थेनंही त्याचे पोवाडे आणि शाहिरी ध्वनीमुद्रीत केल्यात......
महाराजा सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानाचे महत्त्वाचे राजे. स्त्री ही समाजजीवनात पुरुषांइतकीच महत्वाची आहे हे महाराजांनी ओळखलं. म्हणूनच त्यांनी स्त्रीशिक्षणाचे हुकुम काढून ऐतिहासिक निर्णय घेतले. महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्रे साधने प्रकाशन समिती’ कडून सयाजीरावांवर नुकतेच ५० ग्रंथ प्रसिद्ध केलेत. त्यातला सयाजीरावांच्या स्त्रीविषयक सुधारणांवर प्रकाश टाकणाऱ्या ग्रंथाची ओळख करून देणारा हा लेख.
महाराजा सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानाचे महत्त्वाचे राजे. स्त्री ही समाजजीवनात पुरुषांइतकीच महत्वाची आहे हे महाराजांनी ओळखलं. म्हणूनच त्यांनी स्त्रीशिक्षणाचे हुकुम काढून ऐतिहासिक निर्णय घेतले. महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्रे साधने प्रकाशन समिती’ कडून सयाजीरावांवर नुकतेच ५० ग्रंथ प्रसिद्ध केलेत. त्यातला सयाजीरावांच्या स्त्रीविषयक सुधारणांवर प्रकाश टाकणाऱ्या ग्रंथाची ओळख करून देणारा हा लेख......
दलित त्यातही बौद्धांचा विकास आरक्षणामुळे झाला. याचा ‘म्हणून आमचा विकास थांबला’ असा चुकीचा अर्थ तरूण तरूणींच्या मनात तयार होत गेला. त्याला जाणीवपूर्वक द्वेषात रूपांतर करण्याचं काम राजकारण्यांनी चोख केलं. आंदोलकांना तोफेच्या तोंडी देऊन सरकारं आपलं हित साधेल. पण आरक्षण मिळणाऱ्या समूहांबद्दलचा दुस्वास यानंतर अधिक वाढेल यात शंका नाही.
दलित त्यातही बौद्धांचा विकास आरक्षणामुळे झाला. याचा ‘म्हणून आमचा विकास थांबला’ असा चुकीचा अर्थ तरूण तरूणींच्या मनात तयार होत गेला. त्याला जाणीवपूर्वक द्वेषात रूपांतर करण्याचं काम राजकारण्यांनी चोख केलं. आंदोलकांना तोफेच्या तोंडी देऊन सरकारं आपलं हित साधेल. पण आरक्षण मिळणाऱ्या समूहांबद्दलचा दुस्वास यानंतर अधिक वाढेल यात शंका नाही......
मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाचा तात्पुरता स्टे आहे. कायमचा नाही. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे घाबरण्याचं आणि गैरसमज पसरवण्याचं काही कारण नाही. घटना पीठासमोर सर्व पुरावे आल्यानंतर आरक्षण १०० टक्के टिकेल अशी कायदेतज्ञांची खात्री आहे. त्यामुळे न्यायालयीन लढाई सक्षमपणे लढणं हाच पर्याय आहे. परंतु काही जाणकार काही पर्याय पुढे आणत आहेत.
मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाचा तात्पुरता स्टे आहे. कायमचा नाही. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे घाबरण्याचं आणि गैरसमज पसरवण्याचं काही कारण नाही. घटना पीठासमोर सर्व पुरावे आल्यानंतर आरक्षण १०० टक्के टिकेल अशी कायदेतज्ञांची खात्री आहे. त्यामुळे न्यायालयीन लढाई सक्षमपणे लढणं हाच पर्याय आहे. परंतु काही जाणकार काही पर्याय पुढे आणत आहेत......
सयाजीराव गायकवाडांसारखा राजा भारतात झाला नाही, पुढे होणार नाही. भारताच्या निरनिराळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या कार्यालयात इतर फोटो टांगण्याऐवजी सयाजीरावांचा फोटो लावावा, असं प्र. के. अत्र्यांनी लिहून ठेवलंय. अशा सयाजीराव गायकवाड यांच्यावरील छोटेखानी चरित्राचा हा परिचय.
सयाजीराव गायकवाडांसारखा राजा भारतात झाला नाही, पुढे होणार नाही. भारताच्या निरनिराळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या कार्यालयात इतर फोटो टांगण्याऐवजी सयाजीरावांचा फोटो लावावा, असं प्र. के. अत्र्यांनी लिहून ठेवलंय. अशा सयाजीराव गायकवाड यांच्यावरील छोटेखानी चरित्राचा हा परिचय......
सयाजीराव गायकवाड महाराजांनी अनेकांना घडवलं. सढळहस्ते मदत करुन महत्त्वाच्या नेत्यांना उभं केलं. त्यांच कार्यकर्तृत्व ओळखून त्यांच्या मागे आर्थिक पाठबळही उभारलं. चांगल्या कामाच्या मागे मदत उभी करुन त्यांनी खऱ्याअर्थाने भारताच्या आधुनिक जडणघडणीचा पाया रचला. सयाजीराव गायकवाड महाराज जयंती विशेष.
सयाजीराव गायकवाड महाराजांनी अनेकांना घडवलं. सढळहस्ते मदत करुन महत्त्वाच्या नेत्यांना उभं केलं. त्यांच कार्यकर्तृत्व ओळखून त्यांच्या मागे आर्थिक पाठबळही उभारलं. चांगल्या कामाच्या मागे मदत उभी करुन त्यांनी खऱ्याअर्थाने भारताच्या आधुनिक जडणघडणीचा पाया रचला. सयाजीराव गायकवाड महाराज जयंती विशेष......
महाराजा सयाजीराव गायकवाड यांची कारकीर्द अनेक बाबतीत वेगळी तर होतीच, पण देशाच्या सर्व प्रकारच्या सुधारणांची पायाभरणी करणारी होती. देशाच्या आधुनिकतेचा पाया रचण्यात सयाजीरावांचं योगदान अमुल्य आहे. त्यांनी घेतलेले असेच काही निर्णय हे त्यांच्या दुरदृष्टीची साक्ष देतात. सयाजीराव गायकवाड महाराज जयंती विशेष.
महाराजा सयाजीराव गायकवाड यांची कारकीर्द अनेक बाबतीत वेगळी तर होतीच, पण देशाच्या सर्व प्रकारच्या सुधारणांची पायाभरणी करणारी होती. देशाच्या आधुनिकतेचा पाया रचण्यात सयाजीरावांचं योगदान अमुल्य आहे. त्यांनी घेतलेले असेच काही निर्णय हे त्यांच्या दुरदृष्टीची साक्ष देतात. सयाजीराव गायकवाड महाराज जयंती विशेष......
शिकागो इथं १९३३ साली झालेल्या दुसऱ्या जागतिक सर्व धर्म परिषदेचं अध्यक्षस्थान महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी भूषविलं. या परिषदेतल्या सयाजीरावांच्या भाषणावर ज्येष्ठ लेखक, महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे चिटणीस बाबा भांड यांनी केलेलं भाष्य.
शिकागो इथं १९३३ साली झालेल्या दुसऱ्या जागतिक सर्व धर्म परिषदेचं अध्यक्षस्थान महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी भूषविलं. या परिषदेतल्या सयाजीरावांच्या भाषणावर ज्येष्ठ लेखक, महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे चिटणीस बाबा भांड यांनी केलेलं भाष्य......
तसं कुठलाही राजा हा उत्तम व्यवस्थापक असायलाच हवा. तरच तो प्रभावी राजा होऊ शकतो. पण सगळेच राजे काही तसे नसतात. बडोद्याचे नरेश सयाजीराव गायकवाड महाराज केवळ उत्तम व्यवस्थापकच नव्हते तर ते व्यवस्थापन शास्त्राचे दीपस्तंभ होते. तेव्हाही आणि आताही. केवळ राजांसाठीच नाही तर आजही सर्वच प्रकारच्या संस्था, कंपन्यांसाठी ते एक सर्वोत्तम मॅनेजमेंट गुरू आहेत. सयाजीराव गायकवाड महाराज जयंती विशेष.
तसं कुठलाही राजा हा उत्तम व्यवस्थापक असायलाच हवा. तरच तो प्रभावी राजा होऊ शकतो. पण सगळेच राजे काही तसे नसतात. बडोद्याचे नरेश सयाजीराव गायकवाड महाराज केवळ उत्तम व्यवस्थापकच नव्हते तर ते व्यवस्थापन शास्त्राचे दीपस्तंभ होते. तेव्हाही आणि आताही. केवळ राजांसाठीच नाही तर आजही सर्वच प्रकारच्या संस्था, कंपन्यांसाठी ते एक सर्वोत्तम मॅनेजमेंट गुरू आहेत. सयाजीराव गायकवाड महाराज जयंती विशेष......
आजचा आंबेडकरी समाज द्विधा मन:स्थितीत आहे. प्रस्थापितांच्या अस्मितावादी राजकारणात तो पुरता अडकलाय. बाबासाहेबांनी स्पष्ट राजकीय भान आणि भूमिका दिलेल्या समाजाची आज अशी स्थिती का व्हावी, हा मोठा प्रश्न आहे. खरंतरं आज दलित नेतृत्वाने आणि समाजानेही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. दलित समाज आणि राजकारण यांच्यातल्या कोंडीचा विश्लेषण करणारा हा लेख.
आजचा आंबेडकरी समाज द्विधा मन:स्थितीत आहे. प्रस्थापितांच्या अस्मितावादी राजकारणात तो पुरता अडकलाय. बाबासाहेबांनी स्पष्ट राजकीय भान आणि भूमिका दिलेल्या समाजाची आज अशी स्थिती का व्हावी, हा मोठा प्रश्न आहे. खरंतरं आज दलित नेतृत्वाने आणि समाजानेही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. दलित समाज आणि राजकारण यांच्यातल्या कोंडीचा विश्लेषण करणारा हा लेख......