गृहमंत्री अमित शहा यांच्या हिंदी राष्ट्रभाषा करण्याच्या मुद्दावरून तयार झालेलं वादळ अजून पूर्ण शांत झालं नाही. खरंतर भारतातल्या दाक्षिणात्य देशांनी हिंदीला मनापासून स्वीकारल्याशिवाय हिंदी राष्ट्रभाषा होऊ शकत नाही. पण असं करण्याचा प्रयत्न केला गेला तर पाकिस्तानप्रमाणेच भारताचेही दोन भाग पडायला वेळ लागणार नाही.
गृहमंत्री अमित शहा यांच्या हिंदी राष्ट्रभाषा करण्याच्या मुद्दावरून तयार झालेलं वादळ अजून पूर्ण शांत झालं नाही. खरंतर भारतातल्या दाक्षिणात्य देशांनी हिंदीला मनापासून स्वीकारल्याशिवाय हिंदी राष्ट्रभाषा होऊ शकत नाही. पण असं करण्याचा प्रयत्न केला गेला तर पाकिस्तानप्रमाणेच भारताचेही दोन भाग पडायला वेळ लागणार नाही......
विविधतेत एकता हे भारताचं वैशिष्ट्य म्हणून सांगितलं जातं. भारताची जगभरात तशी ओळखही आहे. पण केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार आता ही विविधता बाजूला सारून निव्वळ एकात्मता साधण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप होतोय. गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी देशाच्या एकात्मतेसाठी हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा भूमिका मांडल्याने तर या आरोपांना बळ मिळतंय.
विविधतेत एकता हे भारताचं वैशिष्ट्य म्हणून सांगितलं जातं. भारताची जगभरात तशी ओळखही आहे. पण केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार आता ही विविधता बाजूला सारून निव्वळ एकात्मता साधण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप होतोय. गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी देशाच्या एकात्मतेसाठी हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा भूमिका मांडल्याने तर या आरोपांना बळ मिळतंय......