शिवसेना ओळखली जाते, ती संघर्षासाठी. आता मात्र ती अंतर्गत संघर्षानं बेजार आहे. दोन्ही बाजूंनी मुद्दे अनेक मांडले जातील. निकाल बाजूने-विरोधात लागत राहतील. पण शेवटी लोकशाहीत लोकच अंतिम निकाल देतात, त्यामुळे लोकांच्या न्यायालयात, खरी शिवसेना कुणाची हे ठरवलं जाईल. त्यामुळे तिथं काय होऊ शकेल? ते पहायला हवं.
शिवसेना ओळखली जाते, ती संघर्षासाठी. आता मात्र ती अंतर्गत संघर्षानं बेजार आहे. दोन्ही बाजूंनी मुद्दे अनेक मांडले जातील. निकाल बाजूने-विरोधात लागत राहतील. पण शेवटी लोकशाहीत लोकच अंतिम निकाल देतात, त्यामुळे लोकांच्या न्यायालयात, खरी शिवसेना कुणाची हे ठरवलं जाईल. त्यामुळे तिथं काय होऊ शकेल? ते पहायला हवं......
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण मंत्रिमंडळासह २६-२७ नोव्हेंबरला पुन्हा एकदा गुवाहटीला जाणार आहेत. मातृपक्ष शिवसेनेतून केलेली बंडखोरी यशस्वी झाल्याबद्दल, माता कामाख्यादेवीचा नवस फेडण्यासाठी मुख्यमंत्री जातायत. कामाख्यादेवीचं हे मंदिर योनीरूपात देवीची पूजा करणारं महत्त्वाचं शक्तीपीठ आहे. त्याबद्दल समजून घेणं, स्वतःला समृ्द्ध करणारं ठरू शकेल.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण मंत्रिमंडळासह २६-२७ नोव्हेंबरला पुन्हा एकदा गुवाहटीला जाणार आहेत. मातृपक्ष शिवसेनेतून केलेली बंडखोरी यशस्वी झाल्याबद्दल, माता कामाख्यादेवीचा नवस फेडण्यासाठी मुख्यमंत्री जातायत. कामाख्यादेवीचं हे मंदिर योनीरूपात देवीची पूजा करणारं महत्त्वाचं शक्तीपीठ आहे. त्याबद्दल समजून घेणं, स्वतःला समृ्द्ध करणारं ठरू शकेल......
अमरावतीतून ‘खोके’ शब्द सरकारी गोटातून उच्चारला जाताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही सरकारांनी एकाच तडफेने खुलासा करणं अपेक्षित होतं. तसंच अपक्ष आमदार रवी राणांना गप्प करायला हवं होतं. बच्चू कडूंची साथ द्यायला हवी होती. पण, तसं झालं नाही. त्यामुळे या दोन्ही सरकारांच्या मौनातून काही राजकीय संकेत मिळतायत.
अमरावतीतून ‘खोके’ शब्द सरकारी गोटातून उच्चारला जाताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही सरकारांनी एकाच तडफेने खुलासा करणं अपेक्षित होतं. तसंच अपक्ष आमदार रवी राणांना गप्प करायला हवं होतं. बच्चू कडूंची साथ द्यायला हवी होती. पण, तसं झालं नाही. त्यामुळे या दोन्ही सरकारांच्या मौनातून काही राजकीय संकेत मिळतायत......
वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क आणि आता टाटा एअरबस असे महाराष्ट्रात येऊ घातलेले तीन प्रोजेक्ट गुजरातला गेलेत. हा प्रोजेक्ट पळवापळवीचा खेळ काही सहजपणे झालेला नाही. गुजरात विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून खेळी खेळली गेलीय. त्यात महाराष्ट्रातल्या शिंदे-फडणवीस सरकारला हाताशी धरुन महाराष्ट्राचं महत्व कमी करायचा घाट घातला गेलाय.
वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क आणि आता टाटा एअरबस असे महाराष्ट्रात येऊ घातलेले तीन प्रोजेक्ट गुजरातला गेलेत. हा प्रोजेक्ट पळवापळवीचा खेळ काही सहजपणे झालेला नाही. गुजरात विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून खेळी खेळली गेलीय. त्यात महाराष्ट्रातल्या शिंदे-फडणवीस सरकारला हाताशी धरुन महाराष्ट्राचं महत्व कमी करायचा घाट घातला गेलाय......
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं दसरा मेळाव्यातलं भाषण फसलं. उद्धव ठाकरे यांचं भाषण त्यांच्यापेक्षा चांगलं झालं, पण त्यात नवीन काहीच नव्हतं. नव्या पक्षाची मुहूर्तमेढ रचण्याची ही संधी असल्याचं शिंदेंना कळलंच नाही. तिथं शिवसैनिक अजूनही आपल्यासोबत आहेत, याचं समाधान शिवाजी पार्कच्या गर्दीने उद्धव यांना दिलं. पण त्या समाधानात अनेक प्रश्न दडले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं दसरा मेळाव्यातलं भाषण फसलं. उद्धव ठाकरे यांचं भाषण त्यांच्यापेक्षा चांगलं झालं, पण त्यात नवीन काहीच नव्हतं. नव्या पक्षाची मुहूर्तमेढ रचण्याची ही संधी असल्याचं शिंदेंना कळलंच नाही. तिथं शिवसैनिक अजूनही आपल्यासोबत आहेत, याचं समाधान शिवाजी पार्कच्या गर्दीने उद्धव यांना दिलं. पण त्या समाधानात अनेक प्रश्न दडले आहेत......
पाच वर्षांपूर्वी राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी शरद यादव आणि अली अन्वर या दोघांची खासदारकी रद्द ठरवली. ज्या संयुक्त जनता दलाच्या तिकिटावर ते राज्यसभेवर गेले त्याच पक्षाविरुद्ध त्यांनी कारवाया केल्या. विधानं केली. भाजपशी युती करायला विरोध केला. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत सेनेच्या ४० बंडखोर आमदारांनीही हाच गुन्हा केला आहे. त्यामुळे फैसला घटनापीठाच्या हाती आहे.
पाच वर्षांपूर्वी राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी शरद यादव आणि अली अन्वर या दोघांची खासदारकी रद्द ठरवली. ज्या संयुक्त जनता दलाच्या तिकिटावर ते राज्यसभेवर गेले त्याच पक्षाविरुद्ध त्यांनी कारवाया केल्या. विधानं केली. भाजपशी युती करायला विरोध केला. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत सेनेच्या ४० बंडखोर आमदारांनीही हाच गुन्हा केला आहे. त्यामुळे फैसला घटनापीठाच्या हाती आहे......
बंडखोर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे या दोघांत शिवसेना कुणाची, यावरून सध्या संघर्ष सुरू आहे. शिवसेनाप्रमुखांच्या मातोश्रीला एकटं पाडण्यासाठीच या शिंदे छत्रीची प्रतिष्ठापना दिल्लीश्वरांनी केली आहे. शिंदे गटाला आता उद्घव ठाकरे नकोत, ‘मातोश्री’ नावाचा रिमोट कंट्रोल नको. सत्ता मिळवून देणारा ब्रँड म्हणून शिवसेना मात्र हवी आहे ती केवळ ही छत्री चालावी म्हणून!
बंडखोर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे या दोघांत शिवसेना कुणाची, यावरून सध्या संघर्ष सुरू आहे. शिवसेनाप्रमुखांच्या मातोश्रीला एकटं पाडण्यासाठीच या शिंदे छत्रीची प्रतिष्ठापना दिल्लीश्वरांनी केली आहे. शिंदे गटाला आता उद्घव ठाकरे नकोत, ‘मातोश्री’ नावाचा रिमोट कंट्रोल नको. सत्ता मिळवून देणारा ब्रँड म्हणून शिवसेना मात्र हवी आहे ती केवळ ही छत्री चालावी म्हणून!.....
देवेंद्र फडणवीस हेच आजच्या महाराष्ट्रातलं खरे किंगमेकर आहेत हे महिनाभरातल्या घडामोडींवरून सिद्ध झालंय. देवेंद्र फडणवीस ही एक व्यक्ती आहे, त्याबरोबरच ते एक राजकीय प्रारूपही आहे. हे राजकीय प्रारूप समजून घेतलं, तर सत्तांतर का झालं? ते समजून येतं. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सत्ता का दिली? यांची कारणंही समजून घेता येतात.
देवेंद्र फडणवीस हेच आजच्या महाराष्ट्रातलं खरे किंगमेकर आहेत हे महिनाभरातल्या घडामोडींवरून सिद्ध झालंय. देवेंद्र फडणवीस ही एक व्यक्ती आहे, त्याबरोबरच ते एक राजकीय प्रारूपही आहे. हे राजकीय प्रारूप समजून घेतलं, तर सत्तांतर का झालं? ते समजून येतं. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सत्ता का दिली? यांची कारणंही समजून घेता येतात. .....
घराणेशाहीवर आधारित पक्ष काही काळ निर्धोकपणे राज्य करू शकतात, पण त्यांनाही अनेकदा अपयशाचा सामना करावा लागतो. याचं कारण, मुख्य नेत्याचा करिश्मा संपला किंवा त्यांच्या वारसदारांची मर्यादित लोकप्रियताही घसरणीला लागली, तर पक्षाचे बारा वाजायला वेळ लागत नाही. म्हणून अगदी घराणेशाहीयुक्त पक्ष असला, तरी त्यातही किमान लोकशाही तरी हवी. नाहीतर आजच्या शिवसेनेसारखी दुरवस्था होऊ शकते.
घराणेशाहीवर आधारित पक्ष काही काळ निर्धोकपणे राज्य करू शकतात, पण त्यांनाही अनेकदा अपयशाचा सामना करावा लागतो. याचं कारण, मुख्य नेत्याचा करिश्मा संपला किंवा त्यांच्या वारसदारांची मर्यादित लोकप्रियताही घसरणीला लागली, तर पक्षाचे बारा वाजायला वेळ लागत नाही. म्हणून अगदी घराणेशाहीयुक्त पक्ष असला, तरी त्यातही किमान लोकशाही तरी हवी. नाहीतर आजच्या शिवसेनेसारखी दुरवस्था होऊ शकते......
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अभूतपूर्व राजकीय नाट्य पहायला मिळतंय. शिवसेना नेते एकनाथ शिंदेच्या बंडामुळे सरकारसमोर पेच निर्माण झालाय. भाजपच्या या 'ऑपरेशन लोटस'ची तयारी मागच्या अनेक वर्षापासूनची आहे. त्यात त्यांना यश आलंय. दुसरीकडे बाळासाहेबांच्या पुण्याईमुळे बंड होणार नाही हे उद्धव ठाकरेंनी गृहित धरल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आलीय.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अभूतपूर्व राजकीय नाट्य पहायला मिळतंय. शिवसेना नेते एकनाथ शिंदेच्या बंडामुळे सरकारसमोर पेच निर्माण झालाय. भाजपच्या या 'ऑपरेशन लोटस'ची तयारी मागच्या अनेक वर्षापासूनची आहे. त्यात त्यांना यश आलंय. दुसरीकडे बाळासाहेबांच्या पुण्याईमुळे बंड होणार नाही हे उद्धव ठाकरेंनी गृहित धरल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आलीय......
एकेकाळी तेजतर्रार असलेले जितेंद्र आव्हाड आता ठाण्याच्या स्थानिक राजकारणात कमालीचे मवाळ झालेले दिसतात. ठाणे महापालिकेवर एकनाथ शिंदेंचा कन्ट्रोल असल्यामुळे त्यांना दुखावण्याची ‘रिस्क’ आव्हाड यांना घ्यायची नाही, असं दिसतं. त्यामुळे ऐनवेळी आपल्या स्वार्थासाठी ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांचा खांदा वापरला जातो. परांजपे यांना ‘बळीचा बकरा’ करण्याची राष्ट्रवादीची ही परंपरा नवी नाही.
एकेकाळी तेजतर्रार असलेले जितेंद्र आव्हाड आता ठाण्याच्या स्थानिक राजकारणात कमालीचे मवाळ झालेले दिसतात. ठाणे महापालिकेवर एकनाथ शिंदेंचा कन्ट्रोल असल्यामुळे त्यांना दुखावण्याची ‘रिस्क’ आव्हाड यांना घ्यायची नाही, असं दिसतं. त्यामुळे ऐनवेळी आपल्या स्वार्थासाठी ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांचा खांदा वापरला जातो. परांजपे यांना ‘बळीचा बकरा’ करण्याची राष्ट्रवादीची ही परंपरा नवी नाही......
शिवसेनेच्या वैद्यकिय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या शिवसेनेच्या मदत कक्षासोबतच मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून आजपर्यंत लाखो रुग्णांना उपचारासाठी निधी मिळालाय. त्यातल्या अनेकांचे प्राण वाचलेत. पत्रकारितेतली चांगली नोकरी सोडून रुग्णसेवेसाठी धावपळ करणाऱ्या मंगेश चिवटे यांच्याविषयी निवांतपणे वाचण्याचा आजचा दिवस आहे.
शिवसेनेच्या वैद्यकिय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या शिवसेनेच्या मदत कक्षासोबतच मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून आजपर्यंत लाखो रुग्णांना उपचारासाठी निधी मिळालाय. त्यातल्या अनेकांचे प्राण वाचलेत. पत्रकारितेतली चांगली नोकरी सोडून रुग्णसेवेसाठी धावपळ करणाऱ्या मंगेश चिवटे यांच्याविषयी निवांतपणे वाचण्याचा आजचा दिवस आहे......