शिवसेना ओळखली जाते, ती संघर्षासाठी. आता मात्र ती अंतर्गत संघर्षानं बेजार आहे. दोन्ही बाजूंनी मुद्दे अनेक मांडले जातील. निकाल बाजूने-विरोधात लागत राहतील. पण शेवटी लोकशाहीत लोकच अंतिम निकाल देतात, त्यामुळे लोकांच्या न्यायालयात, खरी शिवसेना कुणाची हे ठरवलं जाईल. त्यामुळे तिथं काय होऊ शकेल? ते पहायला हवं.
शिवसेना ओळखली जाते, ती संघर्षासाठी. आता मात्र ती अंतर्गत संघर्षानं बेजार आहे. दोन्ही बाजूंनी मुद्दे अनेक मांडले जातील. निकाल बाजूने-विरोधात लागत राहतील. पण शेवटी लोकशाहीत लोकच अंतिम निकाल देतात, त्यामुळे लोकांच्या न्यायालयात, खरी शिवसेना कुणाची हे ठरवलं जाईल. त्यामुळे तिथं काय होऊ शकेल? ते पहायला हवं......
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या पत्रकारांसाठी ‘एचएमवी’ म्हणजेच ‘हिज मास्टर्स वॉइस’ असा शब्द वापरला. याधीही पत्रकारांसाठी डीओडी, गोदी मीडिया, चहा-बिस्कीट, प्रेस्टिट्यूट असे शब्द सर्रास वापरले गेलेत. या विशेषणांवर मात्र सगळेच पत्रकार मूग गिळून गप्प बसलेत. हे लोकशाहीसाठी घातक ठरतंय.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या पत्रकारांसाठी ‘एचएमवी’ म्हणजेच ‘हिज मास्टर्स वॉइस’ असा शब्द वापरला. याधीही पत्रकारांसाठी डीओडी, गोदी मीडिया, चहा-बिस्कीट, प्रेस्टिट्यूट असे शब्द सर्रास वापरले गेलेत. या विशेषणांवर मात्र सगळेच पत्रकार मूग गिळून गप्प बसलेत. हे लोकशाहीसाठी घातक ठरतंय......
अपेक्षित उत्पन्न लक्षात घेऊन त्याप्रमाणात किंवा काहीवेळा चॅनल नवं असेल तर किंवा ब्रँड टिकवून ठेवण्यासाठी खूपच जास्तही खर्च केला जातो. खर्च ही एकप्रकारे गुंतवणूक असते कारण प्रत्येक चॅनल किंवा टीवी समूह ज्यासाठी सर्व आटापिटा करत असतो. ते लक्ष्य असतं ३२ हजार कोटींचं! हा आकडा भारतातील टीवी चॅनलना मिळणाऱ्या वार्षिक जाहिरात उत्पन्नाचा आहे. यासाठी सगळे चॅनेल प्रयत्न करत असतात.
अपेक्षित उत्पन्न लक्षात घेऊन त्याप्रमाणात किंवा काहीवेळा चॅनल नवं असेल तर किंवा ब्रँड टिकवून ठेवण्यासाठी खूपच जास्तही खर्च केला जातो. खर्च ही एकप्रकारे गुंतवणूक असते कारण प्रत्येक चॅनल किंवा टीवी समूह ज्यासाठी सर्व आटापिटा करत असतो. ते लक्ष्य असतं ३२ हजार कोटींचं! हा आकडा भारतातील टीवी चॅनलना मिळणाऱ्या वार्षिक जाहिरात उत्पन्नाचा आहे. यासाठी सगळे चॅनेल प्रयत्न करत असतात......
भावनांना वापरणं सर्वात सोपं असतं. तसं सुशांत प्रकरणातही झालं. करण जोहर वगैरेंचा तडका तेवढा चित्तवेधक ठरत नाही दिसताच पुन्हा त्यात ‘खान’दानीपणा देऊन धार्मिक रंग मिसळण्याचा प्रयत्न झाला. प्रकरण चांगलंच तापत असताना अचानक थंडावलं. राजकारणी राजकीय डाव खेळले. माध्यमांनी त्यांचे अजेंडे चालवले. रोजच्या जगण्यात काय भोगावं लागतंय ते वास्तव विसरून आपण या सगळ्या भ्रमात अडकलो.
भावनांना वापरणं सर्वात सोपं असतं. तसं सुशांत प्रकरणातही झालं. करण जोहर वगैरेंचा तडका तेवढा चित्तवेधक ठरत नाही दिसताच पुन्हा त्यात ‘खान’दानीपणा देऊन धार्मिक रंग मिसळण्याचा प्रयत्न झाला. प्रकरण चांगलंच तापत असताना अचानक थंडावलं. राजकारणी राजकीय डाव खेळले. माध्यमांनी त्यांचे अजेंडे चालवले. रोजच्या जगण्यात काय भोगावं लागतंय ते वास्तव विसरून आपण या सगळ्या भ्रमात अडकलो......
पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. पुण्यात टीवी ९ या न्यूज चॅनेलचे रिपोर्टर म्हणून ते कार्यरत होते. पांडुरंग यांचा व्यवस्थेनं बळी घेतलाय असं आपण म्हणतोय. पण ही व्यवस्था असते काय? ती काही फक्त राजकारणी, प्रशासन मिळून तयार होत नाही, सिस्टममधे आपणही असतोच असतो. जेव्हा सिस्टमने पांडुरंगचा बळी घेतला म्हणतो तेव्हा तो आपणही घेतलेला आहे.
पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. पुण्यात टीवी ९ या न्यूज चॅनेलचे रिपोर्टर म्हणून ते कार्यरत होते. पांडुरंग यांचा व्यवस्थेनं बळी घेतलाय असं आपण म्हणतोय. पण ही व्यवस्था असते काय? ती काही फक्त राजकारणी, प्रशासन मिळून तयार होत नाही, सिस्टममधे आपणही असतोच असतो. जेव्हा सिस्टमने पांडुरंगचा बळी घेतला म्हणतो तेव्हा तो आपणही घेतलेला आहे......
सुनील ईरावार म्हणजे नांदेडच्या किनवटचे मनसे शहराध्यक्ष. राजकारण करायला पैसा आणि जात नसल्याने नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली. सुनीलसारखे कार्यकर्ते नेत्यांपेक्षाही मोठे म्हणायला हवेत. पण गरज पडेल तेव्हा अशा कार्यकर्त्यांना आर्थिक किंवा निदान मानसिक आधार द्यायला कुणीही नेता पुढे होत येत नाही.
सुनील ईरावार म्हणजे नांदेडच्या किनवटचे मनसे शहराध्यक्ष. राजकारण करायला पैसा आणि जात नसल्याने नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली. सुनीलसारखे कार्यकर्ते नेत्यांपेक्षाही मोठे म्हणायला हवेत. पण गरज पडेल तेव्हा अशा कार्यकर्त्यांना आर्थिक किंवा निदान मानसिक आधार द्यायला कुणीही नेता पुढे होत येत नाही......
मराठीतील संपादकांचं आपल्या आईविषयीचं मनोगत असलेल्या ‘मु. पो. आई’ या पुस्तकाचं माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी प्रकाशन केलं. मंगळवारी, २३ नोव्हेंबरला मुंबईत हा कार्यक्रम झाला. पत्रकार संदीप काळे संपादित या पुस्तकाला शरद पवारांचीच प्रस्तावना आहे. आपण राजकारणात सध्या जे काही आहोत, ते सगळं आईमुळं अशी प्रांजळ भावना पवारांनी या प्रस्तावनेत नोंदवलीय.
मराठीतील संपादकांचं आपल्या आईविषयीचं मनोगत असलेल्या ‘मु. पो. आई’ या पुस्तकाचं माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी प्रकाशन केलं. मंगळवारी, २३ नोव्हेंबरला मुंबईत हा कार्यक्रम झाला. पत्रकार संदीप काळे संपादित या पुस्तकाला शरद पवारांचीच प्रस्तावना आहे. आपण राजकारणात सध्या जे काही आहोत, ते सगळं आईमुळं अशी प्रांजळ भावना पवारांनी या प्रस्तावनेत नोंदवलीय......