संविधान हे आपल्या एकूण जगण्याचा पाया आहे. स्वातंत्र्यानंतर एक देश म्हणून, समाज म्हणून जगताना आपण कसं जगणार, कोणती मूल्यं घेऊन जगणार, हे संविधानाच्या माध्यमातून ठरवण्यात आलं. पण आज या संविधानाविषयीच स्वतःला सुशिक्षित म्हणवणारी मंडळीही अनभिज्ञ आहेत. अशा वातावरणात संविधानातल्या मूल्यांचा प्रचार, प्रसार करण्याचं काम सुरेश सावंत आणि काही समविचारी मंडळी करतायत. हे काम करताना सुरेश सावंत यांना आलेले हे अनुभव एक समाज म्हणून आपल्याला जागं करणारे आहेत.
आज राष्ट्रीय कन्या दिवस. आजचा हा दिवस, जो भारत देशातल्या सर्व मुलींचा आहे, तो खरंच साजरा करण्यासारखा आहे का? आपल्या देशातल्या बहुतेक मुली अॅनिमिक राहिल्यात. नीट विचार करून अनेक अंगांनी नियोजन करून हा प्रश्न निश्चित सोडवता येईल. पण हा प्रश्न सुट्टा नाहीय. त्यासोबत स्त्री सन्मान, स्त्री शिक्षण, स्त्रीपुरुष समता ही मूल्यं घेऊन एक वेगळी चळवळ झाली पाहिजे. समाजाला, शासनाला आणि समस्त पुरुषवर्गाला खडबडून जागं करायला हवं.
‘स्त्री जाणिवा आणि स्त्री संवेदना: एक अभ्यास’ या समीक्षात्मक ग्रंथाचं साहित्याक्षर संस्थेकडून नुकतंच प्रकाशन झालंय. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रांतांतल्या समकालीन स्त्री कवयित्रींच्या निवडक १५ कवितांचा यात विचार केलाय. स्त्रीला ‘माणूस’ समजणाऱ्या विचारधारेला हा समीक्षाग्रंथ अर्पण करण्यात आलाय. स्त्रीयांच्या कवितांची समीक्षा करणाऱ्या ग्रंथाची ही तोंडओळख.
गोरेगावची अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल ही शाळा. मुलांकडून फक्त अक्षरांचीच नाही तर समतेची बाराखडीही शाळा मुलांना शिकवते. आजच्या शिक्षणाच्या बाजारत अशी शाळा असणं ही खरोखर आश्चर्य वाटावं अशी गोष्ट आहे. पण अशक्य वाटावं अशी नाही. ‘शिकणारी शाळा ‘अभि’रंग’ आणि ‘शिकणारी शाळा बालरंग’ ही ती दोन पुस्तकं वाचूनही शाळेचा बराच अंदाज येतो.
अॅलन मस्क जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनलेत. त्यांची इलेक्ट्रिक गाड्या बनवणारी टेस्ला कंपनी ऑटो इंडस्ट्रीतली आजची आघाडीची कंपनी आहे. अनेक अडथळे पार करत मस्क यांनी हा प्रवास केलाय. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इलेक्ट्रिक गाड्यांच्या निर्मिती आणि वापराला प्रोत्साहन द्यायचं म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर टेस्ला कंपनीचा भारतात प्रवेश महत्त्वाचा ठरतोय.
देशात उच्च शिक्षण घेतलेले बुद्धिमान लोक पैसे कमावण्यासाठी परदेशात जातात. त्याला ब्रेन ड्रेन म्हटलं जातं. आता ब्रेन ड्रेनसोबतच भारताला वेल्थ ड्रेनचाही मोठा फटका बसतोय. बुद्धिमान लोकांसोबत श्रीमंत लोकही देश सोडून जातायत. उद्योग उभारणी आणि रोजगार निर्मितीवर त्याचा परिणाम होतोय. ब्रेन ड्रेननं केलं नाही तेवढं नुकसान वेल्थ ड्रेनमुळे होतंय. यावर आपण गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
बर्ड फ्लूनं देशभरातल्या १० राज्यांना आपल्या कवेत घेतलंय. आधीच कोरोना त्यात बर्ड फ्लू पुन्हा त्यामुळे टेंशन वाढत चाललंय. घाबरवून सोडणाऱ्या या बर्ड फ्लूच्या १९ व्या शतकातही नोंदी सापडतात. तर १८७८ मधे इटलीत पाणकोंबड्यांमधला प्लेग असं त्याचं वर्णन सापडतं. पण संसर्गाचा धोका असलेल्या पक्ष्यांना थेट मारायलाच लावणारा हा बर्ड फ्लू नेमका कसाय ते समजून घ्यायला हवं.
ऑस्ट्रेलियात भारतीय क्रिकेट टीमला वर्णद्वेषी शेरेबाजीला तोंड द्यावं लागलं. जगभरात होणाऱ्या वर्णद्वेषाविरोधात भारत पेटून उठतो. पण भारतातल्या वर्णद्वेषाचं काय? इथल्या चार वर्णांनी प्राचीन काळापासून आतापर्यंत आपल्या देशात भेदांच्या भक्कम भिंती उभ्या केल्यात. ऑस्ट्रेलियातल्या वर्णद्वेषाचा निदान निषेध तरी होतो. भारतातल्या वर्णद्वेषाचा तर उदो उदो होतो.