तर भारत चीनपेक्षा भारी मॉडेल उभं करू शकेलः थॉमस पिकेटी

१३ मे २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


कोरोना संकट कधी संपेल हे नेमकं सांगता येईना. पण कोरोना जगाचं बदलवून टाकेल यावर जवळपास साऱ्या विचारवंतांचं एकमत दिसतंय. त्यामुळेच बदलेल्या या जगात आपला खुंटा बळकट करण्यासाठी अनेक देश संधीच्या शोधात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नव्या जगात भारताली मोठी संधी असल्याचं म्हटलंय. या साऱ्या बदलांवर प्रसिद्ध फ्रेंच अर्थतज्ञ थॉमस पिकेटी यांनी सविस्तर मतं मांडलीत.

कोरोना वायरसनं अतिशय गोंधळाचं वातावरण निर्माण केलंय. वायरस काय करतो, अजून किती जणांचे बळी हा घेईल आणि कधी परत जाईल या सगळ्या प्रश्नांचं एकही निश्चित उत्तर आपल्याकडे नाही. या वायरसबाबत फक्त गोष्ट निश्चित आहे आणि ती म्हणजे हा वायरस साऱ्या जगात मोठी उलथापालथ घडवून आणणार आहे.

आता हे जग कसं बदलणार याचा अंदाज तज्ञांकडून लावला जातोय. जगप्रसिद्ध फ्रेंच अर्थतज्ञ, प्राध्यापक थॉमस पिकेटी  कोरोनानंतरच्या जगाबद्दल काही इंटरेस्टिंग आणि गंभीर मतं मांडलीत. पिकेटी यांच्या पुस्तकांना जगभरात मोठी मागणी असते. पिकेटी सध्या लंडन स्कूल ऑफ इकोनॉमी आणि स्कूल ऑफ ऍडव्हान्स स्टडीज अँड सोशल सायन्सेस इन पॅरिस या दोन संस्थांमधे प्राध्यापक म्हणून काम करतात. एखाद्या अचानक आलेल्या संकटामुळे अर्थव्यवस्थेत आणि सामाजिक रचनेत कशाप्रकारे बदल होतात, हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे.

अलीकडेच एनडीटीवीचं मुख्य संपादक प्रणव रॉय यांनी प्रोफेसर पिकेटी यांची कोरोनाचं अर्थकारण आणि इतिहास यावर मुलाखत घेतली. कोरोना  साथीनंतर होणाऱ्या आर्थिक आणि सामाजिक परिणामांबदद्ल ते बोलत होते. या सगळ्यात भारताने काय शिकावं, स्वतःत कोणते बदल करावेत आणि कोरोना वायरसनंतर बदलणाऱ्या जगात भारताचं काय स्थान असेल या सगळ्याविषयी प्रोफेसर पिकेटी यांनी अतिशय योग्य मार्गदर्शन केलं. त्यांच्या या मुलाखतीतले पाच महत्त्वाचे मुद्दे.

हेही वाचा : कोरोना संकटाशी तुलना होत असलेली १९३०ची जागतिक महामंदी कशी होती?

१. ही तर भारतासाठी सुवर्णसंधी

भारतासारख्या विकसनशील देशांनी या संकटाकडे एक संधी म्हणून पहायला हवं. आपल्या सामाजिक व्यवस्था पूर्णतः विकसित करण्याची गरज या संकटानं निर्माण केलीय. ही एक संधीच आहे. आरोग्याच्या योजना, आरोग्य निर्देशक, आरोग्याच्या पायाभूत सुविधा आणि सुरक्षेच्या मुलभूत पद्धती यावर काम करण्यासाठी सरकारला प्रोत्साहन देणारं हे संकट आहे. कल्याणकारी राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यसाठी भारताने आता जोमाने प्रयत्न करायला हवेत.

लॉकडाऊनचा हा बंदीवास आता यापुढे काम करणार नाही. लॉकडाऊन वाढला तर देशातल्या अनेक लोकांकडे दिवसातून दोनवेळा पोट भरू शकतील इतकीही संसाधनं उरलेली नाहीत. आता बाहेर जाऊन काम मिळवणं, पैसे कमवणं आणि त्या पैशातून अन्न खरेदी करून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला पोसणं ही लोकांची गरज झालीय. आरोग्य व्यवस्था आणि लोकांचं उत्पन्न वाढवायची, संपूर्ण विकासाची मिळवण्यासाठी धावणाऱ्या मोटारीची गती वाढवाची ही अभूतपूर्व संधी भारताला लाभलीय.

२. राजकीय विचारसरणीचा अर्थव्यवस्थेवर परिणाम

भारताला याआधीही कोरोना वायरससारखे अनेक आश्चर्याचे धक्के बसलेत. भारतात अर्थिक धोरणं बनवणारी आणि सामाजिक असमानता परसरवणारी लोक ही राजकीय नेते मंडळी असतात. त्यामुळेच या दोन्ही गोष्टींवर त्या त्या राजकीय नेत्यांच्या विचारधारेचा परिणाम होत असतो. दिवसेंदिवस हा प्रभाव आणखी वाढत जाताना दिसतोय. माझ्या कॅपिटल अँड आयडीओलॉजी या पुस्तकातही मी हेच सांगितलंय.

खरंतर, कोणत्याही योजना फक्त अर्थिक आणि तांत्रिक गोष्टींचा विचार करून बनवल्या गेल्या पाहिजेत. अर्थव्यवस्थेत तुम्ही कोणती विचारधारा घेऊन हस्तक्षेप करता आणि कोणत्या विचारधारेच्या जोरावर तुम्ही अर्थव्यवस्था चालवता, त्याचं संघटना करता या गोष्टी कोरोनासारखा मोठा धक्का बसल्यावर मोठ्या झपाट्यानं बदल होतात.

हे कोरोना स्पेशलही वाचा :

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोत

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोनानं नाही, तर आपले मजूर लॉकडाऊनमुळे मरतील?

कोरोना वायरसही आपल्यासारखा स्त्री-पुरुष भेदभाव करतो का?

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

३. राजकीय उलथापालथी होणं महत्त्वाचं

स्वीडनसारख्या देशात आज आपल्याला संपूर्ण समानता दिसते. पण या देशात कधीकाळी प्रचंड असमानता होती ही गोष्ट आज सांगूनसुद्धा कुणी विश्वास ठेवणार नाही. आत्ता तिथं एक माणूस एक मत अशी व्यवस्था आहे. पण १९११ पर्यंत एखादा माणूस श्रीमंत असेल तर त्याचं एक मत हे १०० मतांच्या बरोबरीचं मानलं जायचं. आणि गरीब लोकांच्या एका मताला कवडीचीही किंमत नव्हती. संपत्तीचं असमान वाटप कायम रहावं यासाठी निर्माण केलेली ही व्यवस्था होती.

संपूर्ण युरोपमधे किंवा अगदी जगातही इतकी असमानता दुसरीकडे कुठेच नव्हती. नंतर ट्रेड युनियन्स आणि स्वीडनमधल्या सोशल डेमोक्रेटिक पक्षानं तिथे प्रचंड मोठी उलथापालथ घडवून आणली. त्यानंतर निर्माण झालेला स्वीडन आपल्या नागरिकांना समतेची वागणूक देणारा एकमेव देश आहे.

सांगायचा मुद्दा असा की असमानतेचं वास्तव सतत बदलत असतं, परिस्थिती खूप बदलते असते. त्यामुळे त्याकडे बघण्याचा एक ठराविक दृष्टीकोन ठेवणं मला पटत नाही. राजकीय उलथापालथी आणि कोरोनासारख्या नव्या संकटाला लोक कसं सामोरं जातात हे मला महत्त्वाचं वाटतं. अशी परिस्थिती भारतातही येऊ शकते.

४. जागतिक सत्ता समीकरण बदलणार

चीनकडून आलेल्या या वायरसने सगळे हैराण आहेत. चीनविरोधी भावना जगभर पसरलीय. पण या वायरसबद्दलची सगळी माहिती देणारा चीन महत्त्वाचं स्रोत आहे. आता एक वर्षानंतर जगावरची चीनची सत्ता कमी होईल की वाढेल? मला वाटतं, वायरस येऊन गेला तरी चीनची अर्थव्यवस्था वाढतच राहणार आहे. हाच त्यांच्या सत्तेचा पाया आहे. त्यामुळे यापुढेही चीनची सत्ता वाढतच राहील.

साथरोग चीननं पसरवला की त्यांनी त्यातून जगाला बाहेर काढलं याबद्दल बोलायचं झालं तर यापैकी लोक नेमकं काय लक्षात ठेवतील हे सांगणं फार अवघड आहे. साथरोगाशी सामना करायचा असेल तर लॉकडाऊनचा बंदीवास लोकांवर लादणं गरजेचं होतं. आता चीन किंवा काही आशियाई देशांनी व्यवस्थितपणे लॉकडाऊन राबवला. तर अमेरिका आणि काही युरोपियन देशांना लॉकडाऊन यशस्वी करणं जमलं नाही. 

अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांचं निवडणुकीय लोकशाहीचं मॉडेल आणि मुक्त बाजारपेठेची भांडवलशाही गेल्या काही वर्षांत कमजोर झालीय. ट्रम्पच्या निवडणुकीनंतर तर अमेरिकेच्या लोकशाहीची नैतिक प्रतिष्ठा फारच खालावलीय. पण त्याचबरोबर चायनीज मॉडेलमधले पारदर्शकतेचा अभावासारखे दुर्गुणंही सगळ्यांना माहीत आहेत. कम्युनिस्ट पक्षाचा पुढाकार असलेलं मॉडेल अशीच चीनची ओळख अजूनही आहे. अशा प्रकारचं मॉडेल जगातल्या कुठल्याही देशाला राबवायचं नाहीय. मीडियाचं स्वातंत्र्य, पारदर्शकता याची मागणी आज कोरोना वायरसच्या काळात जितकी जास्त केली जाते तितकी यापूर्वी कधीही केली जात नव्हती.

हेही वाचा : जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग

५. जागतिक बदलांमधे भारत कुठे सापडेल?

पुढच्या काही वर्षांनी चीनपेक्षा जास्त आकर्षक मॉडेल म्हणून उभारी घेण्याची क्षमता भारताकडे आहे. पण त्यासाठी खूप वेळ लागेल. कारण भारताला आधी अंतर्गत असमानता घालवावी लागेल.

सरकारला सार्वजनिक आरोग्य सुविधांमधे आणि सार्वजनिक शिक्षण क्षेत्रात योग्य संसाधनांची गुंतवणूक करावी लागेल. कोरोना वायरसच्या संकटामुळे या दिशेनं पावलं टाकायची मोठी संधी भारताला मिळालीय.

हेही वाचा : 

विमान कंपन्यांना भवितव्य नाही : वॉरेन बफे

आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या ८ इंटरेस्टिंग गोष्टी

कोरोनानंतर दोन मोठी संकटं आपली वाट पाहतायत: नॉम चॉम्स्की

रघुराम राजन सांगताहेत, लाॅकडाऊननंतर देशाला सावरण्याचा प्लॅन

लॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी विनाशकारी ठरेलः रघुराम राजन

हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?

डब्ल्यूएचओनं आधीचं कोरोनाचा इशारा दिला, तरीही ब्लेमगेम का सुरूय?

कोरोनाच्या धक्क्यानं पडलेल्या शेअर मार्केटमधे गुंतवणुकीची हीच ती वेळ?

भारतामुळेच जगात मंदी, असं आयएमएफच्या गीता गोपीनाथ का म्हणाल्या?

जगाचा बिझनेस कोमात, डीमार्ट जोमात, F.Y.B.Com ड्रॉपआऊट काकांची सक्सेस स्टोरी