भारतात बॉलिवूडसारखे आणखी किती वूड आहेत?

१७ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


आपल्याला बॉलिवूडचे सिनेमे बघायला खूप आवडतात. त्यात रॉमॅन्स, अॅक्शन, ड्रामा, नाच-गाणी असा सगला मसाला असतो. या बॉलिवूडसारखेच भरपूरसे वूड आपल्या देशातल्या सिनेमा उद्योगात आहेत. प्रादेशिक सिनेमा क्षेत्रांनी त्यांच्या सिनेमा उद्योगाच्या नावांपुढे वूड जोडलंय. आपलं महत्त्त्व अधोरेखित करण्यासाठी त्यांनी तसं नामकरण केलंय.

सिनेमा आणि सिने जगत या विषयाला एक वलय आहे. या विषयावर जगात सगळीकडे चर्चा होतात. सिनेमे बघण्याची कमी अधिक प्रमाणात सगळ्यांनाच क्रेझ असते. फेवरेट हिरो, हिरोईनच्या सिनेमासाठी कधी शाळा, कॉलेज बंक केलंय. आणि काहिंनी तर आपला जॉबही बंक केलाय.

१९३१ नंतर सिनेमे भारतीय भाषांमधे

आपल्याला कधीही बघायाला आवडणारा हा सिनेमा. जगात पहिल्यांदा १८९५ ला रिलिज झाला. त्याचं नाव वर्कर्स लिविंग फॉर्म ल्युमिअरे फॅक्टरी. ल्युमिअरे बंधुंनी बनवलेला हा पहिला चित्रांचा पट. हा सिनेमा फक्त एका मिनिटाचा होता.

भारतात १८ वर्षांनी म्हणजे १९१३ ला पहिला सिनेमा बनला. दादासाहोब फाळके दिग्दर्शित राजा हरिश्चंद्र. १९३१ पर्यंत भारतात बनलेले सर्व सिनेमे हे मूकपट होते. १९३१ ला आलम आरा पहिला बोलपट आला. तो सिनेमा हिंदीत होता. इथूनच मराठी, हिंदी, बंगाली आणि इतर भारतीय भाषांमधे सिनेमे येऊ लागले.

आणि भाषावार प्रांतरचना झाली. तसंच काहीसं भाषावार सिनेमा असं विभाजनही झालं. प्रेक्षकही प्रदेश आणि भाषेने विभागला गेला. यावरुन प्रत्येक सिनेमाक्षेत्राचं एक नाव तयार झालं. जे खरंतर आपण हॉलिवूडवरुन कॉपी केल्याचं स्पष्ट आहे.

हेही वाचा: पाकिस्तानातल्या कलाकारांच्या स्मृती जतन करायला हव्यात

अमेरिकेची सिनेमासृष्टी हॉलिवूडमधे

आज आपल्याला माहिती असलेलं सगळ्यात लोकप्रिय नाव म्हणजे बॉलिवूड. हे हिंदी सिनेमाक्षेत्र असलं तरी हे जगात भारतीय सिनेमाचं प्रतिनिधीत्व करतात. आणि यात सर्व प्रदेशातले, कोणत्याही भाषेचे लोक येऊन काम करतात. बॉलिवूड हे मराठी चित्रसृष्टीबरोबर मुंबईत घडलं. त्यावेळी मुंबईला बॉम्बे म्हटलं जात होतं. या बॉम्बेवरूनच बॉलिवूड आलं. 

बॉलिवूड, टॉलिवूड, मॉलिवूड, कॉलिवूड, पॉलिवूड, सँडलवूड, जॉलिवूड, बोजीवूड, चॉलिवूड, ऑलिवूड, ढॉलिवूड किंवा गॉलिवूड इत्यादी वूड आहेत. म्हणजेच एवढे सिनेमाक्षेत्र आहेत. हे वूड नाव हॉलिवूडवरुन आलंय खरं. पण हॉलिवूड हे तर अमेरिकेतलं एक गाव ठिकाण आहे. जे १८५३ मधे डच लोकांनी वसवलं.

ही जागा निसर्ग सौंदर्याची खाण असलेल्या या ठिकाणी फिरण्यासाठी आणि नंतर सिनेमा बनवण्यासाठी लोक येऊ लागले. जसं की भारतात सगळ्यात जास्त शुटिंग हे फिल्मसिटी गोरेगावमधे होतं. तसं ते हॉलिवूडमधे होऊ लागलं. आणि मग अमेरिकेची सिनेमासृष्टी हॉलिवूडमधे जाऊन वसली.

हेही वाचा: अभिनंदन यांना वीर चक्र, जवानांना कोणकोणते पुरस्कार मिळतात?

मालेगाव के शोले

हॉलिवूड हे नाव जगभरात खूप लोकप्रिय झालं. म्हणूनच त्यानावावरून प्रेरणा घेतली. आणि वूड जोडत या नावांचा जन्म झाला. आणि फक्त भारतातच नाही तर बांग्लादेश, श्रीलंका, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांसह आफ्रिका आणि युरोप खंडातल्या खूपशा देशांच्या सिनेमाक्षेत्रांच्या नावांना वूड जोडलेलं आहे.

भारतात जवळपास प्रत्येक राज्यात एक स्वतंत्र सिनेमाक्षेत्र आहे. पण त्यांची ही वूड नाव जोडलेली सिनेमाक्षेत्रांची नावंही डबल आहेत. बंगाली सिनेमाक्षेत्राला साधारण १९३२ ला टॉलिवूड हे नाव ठेवलं गेलं. पण सध्या आंध्रप्रदेश आणि तेलंगणातल्या सिनेमाक्षेत्राला टॉलिवूड म्हणून ओळखतात.

अभिनेत्री तापसू पन्नूला कोण ओळखत नाही. ती मॉलिवूडमधून मग बॉलिवूडमधे आलीय. मॉलिवूड हे मल्यालम किंवा केरळच्या सिनेमाक्षेत्राचं नाव. पण नाशिकजवळचं जिंदादिल शहर मालेगाव. इथेसुद्धा त्यांचं स्वतंत्र सिनेमाक्षेत्र आहे. ज्याचं नावसुद्धा मॉलिवूड आहे. इथे बनलेला पहिला सिनेम मालेगाव के शोले हा खूप गाजला. तेव्हापासून त्यांनी मॉलिवूड हे नाव दिलं. आणि स्वतंत्र ओळख निर्माण केली.

हेही वाचा: जवाहरलाल, विजयालक्ष्मीः भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे बहीणभाऊ

भारतात हॉलिवूड नाही बॉलिवूडच

पंजाबी सिने उद्योगाला पॉलिवूड, तमिळनाडूच्या सिने उद्योगाला कॉलिवूड, कर्नाटकातल्या सिने उद्योगाला सँंडलवूड, भोजपुरी सिने उद्योगाला भौजिवूड, गुजरात सिने उद्योगाला गॉलिवूड अशी नावं आहेत. आसाम, गुवाहाटीच्या आसामिया सिने उद्योगाला जॉलिवूड म्हणतात.

तेलगु सिने उद्योगाला टॉलिवूड म्हणतात. आणि टॉलिवूड मधले सिनेमे गेल्या ५ वर्षांपासून बॉलिवूडमधे मोठ्या प्रमाणात येतायत. म्हणजे हॉलिवूड नाही तर बॉलिवूड हे नाव भारतातल्या कोनाकोपऱ्यात पोचलंय.

हेही वाचा: 

टीम इंडियाच्या कोचसाठी दोन हजार अर्जांतून सहा नावं शॉर्टलिस्टमधे

पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलेली सीडीएस योजना आहे तरी काय?

वाजपेयींसोबत काम केलेले दुलत म्हणतात, ३७० हटवल्यामुळे काश्मीरमधे वाढू शकतो दहशतवाद