जगातल्या अर्ध्या अधिक लोकसंख्येला डेंग्यूचा धोका; पण लसीचं काय?

२७ सप्टेंबर २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


डासांपासून होणार्‍या आजारांनी आज जगापुढे आव्हान उभं केलंय. यामधे मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया यांसारख्या आजारांचा समावेश होतो. गेल्या अनेक वर्षांपासून डेंग्यू हा जागतिक आरोग्य धोक्यात आणणारा वायरस म्हणून ओळखला जात आहे. सध्यस्थितीत जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला या वायरसचा संसर्ग होण्याचा धोका आहे.

जगातल्या अर्ध्या अधिक लोकसंख्येला आता मच्छरजन्य वायरस डेंग्यू तापाचा धोका आहे आणि काही लॅटिन अमेरिकन आणि आशियाई देशांमधे डेंग्यू हे मृत्यूचं प्रमुख कारण बनतंय. पण पेशंटच्या संख्येमधे झपाट्याने वाढ होत असूनही आणि औषध विकासाच्या अनेक दशकांच्या प्रयत्नांनंतरही, या क्षेत्राकडे कोणतीही विशिष्ट उपचार पद्धती नाही आणि फक्त एक मर्यादित-वापर लस आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून डेंग्यू हा जागतिक आरोग्य धोक्यात आणणारा वायरस म्हणून ओळखला जात आहे. आजच्या दिवशी जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला या वायरसचा संसर्ग होण्याचा धोका आहे. जरी डीईएनवीमुळे होणारा रोग पहिल्या संसर्गामधे स्वयं-मर्यादित असला तरी, अँटीबॉडी-आश्रित वाढ या वायरसचा प्रभाव अधिकच वाढवतो आणि त्यामुळे वायरसच्या दुसर्‍या संसर्गामधे पेशंटचा मृत्यूदर वाढायला कारणीभूत ठरतो.

हेही वाचा: जय शेंडुरे: कोरोना आणि ट्रम्प प्रशासनाला पुरुन उरणारा रांगडा कोल्हापूरकर

डेंग्यूवर अँटीवायरल उपचार नाही

सध्या दिल्या जणार्‍या उपचारात कोणतंही विशिष्ट कार्यक्षम औषध नसल्यामुळे, संसर्ग आणि रोगाची प्रगती रोखण्यासाठी लस विकसित करणं हाच एकमेव मार्ग डॉक्टर आणि संशोधकांच्या पुढे होता. सध्या, फक्त एक थेट ऍटेन्युएटेड लस, चिमेरिक यलो फिवर १७ डी-टेट्रावॅलेंट डेंग्यू लस काही देशांमधे क्लिनिकल वापरासाठी परवानाकृत आहे आणि अनेक उमेदवार लसी अजूनही संशोधन आणि विकासाधीन आहेत.

लाइव अ‍ॅटेन्युएटेड लस, निष्क्रिय वायरस लस, रीकॉम्बीनंट सब्युनिट लस, वायरल वेक्टर लस आणि डीएनए लस यांसह पाच प्रकारच्या लसी सध्या विकसित होण्याच्या मार्गावर आहेत. दरवर्षी १००-४०० दशलक्ष लोकांमधे डेंग्यू तापाचं संक्रमण होतं आणि ही प्रकरणं झपाट्याने वाढत आहेत. सध्या सर्वच लस उत्पादक कंपन्यांपुढे लसी विकसित करण्यात हे अडथळे कसे पार करायचे हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

डेंग्यू तापावर कोणताही अँटीवायरल उपचार नाही आणि एकमेव मान्यताप्राप्त लस-सनोफीची या कंपनीची असून तिचं नाव डेंगवॅक्सिया असं आहे. पण ही लस म्हणावी तशी उपायकारक नसून ती घेतल्यामुळे डेंग्यू तापाची फक्त तीव्रता कमी होऊ शकते किंवा ज्यांना पूर्वी संसर्ग झाला आहे त्यांना ती उपायकारक ठरू शकते. ज्यांना अद्याप संसर्ग झालेला नाही त्यांना डेंगवॅक्सिया लसीमुळे गंभीर डेंग्यूचा धोका वाढू शकतो.

ही लस विकसित करणार्‍या तज्ज्ञांचं म्हणणं आहे की क्लिनिकल चाचण्यांचे खराब समन्वित प्रयत्न, प्राण्यांचं मॉडेल आणि प्रयोगशाळा चाचण्यांमधल्या अडचणी यांसह अनेक जटिल कारणांमुळे या आजारावरची लस आणि अँटीवायरल औषधांचा विकास थांबला आहे. तरीही, क्लिनिकल चाचण्या लक्षणांचे अंतिम परिणाम सुव्यवस्थित करून आणि एकाच प्लॅटफॉर्मवर आधारित चाचण्या आणि मानवी रोगप्रतिकारकशक्ती यांचा सखोल अभ्यास करून काही लस किंवा औषध उत्पादक कंपन्या या दुर्लक्षित रोगाला तोंड देण्यासाठी प्रगती करू शकतात.

डेंग्यू ताप बहुआयामी

बायोकेमिकल दृष्टिकोनातून, डेंग्यू ज्वर अँटीवायरल आणि लस विकसित करण्यासाठी दोन प्रमुख आव्हानं आहेत. पहिलं म्हणजे, डेंग्यू तापाचे चार वेगवेगळे सीरोटाइप असतात. यामुळे अनेक जीवशास्त्रज्ञांनी डेंग्यूला चार वेगळे वायरस म्हणून पाहिलं आहे आणि या चार वायरसचे भिन्न दृष्टिकोन आणि गुणधर्म दिसून आले आहेत.

दुसरं म्हणजे, डेंग्यू ताप हा आरएनए वायरसमुळे होतो, याचा अर्थ वायरसची प्रतिकृती होत असताना तो वायरस सतत विकसित होत राहतो. त्यामुळे त्याचे गुणधर्म समजायला वेळ लागत आहे किंवा ते खूप अवघड बनत आहे. एकत्रितपणे सांगायचं तर, डेंग्यू ताप एक बहुआयामी, हलणारं लक्ष्य आहे आणि संशोधकांना तो डास आणि मानवी यजमानांमधे कसा विकसित होतो हे पूर्णपणे समजून घेता आलेलं नाही.

डेंग्यू तापासाठी फेज १ ते ४ मधे ४३ वेगवेगळ्या प्रकारच्या लसीच्या चाचण्या चालू आहेत. त्यापैकी बहुतांश लसी खाजगी कंपनी प्रायोजित आहेत. इतर दोन सर्वात सामान्य डासजन्य आजारांबद्दल पाहता मलेरियाच्या १३८ चाचण्या चालू आहेत आणि चिकुनगुनिया तापासाठी फक्त आठ चाचण्या सध्या सुरु आहेत.

हेही वाचा: कोरोनाशी पंगा घेणारी बाईः हॉस्पिटलमधे न जाता कोरोना केला बरा

या देशांमधे ठावठिकाणा

डेंग्यू ताप हा कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमधे सर्वात जास्त प्रमाणात आढळतो आणि त्यामुळे अँटीवायरल औषधांना आणि लसींना संपूर्ण लॅटिन अमेरिका आणि आशियातील देशांमधे नियामक मान्यता आवश्यक असते. मेक्सिको, मलेशिया, थायलंड आणि विएतनामसह देशांमधे डेंग्यू तापाचं प्रमाण जास्त आहे; पण तिथं नियामक प्रणाली कमी आहेत.

बर्‍याच प्रकरणांमधे, कमी मजबूत नियामक पायाभूत सुविधा असलेले, कमी आणि मध्यम-उत्पन्न असलेले देश अजूनही एफडीए आणि ईएमएसारख्या उच्च प्रस्थापित नियामकांकडे मार्गदर्शनासाठी पाहत आहेत. परिणामी, लस आणि औषध निर्मात्यांनी अद्याप क्लिनिकल चाचणीच्या यशाच्या अपेक्षांसाठी एफडीए आणि ईएमएकडे लक्ष दिलं पाहिजे.

लसीच्या क्लिनिकल चाचण्यांना मंजुरी

भारताचा विचार करायचा झाल्यास नॅशनल डेअरी डेवलपमेंट बोर्डाची उपकंपनी असलेल्या इंडियन इम्युनोलॉजिकल लिमिटेडला डेंग्यू लसीच्या फेज-१ चाचणीसाठी केंद्राकडून परवानगी मिळाली आहे. आयआयएल ही संशोधन संस्था अमेरिकास्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या सहकार्याने डेंग्यू लस विकसित करत आहे. या कामी अमेरिकन संस्था आयआयएलला लस विकसित करण्यासाठी डेंगू वायरसचा पुरवठा करेल.

डेंग्यूवर भारतात अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही. भारतीय डेंगू महामारीच्या निर्मूलनामधला हा खूप मोठा मैलाचा दगड असेल. आयआयएलने सर्व प्राण्यांच्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत आणि आता केंद्र सरकारच्या नियामक मंडळाने मानवी चाचण्यांसाठी परवानगी देण्यात आली आहे.

एप्रिलमधे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेसोबत डेंग्यूची लस तयार करण्यासाठी भारताने जागतिक बाजारपेठेत अधिकृतपणे प्रवेश केला होता. अधिकृत नोंदीनुसार, आणखी दोन संभाव्य डेंग्यू लसी आहेत ज्या पॅनिका बायोटेक लिमिटेड आणि सॅनोफी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारे विकसित केल्या जात आहेत. या दोन्ही लसींना क्लिनिकल चाचण्यांसाठी मंजुरी मिळाली आहे.

पॅनिका आणि सिरमसारख्या कंपन्यांना डेंग्यूच्या लसीच्या चाचणीसाठी उमेदवार मिळाले असून त्यांनी नुकतेच फेज १ आणि २ चाचण्या पूर्ण केल्या आहेत. आयसीएमआर आता फेज ३ चाचण्यांसाठी दोघांसोबत भागीदारी करत आहे. सनोफी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची लस अमेरिकेत आधीच मंजूर झाली आहे; याच लसीच्या भारतात चाचण्या घ्यायला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा: कोरोना रोखण्यासाठी डिग्लोबलाइज होणं ही तर आपली घोडचूक ठरेल

जगभर लसीसाठी प्रयत्न

डेंग्यूची लस अमेरिकेमधे काही वर्षांपासून उपलब्ध करून देण्यात आली होती. ही लस डेंग्यू वायरसच्या चार प्रकारच्या म्युटेशनशी मुकाबला कशी करेल हे तज्ज्ञांना अद्याप सापडलेलं नाही. सध्या भारतमधे ही चार म्युटेशन आहेत आणि त्यामुळेच डेंग्यूच्या वायरसचा प्रकार भारतात सतत बदलत राहिला आहे.

याचबरोबर जपानमधल्या ताकेडा फार्मास्युटिकल कंपनीची डेंग्यू तापावरची प्रायोगिक लस लवकरच इंडोनेशियामधे मंजूर होण्याची शक्यता आहे. या कंपनीचं उद्दिष्ट सुमारे ३० देशांमधे लस विकण्याचं आणि १.६ अब्ज डॉलर्सची विक्री करण्याचं आहे. ब्रिटनमधलं ऑक्सफर्ड विद्यापीठसुद्धा डेंगूची लस विकसित करत असून यासाठी त्यांनी ब्राझील देशाबरोबर सहकार्याचा करार केला आहे.

तर भारतीय लसही बाजारात

डेंग्यू वायरससारख्या परिवर्तनीय रोगजनकांच्या विरूद्ध प्रभावी लस तयार करणं हे लस विकासातलं एक मोठं आव्हान आहे. डेंग्यू रोग, डासांद्वारे प्रसारित, चार वेगवेगळ्या डीईएनवी सेरोटाइपपैकी कोणत्याही टाईपमुळे होऊ शकतो. एका सेरोटाइपची बाधा आणि संक्रमण त्या विशिष्ट सीरोटाइपविरूद्ध प्रतिकारशक्ती प्रदान करते; पण उर्वरित तीन सीरोटाइप विरुद्ध प्रतिकारशक्ती तयार होत नाही.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक संशोधन अहवालातून आणि अभ्यासातून असं दिसून आलंय, की ज्या पेशंटना पूर्वी डेंग्यूचा त्रास झाला होता, त्यांना वेगळ्या डीईएनवी सेरोटाइपच्या संपर्कात आल्यास रोगाचा अधिक आक्रमक स्वरूपाचा धोका असतो; अँटीबॉडी-डिपेंडेंट एन्हांसमेंट म्हणून ओळखली जाणारी प्रक्रिया ही अतिशय समजायला किचकट असून यामुळेच डेंग्यूवर लस विकसित करताना अनंत अडचणी निर्माण झाल्या आहेत.

कोरोनानंतरच्या गेल्या दोन वर्षांत, जगातल्या अनेक संशोधन प्रयोगसाळेत रोगजनकांच्या विविधतेला संबोधित करण्याच्या क्षमतेसह डीईएनवी लस विकसित करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची श्रेणी दिली जात असून भारतानेही या मोहिमेमधे आघाडी घेतली असून पुढच्या दोन ते चार वर्षात भारतीय डेंगू लस बाजारात उपलब्ध होईल अशी चिन्हं दिसत आहेत.

हेही वाचा: 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

तैवान कोरोना डायरी ३ : भीतीच्या सावटातही शिस्त विस्कटली नाही

लोकांचा विज्ञानावरचा विश्वास कमी व्हावा यासाठीच धडपडताहेत आपले राजकारणी

(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)