युट्यूब विरूद्ध टिकटॉक या वादात युट्यूबनं वीडियो डिलिट का केला?

१६ मे २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


युट्यूब आणि टिकटॉक हे वीडियो पाहण्याचे दोन अॅप. त्यावरचे वीडियो वेगवेगळे आणि वीडियोमधले विषयही वेगवेगळे. तरीही एकमेकांचे स्पर्धक म्हणून या अॅपकडे पाहिलं जातं. त्यावरूनच युट्यूबवर एक नवा वाद सुरू झालाय. या वादात दोन्ही अॅपवरच्या सेलिब्रेटींनीही उडी घेतलीय. असं असलं तरी या वादात युट्यूबनं घेतलेली भूमिका खरोखर कौतूकास्पद आहे.

इंटरनेटवरचे सर्वाधिक वापरात असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे ‘युट्यूब’ आणि ‘टिकटॉक’. दोन्ही वीडियोचेच अॅप असले तरी दोघांचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी होतो. दोन्ही अॅपवरचा कंटेण्टही वेगवेगळा आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोन अॅपच्या वापरकर्त्यांमधे जोरात वाद सुरू झालाय. आता तर या वादात दोन्ही प्लॅटफॉर्म्सवरचे वॉरिअर्सही उतरलेत. त्यामुळे या वादाला एखाद्या युद्धासारखं रूप आलंय. सध्याच्या वादाला युट्यूबवरचा एक वीडियो कारणीभूत ठरलाय.

हेही वाचा : आपली मुलं बलात्कारी बनू नयेत म्हणून ‘बॉईस लॉकर रूम’मधलं हे चॅट माहीत हवं

युद्धाचं कारण काय?

भारतासोबतच जगभरातले कोट्यवधी लोक या दोन्ही साईटचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. आता या दोघांमधे श्रेष्ठ कोण? हा नव्यानं उद्भवलेल्या वादाचा विषय आहे. हा वाद इतका पेटला आहे की युट्यूब आणि टिकटॉक या दोन्ही अॅपच्या वापरकर्त्यांचे म्हणजे युझर्सचे दोन वेगवेगळे गट तयार झालेच. हे दोन्ही गट एकमेकांवर सडेतोड टीका करत सुटलेत. ही टीका करताना आपली पातळी घसरतेय याचंही भान त्यांना राहिलं नाही.

युट्यूब आणि टिकटॉकच्या या वादात दोन्ही अॅपवरच्या सेलिब्रिटींनीही उडी घेतली. युट्यूब स्टार म्हणून ओळखला जाणारा अजय नागर कॅरीमिनाटी या टोपण नावाने प्रसिद्ध आहे. यूट्यूबर्सच्या या कॅरीमिनाटी म्हणजेच लाडक्या कॅरीनं टिकटॉक स्टारची खिल्ली उडवण्यासाठी एक रोस्ट वीडियो तयार केला होता. हा रोस्ट वीडियो म्हणजे खरंतर आमीर सिद्दिकी या टिकटॉक स्टारच्या एका वीडियोला दिलेलं उत्तर होतं.

पहिल्यांदा अमीर सिद्दकीने युट्यूबर्सला कमी लेखण्याचा प्रयत्न केला. म्हणून कॅरीनं त्याला जशास तसं उत्तर देणारा एक रोस्ट वीडियो तयार केला. रोस्ट वीडियो म्हणजे एखाद्या माणसाला टार्गेट करून त्याच्यावर केलेले विनोद. युट्यूबवरच्या या वीडियोनं अवघ्या आठ दिवसांतच ३० मिलियन व्ह्यूज मिळवले. आणि लाईकने तर एक नवा विक्रमच प्रस्थापित केला.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

महिलाही झाल्या कॅरीवर नाराज

हा रोस्टींग प्रकार आता भारताला नवा नाही. पण रोस्टींग करताना अनेकजण मर्यादा सोडूनच वागताना आपल्याला दिसतात. तसंच कॅरीच्याही वीडियोत दिसलं. अमीर सिद्दिकीचं रोस्टींग करताना कॅरीने मोठ्या प्रमाणावर अपशब्दांचा वापर केला. शिव्याच्या लाखोल्या तर वाहिल्या होत्याच पण सबंध वीडियोत आमीरला 'बेटी' असं म्हणून हिणवल्यामुळे महिलावर्गही त्याच्यावर नाराज झाला.

अशा प्रकारे कोणाचीही खिल्ली उडवणं, शिव्या देणं, ‘युट्यूब’च्या नियमांमधे बसत नाही. त्यामुळे हा वीडियो डिलिट करण्यात आला. हरॅसमेंट म्हणजे छळ आणि सायबरबुलिंगचं कारण सांगत या वीडियोला हटवण्यात आलं. तरीही हे प्रकरण इथंच थांबलं नाही. इथून या वादानं एक नवं वळण घेतलं. हा वाद आणखी चिघळला आणि एक वेगळंच चित्र आपल्या समोर आलं.

युट्यूब विरूद्ध टिकटॉक असं युद्ध आता युट्यूबर्सवर सुरु झालंय. अनेकांनी कॅरीचा वीडियो उडवल्याबद्दल नाराजी व्यक्त करत युट्यूब सोडण्याची भाषादेखील वापरायला सुरवात केलीय. या सर्व प्रकारावर कॅरीनं अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण या वादानंतर कॅरीमिनाटी हा भारतातल्या लोकप्रिय युट्यूबर्सना मागं टाकून नंबर वन झाला.

हा वीडियो येण्यापूर्वी कॅरीचे १० मिलियन फॉलोअर होते. पण वीडियो टाकल्यानंतर एका आठवड्यात त्याच्या फॉलोअरची संख्या १७ मिलियनच्या घरात पोचली. युट्यूब विरूद्ध टिकटॉकच्या एका वीडियोमुळे कॅरीला जवळजवळ ७ मिलियन नवे फॉलोअर मिळाले. त्याच्या या वीडियोला जवळपास १० मिलियन लाईक होते. लाईकचा एक नवा विक्रमच कॅरीनं घडवून आणला. अशातच त्याचा तो वीडियो डिलिट केल्याने त्याच्यासोबतच चाहत्यांची मोठी निराशा झाली. डिलिट होईपर्यंत या वीडियोला युट्यूबवर जवळपास ७६ मिलियन व्ह्यूज मिळाले होते.

हेही वाचा : सामान्य माणसांना स्वप्न दाखवणाऱ्या टिकटॉकची जागा टँगी घेणार?

तरीही युट्यूबनं वीडियो डिलिट केले

‘युट्यूब’ आणि ‘टिकटॉक’ हे दोन्ही वेगवेगळे वीडियो स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहेत. युट्यूबवर आपण एखादं मिनिटाच्या वीडियोपासून ते अनेक तासांचा सिनेमाही अपलोड करु शकतो. याउलट टिकटॉकचा वापर केवळ छोट्या वीडियोसाठी केला जातो. यावर लिपसिंक आणि फनी म्युझीकचे छोटे वीडियो बनवले जाऊ शकतात.

दोन्ही प्लॅटफार्मची जातकुळी वेगळी असली तरी टिकटॉक मार्केटमधे आल्यामुळे युट्यूबला त्याचा मोठा फटका बसला. टिकटॉक येण्यापूर्वी युट्यूबवर काही निवडक लोकच वीडियो बनवायचे आणि इतरांनी ते पाहून मनोरंजन करून घेत लाईक ठोकायचे, असं चित्र होतं. पण टिकटॉकनं हे प्रेक्षकांनाच वीडियो क्रिएटर बनवलं. सर्वसामान्य माणुसही एका क्लिकच्या जोरावर वीडियो तयार करू शकतो या एका कारणामुळे टिकटॉकची लोकप्रियता वाढत गेली.

टिकटॉकच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आता युट्यूबपुढ स्वतःचं अस्तित्व अबाधित ठेवण्याचं मोठं आव्हान आहे. असं असलं तरी युट्यूब आणि टिकटॉक या यु्द्धात युट्यूबनं आपली पातळी न सोडता त्यासंबंधातले सगळे वीडियो डिलीट केले. आपल्या कंपनीची प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी उचलेलं हे पाऊल कौतूकास्पदच म्हणावं लागेल.

हेही वाचा : 

ज्ञानदा कदमः वायरल होणारी मराठी न्यूज अँकर

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

कोरोनाला रोखणारी लस बनवण्याचं काम कुठंवर आलंय?

आव्हाडांनी करमुसेला ठोकल्यानं ट्रोलिंगची कीड संपणार का?

फेसबुकचं व्यसन लावणाऱ्या मार्क झुकेरबर्गची प्रेरणादायी गोष्ट

भाजप नेत्यांना ट्रोल करून महाआघाडी चकमकी जिंकेल, युद्ध नाही

सोशल मीडियाला आचारसंहिता लागू झालीय, म्हणजे काय झालंय?

अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्प आले, पण आपले 'खास रे' ट्रम्प तात्या कुठं गेले?