सध्या लॉकडाऊन सुरूय. घरी बसल्याबसल्या आपल्याला काही लिहावंसं वाटतं. ते वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी सोशल मीडिया आहेच. पण त्या पलीकडच्या मोठ्या संख्येने असणाऱ्या सुजाण वाचकांपर्यंत पोचायची इच्छा असेल, तर आपलं कोलाज आहे. कोलाजचे वाचक शुभम टाके यांनी किशोरी आमोणकरांवर लिहिलेला लेख आज कोलाजवर प्रकाशित करतोय. इच्छा असेल तर तुम्हीही तुमचा लेख kolaj.marathi@gmail.com वर पाठवू शकता. – संपादक
भारतीय किंवा हिंदुस्थानी या दोन्ही शास्त्रीय संगीताच्या प्रकारांची परंपरा मोठी आहे. खरं तर मास परंपरेनेच ही क्लास परंपरा पुढे विकसित केली, असं बऱ्याच अभ्यासकांच म्हणणं आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मासिकल बासरी वादक गोपाळकृष्ण. प्राचीन काळी गुरं पाळणाऱ्यांनीच बासरी हे वाद्य विकसित केलं. नंतरच्या काळात अनेक विद्वानांनी भारतीय संगीताला घडवलं.
हेही वाचा : देवदासी समाजातून गानसरस्वती घडण्याचा इतिहास प्रेरणा देतो
राजा महाराजांच्या आर्थिक सहकार्यामुळे भारतीय अभिजात संगीत विकसित होत गेलं. पण आपण पाहतो की आजसुद्धा अनेक वारकरी भजनगायक रागदारी प्रकारात अत्यंत सुंदर गातात. फक्त फरक एवढाच की त्यांच्या गायकीचा कुठं महोत्सव होत नाही.
याच भारतीय सांगितिक परंपरेरतला एक भिन्न षड्ज म्हणजे किशोरीताई आमोणकर. १० एप्रिल हा त्यांचा जन्मदिन. खरंतर किशोरीताईंना जाऊन तीन वर्षं झाली. तरीही त्यांच्या आवाजाची जादू काल होती, तशीच आजही आहे आणि उद्याही राहील यात शंका वाटत नाही.
काही जणांचा आवाज धीरगंभीर असतो. काही जण वरच्या पट्टीत गातात. काही जण गोड गळ्याचे असतात. किशोरीताई या मोजमापात कुठंही बसत नाहीत. त्यांना मोजायला किशोरी आमोणकर हेच परिमाण लावावं लागतं. कारण त्यांच्या आवाजात आपल्या मनावर अंमल करणारी जादू आहे.
मूळच्या गोव्याच्या असणाऱ्या मोगुबाई कुर्डीकर यांच्या पोटी किशोरीताईंचा जन्म झाला. १० एप्रिल १९३२ हा त्यांचा जन्मदिन. त्यांचा जन्म मुंबईतला आणि त्यांचं निधनही मुंबईतच झालं. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत अजरामर करणाऱ्या एका पिढीतल्या त्या शेवटच्या प्रतिनिधी. कारण त्यानंतर जागतिकीकरण कलेच्या क्षेत्रातही प्रबळ बनलं. गायकीपेक्षा इवेंट, पर्यायाने पैसा महत्त्वाचा झाला.
किशोरीताईंनी यात न अडकता संगीत आणि त्याचा विस्तार भारतात कसा होईल, याकडे विशेष लक्ष दिलं. खरंतर विदेशात जाणाराच हुशार असतो, हा गैरसमज त्यांनी तेव्हाच खोडून काढला. त्यांना विदेशात विविध विद्यापीठात येऊन काम करण्यासाठी विविध आमंत्रणं आली, पण त्यांनी भारतातच स्वतःच शिष्य परिवार घडवला.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
एखाद्या वायरसचं बारसं कसं केलं जातं?
सोशल कसलं, हे तर दिल्ली डिस्टन्सिंग!
एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशंट बरे कसे होतात?
कोरोनाकाळात सोशल डिस्टसिंग पाळून वारकऱ्यांनी आदर्शच घातलाय
ट्रम्प यांच्या धमकीला घाबरून भारतानं औषधावरची निर्यातबंदी उठवली?
कोरोनाः जग सारे मार्ग अवलंबतंय, मग मोदी घरीच राहायला का सांगतात?
किशोरीताईंना संगीताचं बहुतांश शिक्षण आईकडूनच मिळालं. त्यांना पुढच्या शिक्षणासाठी जयपूर घराण्याचे आद्यगायक उस्ताद अलादियां खान यांच्याकडे पाठवलं. १९२२ मधे शाहू महाराजांचं निधन झाल्यानंतर अलादियांसाहेब कोल्हापूरवरून मुंबईत राहायला आले. त्या अगोदर त्यांनी शाहू महाराजांकडे बरीच वर्षं राजगायक म्हणून काम केलं होत.
किशोरीताईंना आईकडून शिकण्यासाठी खूप मेहनत करावं लागली. कारण त्यांच्या आई या शिस्तप्रिय होत्या. तोच स्वभावगुण किशोरीताईंमधे सुद्धा होता. त्यांच्या शिस्तीबद्दल बोलताना एक उदाहरण देतात, एका गाण्याच्या मैफिलीमधे एका व्यक्तीने किशोरीताईंचं गाणं सुरू असताना पान मागवलं. त्या वेळी ताईंनी गाणं थांबवून त्या व्यक्तीला विचारलं, 'पान मागवायला मी कोठ्यावर गात आहे का? '
हेही वाचा : महात्मा जोतीराव फुलेच पहिले शिवचरित्रकार आणि शिवजयंतीचे उद्गातेही
त्यांचा कडक आणि शिस्तप्रिय स्वभाव खरं तर त्यांच्या आयुष्यातल्या कडवट अनुभवांमुळे बनला असावा. एका कलावंतिणीच्या पोटी जन्मल्यामुळे त्यांना कधी कधी लोकांच्या वाईट धारणेला सामोरं जावं लागायचं. पण त्यांनीसुद्धा या गोष्टीकडे लक्ष न देता स्वतःची गायकी अशा उंचीवर पोचवली की त्यांच्याबद्दल बोलताना उस्ताद झाकीर हुसेन सांगतात, `किशोरीताईंएवढी पराकोटीची साधना असणारा कलाकार मी पाहिला नाही. किशोरीताई गाण्यातून ईश्वरी स्वर गातात.'
निसर्गाने बहाल केलेला गळा किशोरीताईंनी रियाजाच्यातनं तयार केला. म्हणूनच किशोरीताईंच्या आवाजात `अवघा रंग एक झाला` हा अभंग ऐका किंवा सकाळच्या प्रहरातील अहिरभैरव, अल्हया बिलावल सारखे राग ऐका. संगीताचा प्रकार बदलू शकतो, पण आवाजाची जादू मात्र बदलत नाही.
किशोरीताईंचं निधन ३ एप्रिल २०१७ला मुंबईत झालं. किशोरीताई या भारतीय संगीत क्षेत्रातल्या एक सर्वोत्तम कलावंत होत्या. त्यांना त्यांच्या वैशिष्ट्यामुळे 'भिन्न षड्ज' म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
हेही वाचा :
प्रा. यशवंत सुमंत: कृतिशील समन्वयी विचारवंत
अजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी
जुने फोटो आणि रामायणः दोन पिढ्यांचा नॉस्टॅल्जिक ट्रेंड
`मी तुले सांगून ठेवतो, येणारा काळ मराठी गझलचाच आहे`
(लेखक हे इंग्रजी साहित्यात एम.ए. करत असून कोलाजचे नियमित वाचक आहेत.)