'फँड्री'च्या दानपेटीने गणपती बाप्पा होतो प्रसन्न

२६ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


फँड्री सिनेमाने आपल्याला समाजाची दुसरी बाजू दाखवली. या सिनेमातून प्रेरणा घेत. काही तरुण मंडळी एकत्र येतात. आणि फँड्री फाऊंडेशन सुरू होतं. ही संस्था आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात काम करतेय. गेल्या ५ वर्षांपासून ते गणोशोत्सवात उपक्रम राबतायत. यंदाच्या वर्षीसुद्धा डोनेशन बॉक्सचा उपक्रम राबवला जातोय. यात आपणही सामील होऊ शकतो.

गणपतीच्या नावावर वर्गणी गोळा करून, मिरवणुकीत पैसे उडवून मद्यधुंद अवस्थेत नाचणारी, रात्री मंडपात पत्ते खेळणारी पिढी आपल्यासाठी काही नवीन नाही. पण आताची तरुण पिढी वेगळा मार्गावर जाताना दिसतेय. याच पिढीचे काही तरुण या गणेशोत्सवात सामाजिक बांधीलकी जपताना अपल्याला दिसतायत. अशाच तरुणांची फँड्री फाउंडेशन. जी आता मुंबईच्या काना कोपऱ्यात पसरतोय.

फँड्री सिनेमाच्या प्रेरणेने फँड्री फाऊंडेशन

पाच वर्षांपूर्वी पाच मित्रांनी गरजूंना कपडे देण्याचं आवाहन फेसबुकवर केलं. आणि या पहिल्याच उपक्रमात तब्बल ६० जणांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. सोशल मीडियावरच्या अनेक सजग तरुणांनी कपड्यांबरोबर शैक्षणिक साहित्यही दिलं. आणि इथूनच फँड्री फाऊंडेशन सुरू झालं. नावावरूनच आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की या फाऊंडेशनचं नाव फँड्री सिनेमातून आलंय. ठाण्यातल्या रवी चाचेंनी फँड्री सिनेमातून प्रेरणा घेतली. आणि ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली.

सध्या संस्थेत १५० पेक्षा जास्त स्वयंसेवक अॅक्टीव आहेत. पालघर, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी इत्यादी ठिकाणी संस्थेचे स्वयंसेवक आहेत. सामाजिक संस्था या लोकांच्या मदतीसाठी असतात. तरी त्या एका ऑफिसप्रमाणे चालताना आपण बघितलंय. त्यात पगारी लोक वेगवेगळ्या पदांवर काम करत असतात. पण या संस्थेत असं काहीच होत नाही. इथे कोणी पगारी कर्मचाऱ्याप्रमाणे काम करत नाही. हे या संस्थेचं वेगळेपण आहे.

सर्व कार्यक्रम वॉट्सअॅप ग्रुपवर ठरतात. वेगवेगळ्या क्षेत्रात, उच्च पदावर काम करणारे स्वयंसेवक संस्थेत आहेत. ते आपापल्या क्षेत्रानुसार संस्थेत योगदान देतात. सर्व स्वयंसेवक स्वत:हून यात सहभागी झाले. आणि उत्साहाने कामं करू लागले. सर्व स्वयंसेवकांची एकमेकांशी प्रत्यक्ष भेट फारशी होत नाही. त्यामुळे समाजकार्यात कोणताच खंड पडत नाही. यातूनच पुढे इनफॉरमल संस्थेला एक फॉरमल रुप आलं. आणि इथूनच फँड्री फाऊंडेशनचा प्रवास सुरू झाला.

हेही वाचा: नागराज मंजुळेंनी आरएसएसच्या शाखेत जाणं का थांबवलं?

कुरुंग किल्ल्यावर पर्यटन सुरू केलं

फँड्री फाऊंडेशन ही संस्था पाच वर्षांपूर्वी सुरू झाली. तेव्हापासूनच पालघरमधल्या डहाणूतल्या आदीवासी पाड्यातल्या गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत करतेय. तसंच गावकऱ्यांना स्वयंरोजगारही मिळवून दिलाय. कारण गावकरी स्वत:च्या पायावर उभे राहिले तरच गावचा विकास करू शकतील. म्हणूनच त्यांना बारमाही पिकांसंदर्भात मदत केली जातेय. तसंच पाड्यातल्या लोकांना बहुगुणी समजल्या जाणाऱ्या कडकनाथ कोंबड्यांचं पालन करण्यास प्रोत्साहन दिलं.

नाशिकमधल्या इगतपुरीतल्या कुरुंग किल्ल्याच्या पायथ्याशी कुरुंगवाडी नावाची वस्ती आहे. इथल्या आदीवासी भागालाही स्वयंरोजगारासाठी मदत केली जाते. फँड्री फाऊंडेशनने ९९ हायकिंग म्हणजे सोप्पं ट्रेकिंग किंवा अडथळा नसलेल्या रस्त्याने आरामात चालणं. अशा हायकिंग ग्रुपच्या मदतीने कुरुंग किल्ल्यावर पर्यटन सुरू केलं.

या उपक्रमात तिथल्या स्थानिक लोकांना सहभागी करुन घेतलं. त्यामुळे त्यांच्यासाठी एक रोजगाराचा मार्ग खुला झालाय. या ठिकाणी संस्थेतर्फे जांभूळ वन तयार करण्यात आलंय. त्याच्या संगोपनाचं काम सुरूय. या वनाचा फायदा गावकऱ्यांना भविष्यात होईल.

हेही वाचा: ईश्वरी अवतारापलीकडे माणूस म्हणून कृष्णचरित्र समजून घेऊया

३ हजार ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मदत

यावर्षी ६ जिल्ह्यातल्या ५३ गावांमधल्या ५३ शाळेत साहित्य वाटप केलं. हे वाटप ३ हजार ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना केले. यात वह्या, पट्टी, पेन्सिल असं साहित्यदिलं. यासाठी साधारण ७.५ लाख इतका खर्च आला. हे पैसे मुंबईसह इतर शहरातल्या लोकांनी दिलेत. तसंच स्वयंसेवकांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन वस्तू गोळा केलं.

हे साहित्य वाटण्यातही पद्धत होती. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणच्या शाळांनी आपल्याकडे गरज असल्याचं कळवलं होतं. त्याप्रमाणे साहीत्याचं सॉर्टींग म्हणजे वर्गीकरण करण्यात आलं. आणि मग वापटपाचं काम केलं.

२०१४ मधे पहिल्या उपक्रमात २०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आलं होतं. आणि यंदा म्हणजे बरोबर ५ वर्षांनी २०१९मधे ३ हजार ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही मदत पोचवता आली.

हेही वाचा: उत्तर भारतातले रोहिदास भक्त मोदी सरकारवर एवढे नाराज का?

गणपती सणाच्या निमित्ताने समाजकार्य

आता काही दिवसातच गणेश चतुर्थी येईल. आपल्या सण-उत्सवांचं स्वरुप बदलतंय. जे आपल्याला लाडक्या गणपत्ती बाप्पांच्या मोठमोठ्या आगमन सोहळ्यातून दिसतं.  धुमधडाक्यात होणऱ्या सोहळ्यात सहभागी व्हायचं. आणि फेसबूक, इंस्टाग्रामवर त्याचे अपडेट द्यायचे. पण या सगळ्याचं सामाजिक बांधिलकीशी काहीच नातं नसल्याचं दिसतं. म्हणूनच २०१५ पासून सर्व तरुणांनी मिळून गणपती डोनेशन बॉक्सची संकल्पना राबवतात.

गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्याच्याकडे आशीर्वाद मागितला की आपला हात सहज खिशाकडे जातो. आणि आपण ठराविक रक्कम दानपेटीत टाकतो. ही रक्कम डोनेशन बॉक्सच्या माध्यमातून गोळा करून ती शैक्षणिक साहित्य, गावकऱ्यांच्या रोजगारासाठी वापरण्यात येते. आणि ही जबाबदारी फँड्री फाऊंडेशन घेतं. यावर्षीसुद्धा हा उपक्रम राबवला जाणार आहे.

फँड्री फाऊंडेशनच्या वेबसाईट, फेसबुक पेजवर आपल्याला या उपक्रमाची सर्व माहिती मिळेल. तसंच हे उपक्रम राबवताना आपण प्रत्यक्ष पाड्यांमधे जाऊ शकतो. आपल्या घरी, सोसायटीत, मंडळात ठेवण्याचं आवाहन फँड्री फाऊंडेशनने केलंय. जर आपल्याकडे किंवा आपल्या जवळपास बाप्पाचं आगमन होत नसेल. तर आपण हा संदेश आपल्या मित्रपरिवारात नक्की पोचवू शकता. अशाप्रकारेही आपण या उपक्रमात सहभागी होऊ शकता.

डोनेशन बॉक्स मिळवण्यासाठी

आपला गणपती डोनेशन बॉक्स घरपोचही मिळवता येईल. यासाठी फँड्री फाऊंडेशनचे स्वयंसेवक दीपक - ९२२३२८३१४९ आणि प्रथमेश - ९०२९७१४३८७ यांना कॉल किंवा वॉट्स अॅप करू शकता. आपण साजरे करत असलेल्या उत्सवांना सामाजिक बांधिलकीची जोड देणं हाच यामागचा हेतू आहे. जो सर्वांच्या सहाय्याने पूर्ण करायचाय. यासाठी आपणही त्यांच्या सोबत असायला हवं.

हेही वाचा: 

मंदीतही पॅथॉलॉजीच्या धंद्यात खुणावतेय संधी

अरुण जेटलींना पत्रकार ब्यूरो चीफ म्हणायचे!

नरेंद्र मोदींना खलनायक करुन हाती काहीच लागणार नाही

अमेझॉनच्या जंगलातली आग विझवण्यासाठी ब्राझीलने चक्क मिलिट्री पाठवली