कोरोनानंतर दोन मोठी संकटं आपली वाट पाहतायत: नॉम चॉम्स्की

२४ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


कोरोना संकटामुळे मानवी इतिहासात निर्माण झाले नव्हते, असे दोन सर्वांत मोठे धोके दिसत आहेत. एक म्हणजे अण्वस्त्र युद्धाचा वाढणारा धोका आणि दुसरा म्हणजे जागतिक तापमानवाढ. कोरोना वायरस भयानक आहे आणि त्याचे परिणामही तितकेच भयानक होऊ शकतात. पण आपण यातून बाहेर पडू शकतो. इतर दोन धोक्यांपासून आपली सुटका नाही, असा धोका जगप्रसिद्ध विचारवंत नॉम चॉम्स्की बोलून दाखवतात.

९१ वर्षांचे नॉम चॉम्स्की हे अमेरिकेतले प्रख्यात भाषाशास्त्रज्ञ आणि राजकीय विश्लेषक आहेत. मूळ अमेरिकी असलेले चॉम्स्की तिथल्या एकाधिकारशाही विरोधात सातत्याने आवाज उठवतात. त्यांच्या परखड राजकीय भूमिकांमुळे ते कायम चर्चेत राहिलेत. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतल्या एरिझोना राज्याल्या डायम २५ टीवी या चॅनेलवरच्या एका कार्यक्रमात पत्रकार श्रीरेको होर्वात यांनी चोम्स्की यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत ते अर्थातच कोरोनाबाबत बोललेत.

जगभरात कोरोना वायरसाचा प्रादुर्भाव ज्या पद्धतीने वाढतोय. त्यामुळे स्वतः चोम्स्की सेल्फ आयसोलेशनमधे आहेत. अमेरिकेतली परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होतेय. कोरोना वायरसच्या पार्श्वभूमीवरचं त्यांचं हे विवेचन अतिशय महत्वाचंय. प्रेसेंजा, इंटरनॅशनल प्रेस एजेंसी या पोर्टलवर आलेल्या नॉम चॉम्स्की आणि होर्वात यांच्यातल्या इंग्रजी संवादाचा हा अनुवादित भाग इथे देत आहोत. अक्षय शारदा शरद यांनी हा अनुवाद केलाय.

हेही वाचा : फरीद झकेरिया सांगतात, लॉकडाऊनची संधी न हेरल्यास भारताचा अमेरिका होईल

कोरोनानंतरचे दोन मोठे धोके

कोरोना वायरसचं संकट गंभीर आहे आणि त्याचे परिणाम हे दीर्घकालीन असतील. मानवतेच्या दृष्टीने पुढचे दोन धोके भीतीदायक आहेत. अणु युद्ध आणि ग्लोबल वार्मिंग अर्थात जागतिक तापमानवाढ. नव उदारमतवादी धोरणांमुळे म्हणजेच उद्योगधंद्यांची भरभराट करण्याच्या मागे लागल्यामुळे हे सगळे धोके अधिक तीव्र झालेत. हे संकट संपल्यानंतरचे पर्याय एकतर बेबंद हुकूमशाही, क्रूर राज्य यंत्रणा किंवा समाजाची मूलगामी पुनर्रचना असेच असतील.

या दृष्टीने आजचा काळ निर्णायक आहे. डोनाल्ड ट्रम्प या अशा काळाचं नेतृत्व करतायत. ट्रम्प हे 'सोशिओपॅथ बफन' आहेत. नैतिक जबाबदारीचं भान नसलेला 'समाजघातकी विदूषक'. आताचं कोरोना वायरस संकट हे गंभीर आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी या संकटामुळे मानवी इतिहासात घडलेल्या कोणत्याही गोष्टींपेक्षा दोन जास्त मोठे धोके जवळ येताहेत.

एक म्हणजे अण्वस्त्र युद्धाचा वाढणारा धोका आणि दुसरा म्हणजे जागतिक तापमानवाढ. कोरोना वायरस भयानक आहे आणि त्याचे परिणामही तितकेच भयानक होऊ शकतात. पण आपण यातून बाहेर पडू शकतो. इतर दोन धोक्यांपासून आपली सुटका नाही.

आपल्याला कशा प्रकारचं जग हवंय?

अमेरिकेकडे प्रचंड शक्ती आहे. बाकी सगळे सोबत चालत असताना हा इराण आणि क्युबासारख्या देशांवर निर्बंध लादणारा एकमेव देश आहे. इतर देश अमेरिकेच्या निर्बंधामुळे त्रस्त आहेत. असं असलं तरी आजच्या या वायरसच्या संकट काळात सर्वात विचित्र वाटणारी गोष्ट म्हणजे क्युबासारखा देश युरोपला मदत करतोय. याउलट युरोपियन युनियनचा भाग असलेले जर्मनी, ग्रीससारखे देश एकमेकांना मदत करताना दिसत नाहीत. पण क्युबा युरोपियन देशांच्या मदतीला धावलाय. भूमध्य समुद्रात हजारो स्थलांतरित आणि निर्वासितांच्या मृत्यूची भर पडतेय. पश्चिमेकडे आलेलं हे संकट या क्षणी अधिक भयानक आहे.

युद्धाला महत्व देणारी अलंकारिक भाषा आज महत्वाची ठरतेय. आपल्याला या संकटाचा सामना करायचा असेल तर युद्धाच्या वेळी सैन्य एकत्रित करण्यासारखं आपल्याला काहीतरी करावं लागेल. उदाहरणार्थ, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेनं पैशाची जमवाजमव केली. देशाला जास्त कर्ज दिलं गेलं आणि अमेरिकेच्या उत्पादनात चौपट वाढ झाली. 

अल्पकाळ चालणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी आपल्याला अशी मानसिकता गरजेची आहे. असा व्यवहार श्रीमंत देश करू शकतात. आजच्या सुसंस्कृत जगात, श्रीमंत देश इतरांचा गळा दाबण्याऐवजी एकमेकांना मदत करतील तरच हे शक्य आहे. कोरोना वायरसचं संकट लोकांना कोणत्या प्रकारचं जग हवंय याचा विचार करायला लावेल.

हे कोरोना  स्पेशलही वाचा : 

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

जगाच्या तुलनेत भारत कसा लढतोय कोरोनाशी?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

नव उदारमतवादाचा रोग

बाजारपेठांमधे आलेलं अपयश, सामाजिक, आर्थिक समस्या आणि या सगळ्याला जखडू पाहणारी नव उदारमतवादी धोरणं यामागे आहेत. साथीच्या रोगांचे आजार जगभर पसरण्याची शक्यता असते हे आपल्याला पूर्वीपासून माहिती आहे. साथीच्या आजारांपासून बचाव करायचा तर सध्या काही तातडीचे किरकोळ बदल करून आपल्याला लवकरात लवकर लस उपलब्ध करावी लागेल.

मोठ्या औषधांच्याबाबत सरकारला पावलं टाकणं अवघड आहे. संपूर्ण विनाश टाळणारी एखादी लस शोधण्यापेक्षा नवीन बॉडी क्रिम बनवणं त्यांच्याकरता अधिक फायद्याचं आहे. पोलिओचा धोका साल्क लसीद्वारे संपवला गेला. सरकारी संस्थेकडून पेटंट्स उपलब्ध होत नाहीयत. हे करता आलं असतं पण नवउदारमतवादाच्या रोगानं यांना अडवलंय.

संकटाकडे दुर्लक्ष केलं

ऑक्टोबर २०१९ मधे या संभाव्य साथीची अमेरिकेसोबत इतर देशांनी नक्कलच केली. पण काहीही झालं नाही. ३१ डिसेंबरला चीनने याबद्दलची माहिती जागतिक आरोग्य संघटनेला दिली. पुढे आठवडाभरात चीनच्या वैज्ञानिकांनी हा कोरोना वायरस असल्याचं सांगितलं आणि मग त्याची माहिती जगाला झाली.

चीन, दक्षिण कोरिया, तैवान या देशांनी काहीतरी करायला सुरवात केली. संकट काळाच्या पहिल्याच टप्प्यात हे देश सापडले. युरोपातही काही प्रमाणात हे घडलं. जर्मनीनं वेळकाळ बघून आगेकूच केली. त्यांच्याकडे एक सुदृढ अशी आरोग्य व्यवस्था आहे. तो देश स्वतःचा विचार करण्याइतका सक्षम आहे. पण तोही देश यात कमी पडला. बाकीच्यांनी तर दुर्लक्ष केलं. सगळ्यात वाईट म्हणजे इंग्लंड आणि अमेरिकेचं.

हेही वाचा : राजकारणातल्या पूर्वग्रहांच्या नजरेनंच साथीच्या रोगांकडेही बघणार का?

निर्णायकी भूमिकेत यायला हवं

आपण या संकटावर विजय मिळवल्यानंतर काही पर्याय आपल्यासमोर उपलब्ध असतील. अत्यंत हुकूमशाही,  क्रूर, पाशवी अशा राज्यांची स्थापना करण्यापासून ते समाजाची मूलभूत रचना असे ते पर्याय आहेत. सोबत मानवी दृष्टीकोनातून पाहिलं तर खासगी नफ्याऐवजी माणसांच्या गरजांशी संबंधित गोष्टीही असतील. लोक एकत्र येतील, बिझी होतील आणि अधिक चांगलं जग घडवतील.

दुसरीकडे प्रचंड समस्या उद्भवतील. आपण अगदी रस्त्यावर येऊन आण्विक युद्धाचा सामना करू. हे संकट आधीपेक्षा आता जास्त जवळ आलंय. पर्यावरणीय आपतींच्या समस्येतूनही आपली मुक्तता झालेली नाही. जोपर्यंत निर्णायक भूमिकेत आपण येत नाही तोपर्यंत हे शक्य नाही.

त्यामुळेच मानवी इतिहासातला हा एक महत्वाचा क्षण आहे. हे केवळ कोरोना वायरसमुळे नाही. आपल्याला जगभरातल्या त्रुटी, बिघडलेल्या सामाजिक, आर्थिक व्यवस्थेची वैशिष्ट्यं समजायला हवीत. या सगळ्यांचं अस्तित्व टिकवू पाहणारं भविष्य बदलायला हवं. आजच्या काळाचा सामना कसा करायचा याचा हा एक धडा आहे. एक इशारा दिला गेलाय. त्याचा स्फोट होऊ नये. जर खोलवर विचार केला नाही तर यापेक्षा भयानक संकट उद्भवू शकेल.

आज जगभरातल्या २ अब्जापेक्षा अधिक लोकांना क्वारंटाइनच्या स्थितीला तोंड द्यावं लागतंय. सोशल डिस्टन्सिंगचं रूप अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. ते अत्यंत हानिकारकही आहे. 

नवीन मार्ग शोधायला हवेत

आताची स्थिती ही सोशल डिस्टंसिंगची आहे. सामाजिक बंधनांचा पुन्हा पुन्हा विचार करून त्यावर मात करणं आवश्यक आहे. गरजू लोकांना मदत अशा कोणत्याही स्वरूपात ते केलं जाऊ शकते. त्यांच्याशी संपर्क साधून, संस्थांना बळकटी देऊन आणि विचाराच्या कक्षा रुंदावत जाण्यातून आपल्याला हे शक्य होईल.

कार्यशील होण्यासाठी आणि कार्यशील होण्याआधी, भविष्यासाठी योजना बनवणं, इंटरनेट युगात लोकांना जमेल तसं एकत्र आणणं, त्यांच्याशी संवाद साधणं, जाणीवपूर्वक गोष्टी समजून घेऊन त्यांच्या अडचणींची उत्तरं शोधून काढणं आणि त्यावर काम करणं अशा प्रकारे हे सर्व केलं जाऊ शकतं.

हा समोरासमोर उभं राहून केलेला संवाद नाही. थोड्या काळासाठी आपल्याला त्यापासून वंचित राहता येईल. नवीन मार्ग शोधा आणि शोधणं चालू ठेवा. पर्यायांचा विचार आणि विस्तार करा. हे केलं जाऊ शकतं. हे सोपं नाही, पण माणसाला समस्यांचा सामना भूतकाळात ही करावा लागला होताच की!

हेही वाचा : 

लॉकडाऊनमधे पॉर्न पहातच आहात; तर त्याआधी हे वाचा

आज लेनिनचं भारताशी असलेलं नातं समजून घ्यावंच लागेल

कोलंबसने नेलेल्या साथरोगांनीच संपवली मूळ अमेरिकी संस्कृती

अमेरिकेत ट्रम्प निवडून येणं हीच असेल जगासाठी मोठी दुःखद बातमी

पाचवीला पुजलेल्या प्लेग लॉकडाऊनमुळेच जगाला शेक्सपिअर मिळाला!