म्युच्युअल फंडमधली गुंतवणूक एकट्याला किंवा दोघांनाही करता येते. तीन जणांच्या माध्यमातूनही म्युच्युअल फंडची गुंतवणूक होते. गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर ते युनिट नॉमिनीच्या नावावर ट्रान्सफर होतं. पण नियम बदलतात. त्यासाठी आपल्याला कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते.
म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक कधीही काढता येते. डिजिटल गुंतवणुकीमुळे एका क्लिकवर आपण त्यातले सगळे पैसे काढून घेऊ शकता. म्हणूनच म्युच्युअल फंडमधले पैसे काढणं अतिशय सोपं आणि सुटसुटीत मानलं जातं. मात्र गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला तर पैसे काढायचे नियम बदलतात.
अनेक नियम असल्यामुळे गुंतवणूकदाराचं कुटुंब म्युच्युअल फंडमधले पैसे काढू शकत नाही. म्हणूनच गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला तर पैसे काढण्याची एक प्रक्रिया असते. म्युच्युअल फंडमधली गुंतवणूक एकट्याला किंवा दोघांनाही करता येते. तीन जणांच्या माध्यमातूनही म्युच्युअल फंडची गुंतवणूक होते. गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर ते युनिट नॉमिनीच्या नावावर ट्रान्सफर होतं.
कायदेशीर प्रक्रियेतून जावं लागतं. नॉमिनी केवळ गुंतवणुकीचा कस्टोडियन असतो. नॉमिनीला कायदेशीर वारशाला पैसे द्यावे लागतात. शेवटी भविष्यातल्या गुंतवणुकीतली कायदेशीर गुंतागुंत टाळण्यासाठी प्रत्येक गुंतवणुकीला नॉमिनी देणं आवश्यक असतो. एकट्याने गुंतवणूक करण्याऐवजी एकत्रित गुंतवणुकीबद्दल आग्रही असायला हवं.
हेही वाचा: आपण आपले म्युच्युअल फंड्स कधी विकले पाहिजेत?
दोन गुंतवणूकदारांपैकी एकाचा मृत्यू झाला तर मृत गुंतवणूकदाराचं डेथ सर्टिफिकेट सादर करावं लागतं. या सर्टिफिकेटला गॅझेटेड अधिकार्याने अटेस्टेड करणं गरजेचं असतं. बँक मॅनेजरकडूनही सर्टिफिकेट अटेस्टेड करता येतं. गुंतवणूकदाराच्या नावाने कॅन्सल चेकदेखील देता येतो. बँक अकाऊंट स्टेटमेंटही यावेळी मान्य होईल.
हयात असलेल्या गुंतवणूकदाराचा केवायसी झाला नसेल तर 'फॉरेन अकाऊंट टॅक्स कंप्लायन्स अॅक्ट' आणि 'कॉमन रिपोर्टिंग स्टँडर्ड'ची संपूर्ण माहिती देणं आवश्यक आहे. म्युच्युअल फंड डिमॅटमधे असतील, तर म्युच्युअल फंडचे युनिट डिमॅट खात्यात असतील, तर अशा स्थितीत ट्रान्स्फरची प्रक्रिया समान असते.
केवळ डिमॅटची कागदपत्रं वेगळी असतील. जर क्लेम दोन लाखापेक्षा अधिक असेल तर क्लेमसाठी नोटरी केलेली विलची कॉपी, कायदेशीर वारस असलेलं आणि कोर्टकडून जारी केलेलं सर्टिफिकेट जमा करावं लागेल. त्याचबरोबर एफएटीसीए, सीआरएसला संपूर्ण माहिती द्यावी लागेल.
सोबतच्या गुंतवणूकदारांचा मृत्यू झाला तर नॉमिनीच्या क्लेमसाठी रिक्वेस्ट लेटर द्यावं लागेल. त्याचबरोबर मृत्यू झालेल्यांचं डेथ सर्टिफिकेट सादर करणं गरजेचं आहे. सर्टिफिकेटला गॅझेटेड अधिकार्याकडून अटेस्ट करायला हवं.
बँक मॅनेजरकडूनही सर्टिफिकेट अटेस्टेड करून घेता येतं. नॉमिनीसाठी केवायसीदेखील करणं गरजेचं आहे. यासाठी एफएटीसीए आणि सीआरएसची माहिती सादर करणे आवश्यक आहे.
हेही वाचा: एफडी : रिस्क फ्री गुंतवणुकीचा बेस्ट पर्याय
नॉमिनीला क्लेसाठी रिक्वेस्ट लेटर सादर करावं लागेल. त्यानुसार मृत्यू झालेल्या गुंतवणूकदाराचं डेथ सर्टिफिकेट सादर करणं आवश्यक आहे. त्यानंतर सर्टिर्फिकेटला गॅझेटेड अधिकार्यांकडून अॅटेस्टेड करावं लागतं. बँक मॅनेजरकडून देखील अॅटेस्टेड करता येतं.
नॉमिनीसाठी केवायसी आवश्यक आहे. कायदेशीर वारस होण्यासाठी बाँड अॅनेश्चर ३१, कायदेशीर वारशासाठी वैयक्तिक शपथपत्र अॅनेक्श्चर ४१ द्यावं लागेल. दोन लाखांपेक्षा कमी रक्कम असेल तर नातं सिद्ध करावं लागतं. दोन लाखांपेक्षा अधिक रक्कम असेल तर कागदपत्रं सादर करावी लागतील.
हेही वाचा:
पेट्रोलची शंभरी पार, जबाबदार आधीचं सरकार?
टू डेज वन नाईट: बेरोजगार कुटुंबाची जागतिक गोष्ट
(जगदीश काळे यांचा लेख दैनिक पुढारीच्या अर्थभान पानावरून घेतलाय)