लोकसभा निवडणुकीचे कल यायला सुरवात झालीय. सुरवातीच्या ट्रेंडमधे भाजप आघाडीवर आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या जागांमधे गेल्या वेळपेक्षा चांगली वाढ होतेय. तर भाजपच्या जागा मात्र घटताना दिसताहेत. महाराष्ट्रात एक्झिट पोल तितके खरे होताना दिसत नाहीत.
सकाळी सात वाजता मतमोजणी सुरू झाली. पहिल्यांदा पोस्टल मतपत्रिकांच्या मतमोजणीचा कल पुढे आला. नऊ वाजेपर्यंत ५४२ पैकी २३५ जागांचे कल आले. भाजप आघाडीने १३३ तर काँग्रेसने ४१ जागांवर आघाडी घेतली. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर शिवसेना ८ जागांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे, असं इलेक्शन कमिशनची आकडेवारी सांगते.
टीवी चॅनेलवरच्या वेगवेगळ्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात भाजप २२, शिवसेना ११, काँग्रेस ५, राष्ट्रवादी काँग्रेस ९ आणि वंचित बहुजन आघाडी एका जागेवर आघाडीवर आहे. औरंगाबादमधून वंचितचे इम्तियाज जलील हे आघाडीवर आहेत.
Take a look at the Partywise Trends and Results for the following states.
— Election Commission #DeshKaMahatyohar (@ECISVEEP) May 23, 2019
For more Live updates on #ElectionResults2019, visit: https://t.co/wlT737XpW2
Or stay connected to our Twitter handle for Live updates.#Chattisgarh #Mizoram #HimachalPradesh #AndhraPradesh pic.twitter.com/6j7cg9cnEC
देशातून पहिला कल कर्नाटकमधून आला. चिकोडी या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपने आघाडी घेतली. गेल्यावेळी मोदीलाटेतही काँग्रेसने ही जागा आपल्याकडे राखली होती. पण यावेळी सुरवातीच्या ट्रेंडमधे काँग्रेस पिछाडीवर बघायला मिळाली.
बॅलेट पेपरमधे महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेसाठी खूप धक्कादायक ट्रेंड दिसला. युतीच्या गेल्यावेळच्या जागांमधे घट होताना दिसली. महत्त्वाचं म्हणजे जवळपास सगळ्याच एक्झिट पोलमधे भाजप, शिवसेना युतीला चांगल्या जागा मिळतील, असा कयास वर्तवण्यात आला होता. पण तसं सुरवातीच्या ट्रेंडमधे दिसत नाही.
वेगवेगळ्या ठिकाणी सरकारी कामांवर असलेल्या नोकरदारांना बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान करण्याची संधी मिळते. यामधे उत्तर प्रदेशात काँग्रेसला चांगलं मतदान झालेलं बघायला मिळालं.
हेही वाचा: २३ मेला कुणाचं सरकार येईल? वाचा पाच शक्यता
एनडीटीवीवरच्या सकाळी सव्वानऊपर्यंतच्या आकडेवारीनुसार, भाजपला २७२ तर काँग्रेसला १०४ जागा ट्रेंडमधे दिसल्या. महत्त्वाचं म्हणजे यामधे भाजप ४४ ठिकाणी मागं दिसली तर काँग्रेस ४८ जागांवर पुढे चालताना दिसली. इतरांच्या जागा ९१ वर होत्या.
यूपीमधे आश्चर्यकारकरित्या काँग्रेसला आघाडी मिळालेली दिसली. याचा परिणाम म्हणून सपा, बसपा महागठबंधन अपेक्षित कामगिरी करताना दिसली नाही. पश्चिम बंगाल, ओडिशामधे भाजपला गेल्यावेळपेक्षा चांगली आघाडी मिळतेय.
हेही वाचा: असाही एक पोल आहे, ज्यानुसार मोदींना सरकार बनवणं सोपं नाही
वाराणसीमधे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिल्या राऊंडमधे ११ हजार मतं मिळाली. प्राथमिक आकडेवारीनुसार यात मोदींना केवळ दोनेक हजार मतांचीच लीड मिळताना दिसतेय.
दक्षिण भारतातून काँग्रेसच्या बाजूने चांगला कल येताना दिसतोय. आतापर्यंतच्या ट्रेंडमधे तामिळनाडूत काँग्रेस आघाडीतल्या डीएमके आघाडीवर आहे. भाजप आघाडीला इथे चांगली कामगिरी करता आली नाही.
हेही वाचा: विश्वसुंदरी ठरलेल्या महाराणी गायत्री देवींनी संसदही गाजवलं