अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध लढणारा आधुनिक 'कर्णन'

१४ जून २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


'कर्णन' हा सिनेमा दक्षिण तमिळनाडूतल्या सुपीक पट्ट्यात असलेल्या तिरूनेलवेली या भागात घडतो. तिथं जातीयतेचा लोक प्रतिकार करताहेत. पण जातीवर आधारित क्रौर्य पद्धतशीरपणे घडवणारे लोक मात्र हिरव्यागार शेतात राहतायत. महाभारतात कर्ण हा एक क्षत्रिय आहे. ज्याचा सांभाळ बाहेरच्या पालकांनी केलाय. सेल्वाराज यांच्या 'कर्णन'ला मात्र अधिमान्यता मिळवण्यासाठी क्षत्रिय असण्याची गरज नाही.

तमिळ दिग्दर्शक मारी सेल्वाराज यांचा कर्णन हा सिनेमा अनेक स्तरांवर आपल्याला ठाम राहायला सांगतो. दृश्यमान आणि अदृश्य अशा लढायांची, उलथापालथींची आणि गंभीरपणे प्रवेश करणाऱ्या, खोलवर खचलेल्या एका पावर ब्लॉकसच्या उत्कर्षाची ही कथा आहे.

२०१८ च्या 'परियेरम पेरुमल' नंतर मारी सेल्वाराजचा हा दुसरा सिनेमा. धनुष या सुप्रसिद्ध अष्टपैलू अभिनेत्याची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा यावर्षी ९ एप्रिलला थिएटरमधे प्रदर्शित झाला होता. तर ॲमेझॉन प्राईमवर १४ मे रोजी प्रदर्शित झाला. तमिळ नसलेल्या अनेक प्रेक्षकांचं प्रेम, कौतुक या सिनेमाला मिळतंय.

'कर्णन' हा सिनेमा दक्षिण तमिळनाडूतल्या सुपीक पट्ट्यात असलेल्या तिरूनेलवेली या भागात घडतो. तिथं जातीयतेचा लोक प्रतिकार करताहेत. पण जातीवर आधारित क्रौर्य पद्धतशीरपणे घडवणारे लोक मात्र हिरव्यागार शेतात राहतायत.

इथल्या पोडीयांकुलम गावात खालच्या जातीच्या लोकांचा समूह राहतो. त्यांना बसस्टॉप हवाय जो गावची आरोग्य सेवा आणि शिक्षणाची सोय निश्चित करू शकेल. हा बस स्टॉप म्हणजे अवलंबून राहणं आणि प्रतिनिधित्व करणं यात ला फरक आहे. म्हणूनच उच्चजातीय लोकांना त्याचं बांधकाम रोखण्यासाठी हरतऱ्हेनं प्रयत्न केलेत.

हेही वाचा: ‘जेजुरी’ समजवणाऱ्या एका दुर्लक्षित पुस्तकाची पंचविशी

एका महाकाव्यसदृश्य युद्धाच्या रुपात मारी सेल्वाराज जुन्या पौराणिक कथेतून नवं सृजन घडवतात. ते त्यांच्या पात्रांना हिंदू धर्मातल्या पौराणिक देवदेवतांची नावं देतात. उदाहरणार्थ कर्णन किंवा कर्ण. येमेन राजा किंवा यम आणि द्रौपथी किंवा द्रौपदी. ही महाभारत या महाकाव्यातली उच्च जातीची पात्रं आहेत.

पण सिनेमात ही पात्रं उच्च जातीच्या आरक्षित पात्रांच्या नावाचा उच्चार अभिमानाने करताना दिसतात. हा अधिक्षेप त्यांच्यावर अन्याय करणाऱ्यांच्या 'अहम्' ला आपसूकच विरोध करतो. त्यांना असं वाटतं की, अशा दाव्यांचा त्यांना कोणताही हक्क नाही.

महाभारतात कर्ण हा एक क्षत्रिय आहे. ज्याचा सांभाळ बाहेरच्या पालकांनी केलाय. सेल्वाराज यांच्या 'कर्णन'ला मात्र अधिमान्यता मिळवण्यासाठी क्षत्रिय असण्याची गरज नाही. कर्णनचं योद्धा असणं हे जातियतेविरुद्धचा पर्याय सांगणं आहे. ही अशी व्यवस्था आहे जी त्याला गुन्हेगार ठरवते आणि त्याचे स्वतःचे लोक, गावकरी त्याच्या कृत्यांना आख्यायिका मानतात.

त्याचं गाण्यांतून गौरवगान करताना पहायला मिळतात. संतोष नारायण यांचं संगीत, गाणी लोकवाद्यांच्या समन्वयातून याच गोष्टींचा नेमका शोध घेतात. कर्णनच्या उत्पत्तिविषयी, मुळाविषयी असणारे प्रतिज्ञावजा 'कंदा वारा चोल्लुंगा' हे गाणं असो किंवा आंतरजातीय विवाहाबद्दल गोंधळलेल्या गोड मंजनथीचे 'मंजनाथी पुराणम' असो ही गाणी म्हणजे एकप्रकारे राजकीय घोषणाच आहेत.

मारी सेल्वाराज यांनी त्यांच्या कथानकाला लोकदेवतांच्या संस्कृतायझेशनचा एक आणखी स्तर जोडलाय. तमिळनाडूतल्या अनेक लोकदेवतांच्या मूळ कथा जातीय हिंसेच्या आहेत, सेल्वाराज अतिशय चातुर्याने त्याचा शोध घेतात.

हेही वाचा: इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप

कर्णनच्या धाकट्या बहिणीचा जवळच्या हॉस्पिटलमधे नेण्यापूर्वीच अपस्माराच्या फिटमुळे रस्त्यावरच मृत्यू होतो. ती गावाची कल्पित ग्रामदेवता, पालकदेवता कट्टू पेची बनते. सिनेमात हिंसाचाराचं चित्रण केल्याबद्दल चित्रपटावर टीका झालीय. पण धनुषच्या नायकत्वाने त्याला एक प्रभावी उत्तरही दिलंय.

सजग आणि वडीलधारा येमेन कर्णनला उच्च जातीतल्या कपटी मेलुर गावच्या गावकऱ्यांशी सावध आणि संयमाने भिडण्याचा सल्ला देतात. तेव्हा कर्णन प्रत्युत्तर देताना म्हणतो, 'मी असं का करावं? आपलं जीवन आता संपलंय. आमची नुकतीच सुरवात आहे. आपण जिथे जाण्याचा प्रयत्न करतो तिथे आमचा मार्ग अडवतात आणि आमचे पंख छाटतात!'

नंतर गावातले दिवस भरत आलेल्या, बसची वाट पाहणाऱ्या गर्भवती महिलेकडे दुर्लक्ष करत बस पुढे निघून जाते पण तिचा लहान मुलगा दगड भिरकावून त्या बसची काच फोडतो आणि बस थांबायला भाग पाडतो. यातून मारी सेल्वाराज दाखवतात की, मानवी जीवनापेक्षा मालमत्तेला महत्त्व देणारी ही अशी व्यवस्था मूलतः तिच्याविरुद्ध लढा देणाऱ्यांपेक्षा कितीतरी पटींनी जास्त हिंसक आहे.

१९६४ ला प्रदर्शित झालेल्या जुन्या कर्णन या सिनेमाच्या चाहत्यांना या शीर्षकाने भीती वाटली. हे शीर्षक त्यांना खटकलं. नामांकित तमिळ अभिनेत्याला समर्पित असणाऱ्या कल्याणकारी संस्थेच्या सदस्यांनी २०२० ला अभिनेता धनुष याला एक पत्र लिहून आपल्या सिनेमाचं नाव बदलायला सांगितलं.

तसंच एकाच पात्राच्या दोन भिन्न भिन्न आवृत्त्यांची कल्पना करणं अशक्य आहे. एक गोरा, उजळ, सामर्थ्यशाली, तेज:पुंज आणि वजनदार सोन्याचं आभूषण आणि संस्कृत महाभारताला अनुरूप असणारा. दुसरा म्हणजे बारीक शरीरयष्टी असणारा, काळया रंगाचा, अंगावर सुंदर दागिने नसणारा, दैवी चिलखत नसणारा, अगदी कसलीच जोरकस अनुरूपता नसणारा. हा मारी सेल्वाराज यांचा कर्णन आहे. जो खरा वाटतो, ज्याच्याशी आपण सहानुभूती दर्शवितो, ज्याला तुम्ही जात नष्ट करण्याचा लढा चाललेला असेल, तिथं भेटत राहता.

हेही वाचा: 

अजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी

आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा

आमच्या प्रेमाचा एक तर सैराट होतो नाहीतर काकण!

बॉलिवूडच्या सिनेमात कधी आनंदी दलित पाहिलाय का?

भानूताई सिनेमाच्या काळाचा अभ्यास करून वेशभूषा ठरवायच्या

(लेखक साहित्य, सिनेमा आणि संस्कृती या विषयांचे अभ्यासक आहेत)