कोरोनामुळे आपल्याला घरी बसावं लागतंय. पण असं काही पहिल्यांदाच घडत नाहीय. आपण घरात बसून माशा मारतो, किंवा गेम खेळतो. कॉलेजच्या वयातच न्यूटनही प्लेगच्या साथीत आपल्यासारखाच घरात अडकून बसला होता. पण न्यूटननं तेव्हा नवं जग घडवणाऱ्या संशोधनाचा पाया घातला.
दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच संपूर्ण जगाला आपल्या गुडघ्यावर आणणाऱ्या कोरोना वायरसनं सगळ्यांनाच घरात कोंडून घेण्यास भाग पाडलंय. जनता कर्फ्यू ही तर सुरवात आहे. परिस्थिती आणखी ढासळल्यास अजून काही दिवस घराबाहेर न पडण्याची आपल्याला सवय करून घ्यावी लागेल.
हेही वाचाः लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं जगभर होतंय कौतूक
मग एवढे दिवस घरात बसून करायचं तरी काय? करून करून किती 'नेटफ्लिक्स अँड चिल' करणार! डोळे लाल होऊन पाणी येईपर्यंत मोबाईलवर पडून राहिले तरी किती दिवस तसं करणार? एका मर्यादेनंतर कंटाळा तर येणारच. नोकरदारांना किमान 'वर्क फ्रॉम होम'मुळे वेळ घालवण्याचा पर्याय तरी आहे. पण कॉलेज विद्यार्थ्यांचं काय? त्यांनी हा अकस्मात मिळालेला फ्री टाईम दवडू नये. कारण न्यूटनवरसुद्धा अशीच महारोगाच्या साथीमुळे दोन वर्ष घरी बसण्याची वेळ आली होती.
हो, तोच सफरचंद पडल्यामुळे गुरुत्वाकर्षाणाचा शोध लावणारा न्यूटन. तोच न्यूटन ज्याच्या डोक्यावर टरबूज, कवट का नाही पडले असे मनोमन शिव्या घालणारे सायन्स अवघड जाणाऱ्या पोरांचा दुश्मन नंबर वन. त्यालासुद्धा ३५५ वर्षांपूर्वी कॉलेज सोडून आपल्या गावी जावे लागले होते. याच काळात त्याने काय केले माहितेय? गुरुत्वाकर्षण, कॅलक्युलस, ऑप्टिक्स असे एकाहून एक मोठेमोठे शोध लावले.
तर ही गोष्ट सुरू होते १६५५ पासून. पण त्याआधी आपल्या लेखाच्या हीरोविषयी थोडं.
१६४२ मधे एका शेतकरी बापाच्या घरी न्यूटनचा जन्म झाला. तेव्हाच्या कॅलेंडरनुसार तो ख्रिसमसचा पवित्र दिवस होता. पण त्याचा जन्म न्यूटन खानदानासाठी फारसा आनंददायी नव्हता. कारण जन्माच्या तीन महिने अगोदरच त्याचे वडील वारले.
तसंच त्याच्या आईचं प्रिमॅच्युअर बाळंतपण करावं लागलं. हे अशक्त बाळ पुढे ८४ वर्ष जगेल अशी कोणालाच कल्पनाच नव्हती. मग आईने दोन वर्षांनी दुसरं लग्न केल्यामुळे तो आपल्या मामाच्या घरीच म्हणजे लिंकनशरजवळच्या वुल्झथॉर्प इथे त्याचं बालपण गेलं.
न्यूटनला लहानपणापासूनच आपल्या सावत्रबापाचा प्रचंड द्वेष होता. नऊ वर्षांनी दुसऱ्या नवऱ्याचं निधन झाल्यानंतर त्याची आई परत आली. आधी तिला वाटायचं की, पोराने शेतीकडं लक्ष द्यावं. घरची प्रॉपर्टी सांभाळावी. पण दहा-बारा वर्षांच्या या पठ्याचं पुस्तकं सोडून गुरंढोरं वळण्याकडे लक्ष नव्हत. जगाच्या सुदैवाने त्याच्या मामाने पोराचा कल लवकर ओळखला आणि त्याचं बंद झालेलं शिक्षण पुन्हा सुरू केलं.
हे कोरोना स्पेशल लेखही वाचाः
एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?
कोरोनाशी धर्माचा संबंध लावणाऱ्यांचं काय करायचं बरं?
तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?
आपल्याला हात धुवायला शिकवणाऱ्या या दोघांना बिग थँक्यू
कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?
भारत कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजमधे गेलाय, म्हणजे धोका किती वाढलाय?
विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, मुंबईची पत्रकार सांगतेय स्वानुभव
शाळेत असतानाच त्याची बौद्धिक चुणूक दिसू लागली होती. घड्याळं, पवनचक्की अशी वेगवेगळी यंत्र त्यानं तयार केली. शाळेत त्याला गणित-विज्ञानापेक्षा लॅटिन भाषेचं पक्कं ज्ञान मिळालं. याचा फायदा असा झाला की, शाळेत शिकून झाल्यावर लगेच १६६१ मधे त्याला क्रेंब्रिज युनिवर्सिटीच्या ट्रिनिटी कॉलेजमधे प्रवेश मिळाला.
हा सारा युरोपमधल्या वैज्ञानिक क्रांतीचा काळ होता. कोपर्निकस आणि केप्लर यांनी खगोलशास्त्राचे नवे नियम मांडले तर गॅलिलियोनं भौतिकशास्त्राचा पाया भक्कम केला. डेकार्टने गणिताबरोबरच फिलॉसॉफिला विज्ञानाची जोड दिली. अशा काळात न्यूटनचं शिक्षण सुरू झालं.
कॉलेजच्या चार वर्षांत त्यानं नेमकं काय केलं, त्याचं आयुष्य कसं होतं याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. सर डेविड ब्रुस्टर यांनी १८५५ मधे लिहिलेल्या 'मेम्वॉयर ऑफ सर आयझॅक न्यूटनः द लाईफ, रायटिंग्स अँड डिस्कवरीज' या पुस्तकात सांगितलंय की, कॉलेजमधल्या शिक्षकांना न्यूटनची अफाट बुद्धिमत्ता त्रासदायक ठरू लागली होती. एखादं पुस्तक त्यानं हातात घेतलं की, तो त्यावर संपूर्ण प्रभुत्व मिळवूनच ते सोडत असे. थोडक्यात काय तर या न्यूटननं मास्तरांनाही धडकी भरवली होती.
१६६५ मधे लंडनमधे प्लेगच्या साथीनं थैमान घातलं. सुमारे एक लाख लोकांचा या रोगामुळे मृत्यू झाला होता. सरकारी आकडेवारीनुसार यात ६८ हजार ५९६ लोकांचा जीव गेला. इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा आणि त्याच्या दरबाराला वर्षभर लंडन सोडून बाहेर राहावं लागलं.
याचंवर्षी न्यूटनचं डिग्रीचं शिक्षण पूर्ण झालं. पण क्रेम्ब्रिज युनिवर्सिटी प्लेगमुळे बंद करण्यात आली. मग नाईलाजाने न्यूटनला त्याच्या गावी जावं लागलं. जसं आपल्यापैकीही अनेकांना आता कोरोना वायरसच्या साथीनं असंच गावाकडं जावं लागलं. सुमारे दोन वर्षे तो त्याच्या गावी वुल्झथॉर्प लिंकनशर इथे होता. या काळात टाईमपास करण्याऐवजी न्यूटन आतापर्यंत जे शिकला त्याच्यावर चिंतन करू लागला. नवंनवी प्रमेयं मांडू लागला, त्याला मनात आलं की प्रयोग करू लागला.
हेही वाचाः अरे, या दोघांनी जीव धोक्यात घालून पहिली लस टोचून घेतली ना, टाळ्या तरी वाजवा!
पहिल्यांदा त्यानं कॉलेजच्या शेवटच्या वर्षात हाती घेतलेला गणिताचा रिसर्च पेपर पूर्ण केला. पुढे न्यूटनचा हाच रिसर्च पेपर कॅलक्युलसचा पाया बनला. त्याने प्रिझमसोबतच प्रकाशावर संशोधन सुरू केलं. याच सुरवातीच्या संकल्पनांवरून त्याचा जगप्रसिद्ध ग्रंथ ऑप्टिक्स साकार झाला. पण सर्वात मोठा शोध होता तो गुरुत्वाकर्षणाचा.
न्यूटनच्या बागेत सफरचंदाचीही झाडं होती. एका दिवशी असंच आपल्यासारखं विचार करत बसलेल्या न्यूटनला सफरचंद खाली पडताना दिसला. यावरून त्याच्या डोक्यातल एक विचार आला. एखाद्या अदृश्य शक्तीमुळे सफरचंद जमिनीवर पडत असेल तर, ती शक्ती अतिदूरवरच्या वस्तूंनादेखील प्रभावित करू शकेल.
याचवेळी न्यूटनचं सर्क्यूलर मोशनसंबंधी संशोधनही सुरू होतं. सुर्याभोवती हे सर्व ग्रह का फिरत असतील, त्यांना कोणत्या गणिती नियमात बांधलेलं आहे यावर संशोधनाअंती त्याने इनवर्स स्क्वेयर सूत्र शोधून काढलं. आणि हीच गुरुत्वाकर्षण नियमाच्या शोधमोहिमेची सुरवात होती.
प्लेगची साथ ओसरल्यावर न्यूटन पुन्हा केम्ब्रिजला आला. आणि दोन वर्षांच्या ब्रेकमधे म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं तर वर्कफ्रॉम होमच्या काळात जे काही चिंतन केलं होतं त्यावर न्यूटननं झपाट्यानं काम सुरू केलं. त्याने प्रकाशकीसंबंधीचा ऑप्टिक्स हा ग्रंथ लिहिला. कॅलक्यूलस हे एकदम नव्याप्रकारचं गणित विकसित केलं. जगाचा चेहरामोहरा बदलून टाकणारा प्रिंकिपिया ग्रंथ लिहिला. या ग्रंथातच त्याने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला.
सफरचंद न्यूटनच्या डोक्यावर पडलं की, त्याने ते पडताना पाहिलं याविषयी कोणतीही ठोस माहिती नाही. तज्ञांची याविषयी मतमतांतरं आहेत. पण त्याच्या बागेत सफरचंदाचं झाड होतं हे नक्की.
न्यूटनच्या याच बागेतलं सफरचंदाचं एक झाड पुण्याच्या 'आयुका' संस्थेत लावण्यात आलं होतं. त्यासाठी प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी पुढाकार घेतला होता. १९९७ ते २००७ दरम्यान तीन वेळा हे झाड जगवण्याचा प्रयत्न झाला होता. पण तापमानामुळे हे झाड तग धरू शकलं नाही.
हेही वाचाः १५० वर्षांपूर्वी २०० शोध लावणारे, भारताचे एडिसन शंकर आबाजी भिसे
आता आपण सगळे काही न्यूटन नाही. त्याच्यासारखं जग बदलणारे शोध तर नाही लावू शकत. आणि काय सांगता लावू पण शकतो! तरीदेखील या काळात काही प्रोडक्टिव काम करू शकलो तर बरं होईल. म्हणजे इतके दिवस इंग्रजी सुधारायची होती? ती करू शकतो. गिटार प्रॅक्टिस करायची होती? आता वेळच वेळ आहे.
व्यायाम करायला वेळच मिळत नव्हता? आता तो आहे. महत्त्वाचं म्हणजे लॉकडाऊनच्या काळात घरात बसून आपलं शरीरही लॉक होऊ शकतो.
ज्या गोष्टी करायला वेळच नव्हता अशा सगळ्या गोष्टी करायला सुरवात करा. पण ट्रॅवलिंग नाही. कारण अशी वेळ पुन्हा कधी मिळणार? स्वतःवर काम करण्यासाठीचा हा गोल्डन पिरिअड आहे.
हेही वाचाः
प्लास्टिकमुक्त देशाचं स्वप्न जंतू साकार करणार?
माणसाच्या उत्पत्तीची सोपी गोष्ट सांगणारं ‘ओरिजिन्स’!
विज्ञानदिनी ना सीवी रमण यांचा जन्मदिन, ना स्मृतिदिन
तंत्रज्ञानाच्या युगात अश्मयुगातल्या मानवी मेंदूचं काय होणार?
आपल्या मुलांसाठी डाएट प्लॅन गरजेचा की हेल्दी लाईफ प्लॅन?
स्टीफन हॉकिंगः आयुष्यभर खुर्चीत बसून उलगडलं अवकाशातलं गूढ
सारं काही चांगलं असूनही डिप्रेशन येतंय ना, मग दीपिकाची ही गोष्ट वाचा
(लेखक हे तरुण पत्रकार आहेत.)