आयोडीनयुक्त मीठ खा आणि आजारांपासून दूर राहा, असं सांगणारी जाहिरात आपण वर्षानुवर्ष टीवीवर पाहत आलोय. पेपरांत त्याचे लेख वाचत आलोत. डॉक्टरही आपल्याला त्याचेच सल्ले देत आलेत. आता मात्र हेच आयोडीनवालं मीठ नव्या आजारांना आमंत्रण देत असल्याच संशोधक राजेश चव्हाण यांनी आपल्या अभ्यासातून मांडलंय.
किचनमधे मीठ असावंच लागतं. आपण कोणताही पदार्थ मिठाशिवाय खाऊचं शकत नाही. समाजातल्या कोणत्याही घटकाच्या जेवणातली ही कॉमन गोष्ट.
आपल्या पृथ्वीवर समुद्र आणि खडकांचं अस्तित्त्व आहे तेव्हापासूनच मीठ बनत आलंय. प्राचीन काळापासून आजपर्यंत अनेक गोष्टींत बदल झाला, पूर्वजांच्या अनेक गोष्टी मागे सोडून नव्या स्वीकारल्या मात्र मिठाला कोणताच पर्याय नाही.
मिठाचा शोध उत्तर चीन साधारण इसवी सनाच्या सहा हजार वर्षांपूर्वीच युंचेंग खाडीलगतच्या मिठाच्या भागावर कब्जा करण्यासाठी लढाई झाल्याचे पुरावे चीन संशोधकांनी सादर केलेत. त्यावेळी मिठाला सोन्याएवढं महत्त्व होतं, चीननं मिठावर टॅक्सलावून त्याची निर्यात करण्यात येई. मिठाचं उत्पन्न कसं घ्यावं याचं तंत्रदेखील जगाला चीनकडून समजलं.
हेही वाचाः थायरॉइडविषयी हे समजून घ्यायला हवंच
परंतु मिठाचा सर्वाधिक प्रचार हा इजिप्तनं केला. इजिप्त चीनसोबत व्यापार करत. मग आलेलं साहित्य, सामग्री युरोपला पाठवत. त्यांच्याकडून तंत्र शिकून स्वत: उत्पन्न घेऊ लागले. इजिप्तनं मीठाचे फायदे, वापराचे महत्त्व तसंच संवर्धनाचं तंत्र सांगितलं. अन्न पदार्थांसह शवपेटीचं संवर्धन कसं करू शकतो हेही त्यांनी इजिप्तनं दाखवलं, ही माहिती बियॉंड द शेकर या रिसर्च कंपनीच्या सॉल्ट गाईड या पुस्तिकेत दिलीय.
भारत स्वातंत्र झाल्यानंतर सामाजिक, आर्थिक, राजकीय समस्यांबरोबर आरोग्याच्या समस्या वाढत होत्या. त्यावेळी मुलांमधे लर्निंग डिसॉर्डर, मेंटल रिटायरमेंट, चेहऱ्याला मानेला येऊन थायरॉइड होणं, गळ्यात गाठ तयार होणं आणि हत्तीरोग इत्यादी आजारांनी भारतातील २ कोटी लोकं ग्रासलेली.
यावर उपाय म्हणून १९५० मधे सॉल्ट आयोडायजेशन प्रोग्रॅम राबवण्यास सुरवात झाली. यापूर्वी १९२४ मधे अमेरिकेनं आयोडीनयुक्त मिठाचा वापर सुरू केलेला. पुन्हा १९६२ नंतर मिठाचं रेग्युलेशन युनिसेफ आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्या अंतर्गत बनवण्यात आलं. त्यावेळच्या परिस्थितीनुसार मिठात २० टक्के आयोडीन मिसळण्यात येत होतं. म्हणजेच दर दिशी साधारण १०० मायक्रोग्रॅम खाण्यात येत होतं.
हेही वाचाः बोरिवलीच्या आजीबाईच्या बटव्यात दडलंय काय?
त्यानंतर दक्षिण आफ्रिका, फिलिपिन, रोमानिया, कझाकिस्तान, चीन, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, अर्जेंटिना आणि कॅनडा सारख्या देशांमधे आयोडीनयुक्त मिठाचा वापर सुरु झाला.
आयोडीनयुक्त मिठाचा वापर आयोडीनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजारांवर उपाय म्हणून वापरतो पण हेच आयोडीन मीठ हायपरटेंशन, हायब्लड प्रेशर, हार्ट डिसिजला वाढण्यासाठी पूरक ठरतंय, असं संशोधक राजेश चव्हाण यांच्या ब्रिटिश मेडीकल जर्नलमधल्या संशोधन निबंधात म्हटलं आहे.
भारताच्या दिल्ली, आग्रा, उत्तरप्रदेश, गुजरात या भागामधे अभ्यास करण्यात आला. हा आयोडीनयुक्त पाकिटातलं मीठ आणि जाडं मीठ खाणाऱ्या लोकांचा अभ्यास करण्यात आला. यातून अभ्यासातून असं समोर आलं की, जाडं मीठ किंवा काळ मीठ खाणाऱ्या लोकांच्या तुलनेत ज्या लोकांच्या जेवलणात आयोडीनयुक्त मिठाचं सेवन होत आलंय त्यांना हाय ब्लडप्रेशर, हायपरटेंशन आणि हार्ट डिसीज सारख्या आजारांचा धोका ५० टक्के जास्त असल्याचं दिसतं. जर्मनीच्या लॅप लॅंबर्ट या संशोधन मासिकातही या अभ्यासावर लिहिण्यात आलेलं आहे.
हेही वाचाः दोनवेळा जेवायचं की दोन तासांनी?
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशननं १९९२ ला दर काही वर्षांनी मिठातील आयोडीनचं प्रमाण बदलण्याबाबत सांगितलं होतं. मात्र कोणत्याही प्रकारचा बदल न झाल्यामुळे अशाप्रकारच्या आजारांत वाढ होत असल्याचं संशोधन निबंधात लिहिलं आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्या गाईडलाईन्सनुसार जन्मापासून ते सहा महिन्यांच्या मुलांपर्यंत ११० मायक्रोग्रॅम, सात ते बारा महिन्यांपर्यंत १३० मायक्रोग्रॅम, एक ते आठ वर्षांपर्यंत ९० मायक्रोग्रॅम, नऊ ते तेरा वर्षापर्यंत १२० मायक्रोग्रॅम चौदा ते अठरा वर्षादरम्यान १३० तर अठरा वर्षानंतर १५० मायक्रोग्रॅम आयोडीनेचं सेवन प्रतिदिन केलं जावं. मात्र गरदोर महिलांनी २२० मायक्रोग्रॅम आणि प्रसुतीनंतर २९० मायक्रोग्रॅमचं प्रतिदिन सेवन करावं असं सांगण्यात आलेलं आहे, अशी माहिती आयुर्वेद डॉक्टर सुमती कुलकर्णी यांनी सांगितलं.
१५० ग्रॅम बेरी जातीतल्या फळात ४० मायक्रोग्रॅम, २५० मिलीग्रॅम दुधात ५६ ते ११० मायक्रोग्रॅम, एक वाटी दह्यात ९० मायक्रोग्रॅम, एक क्युब चीजमधून १० ते १५ मायक्रोग्रॅम, एक वाटी कडधान्यांत ६ मायक्रोग्रॅम, प्रत्येक बटाट्याच्या २० टक्के भागात आणि समुद्री भाज्या आणि माशांमधे ३३ टक्के इतकं आयोडीन असतं. त्यामुळे मीठ आणि या पदार्थामुळे गरजेपेक्षा जास्त आयोडीन शरीरात जातंय, असं कुलकर्णी म्हणाल्या.
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत ज्या प्रकारचं जेवण घेतलं जातं आहे त्यात मिठाचं प्रमाण खूप जास्त आहे अशावेळी ते पदार्थ टाळून घरच्या जेवणात जाडं मीठ जे धुवून वापरलं जातं त्याचा वापर करावा याबाबत आम्ही रुग्णांना सल्ला देत असल्याच कुलकर्णी म्हणाल्या.
हेही वाचाः
डिलिवर कुठं व्हायचं हे बाईला ठरवू द्याः डॉ. अभय बंग