परदेशात जायचंय, मग स्वस्तातलं विमान तिकीट बुक कसं करणार?

२४ जुलै २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


एकदातरी विमानानं परदेशात जावं हे अनेकांचं स्वप्न असतं. कामापेक्षा कुटुंबासोबत फिरायला जावं असं वाटतं. पण त्याआधी कोणत्या एअरलाईन्सने जावं, कोणत्या दिवशी जावं आणि कुठले एअररूट्स टाळावेत, कोणत्या वेबसाईटवरुन बुकिंग करावं या सर्व गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. त्यामुळे आपले बरेच पैसे वाचतील.

आपण फायनॅन्शिअल इयर संपलं की ऑफिसमधे सगळ्यात आधी काय बघतो, पुढच्या वर्षाचं प्लॅनिंग. कारण पुढच्या वर्षात किती सुट्ट्या येणार आहेत. त्यानुसार आपलंही वेगळं प्लॅनिंग बनतं. आपल्याला सुट्टी हवी कशाला तर आराम करण्यासाठी, कुटुंबाला वेळ देण्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे फिरायला जाण्यासाठी. फिरायला जायचं असं म्हटलं तरी लहानांपासून मोठ्यांर्यंत सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हसू येतं.

देशात, राज्यात तर सगळे जमेल तसं फिरतातच. पण एकदा तरी परदेशात फिरावं असं आजकाल प्रत्येकाचं स्वप्न असतं. परदेश प्रवास म्हटलं की पहिलं कुठे जायचं? कसं जायचं? असे प्रश्न आपल्याला पडतात. आणि ठिकाण, फिरण्याच्या जागा सगळं ठरलं की पासपोर्ट रिन्युएशन, विसा,फ्लाईट बुकिंग, हॉटेल बुकिंग इत्यादी गोष्टी असतात. आपण हे ट्रॅवल एजन्सीकडून करून घेतो किंवा स्वत:च या सर्व गोष्टी करतो.

सगळ्यात महाग एअरलाईन्स कोणत्या?

आपण स्वत:च बुकिंग करणार असाल किंवा एजन्सीकडूनही करून घेणार असू तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ती अशी की, बऱ्याच एअर एजन्सीजचं तिकीट खूप महाग असतं. पण सतत बातम्या येत असतात की विमानाचं तिकीट स्वस्त झालं. हो विमानाची तिकीटं स्वस्त झालीत. पण ती डोमेस्टिक. म्हणजे भारतातल्या भारतात फिरण्यासाठी. परदेशात जाण्यासाठी नाही.

मग अशा कोणत्या एअरलाईन्स आहेत की ज्यांची तिकीटं जास्त महाग आहेत. सिंगापूर एअरलाईंस, एअर कॅनडा, कतार एअरवेज, कॅथ पॅसिफिक एअरवेज, युनायटेड एअरलाईंस, अमेरिकन एअरलाईंस, एमिरेट्स एअरलाईंस, क्वांट एअरवेज आणि ब्रिटीश एअरवेज या सगळ्यात विमान कंपन्या महाग आहेत. फोर्ब मासिकानेही यासंबंधीची यादी छापलीय.

हेही वाचा: मोदी सरकार प्रोत्साहन देत असलेली इलेक्ट्रिक कार आपणही घेऊ शकतो?

प्लेनच्या तिकिटांच्या किंमती का वाढल्यात?

एअर लाईन्सचे तिकीट दर गेल्या तीन वर्षांमधे मोठ्या प्रमाणात वाढलेत. कारण अनेक एअरलाईन्स कंपन्या बुडाल्या. त्यामुळे इतर कंपन्यांने आपल्या दरामधे प्रचंड वाढ केलीय. आणि ही परिस्थिती फक्त भारतातच नाही तर सर्वच प्रगत देशांमधेसुद्धा आहे.

एअरलाईंस कंपन्यांची स्पर्धा कमी झाली. त्यामुळे ग्राहकांची संख्या वाढली. संख्या वाढली तशी त्यांच्याकडे असलेल्या सोयींचा तुटवडा पडू लागला. अशावेळी विमान कंपन्यांनी आपल्या तिकीट दरांत मोठी वाढ केली.

तसंच सिक्युरीटी फी, पॅसेंजर फॅसिलिटी चार्जेस, डोमेस्टिक सेगमेंट फी, ट्रॅवल फॅसिलिटीज, इमिग्रेशन फी, कस्टमर युजर फी, इंटरनॅशनल ट्रान्सपोर्टेशन फी आणि फॉरेन गवर्मेंट सिक्युरिटि, टुरिझम, एअरपोर्ट फी इत्यादी टॅक्सेमधे २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झालीय. त्यामुळे प्लेनच्या तिकिटांच्या किंमती वाढल्यात.

हेही वाचा: दोस्तांनो, आज सायकल डे, मग पुन्हा एकदा सायकल चालवूया?

एअररूट्ससुद्धा महाग

जशा एअरलाईन्स कंपनीच्या किंमती जास्त आहेत तसंच परदेशातल्या काही शहरांमधला प्रवासही खूप महाग असतो. यासाठी आपल्याला काही लाख किंवा कोटी रुपयेसुद्धा लागू शकतात. मग असे महाग एअररूट्स कोणते आहेत?

न्यूयॉर्क ते सिंगापूर, लॉस एंजलिस ते मेलबर्न, लॉस एंजलिस ते टोकियो, हॉंगकॉंग ते न्यूयॉर्क, न्यूयॉर्क ते बिजिंग, सॅन फ्रॅन्सिस्को ते अबुधाबी, लॉस एंजलिज टू दुबई आणि न्यूयॉर्क ते हॉंगकॉंग हे एअररूट्स महागडे म्हणून ओळखले जातात.

मग आता काय करायचं?

आता हे सगळं महाग आहे. पण आपल्याला परदेश दौरा तर करायचा आहे. मग आपण एक गोष्ट केली पाहिजे. आपण तर भारतीय आहोत. आपल्याला प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन मिळतंच.

पहिलं तर आपण आपल्याला ज्या दिवशी जायचं आहे, त्याच्या तीन महिने आधी बुकिंग करावं. त्यावेळेस त्या प्लेनच्या तिकिटाची किंमत अगदी स्वस्त असते. जसजसे दिवस कमी होतात तसतशी किंमत वाढत जाते.

गुगल फ्लाईट्स, जेट रडार, स्काय स्कॅनर, किवी डॉट कॉम, एअरफेअर वॉचडॉग, एअरवंडर, चिपओयर इत्यादी अॅप्सवरुन स्वस्तातली तिकिटं मिळतात. त्याचबरोबर आपण सोमवार आणि विकेंड वगळता कोणत्याही मधल्या दिवशी टेकऑफ करायचं ठरवलं तरी आपल्या तिकिटाच्या किंमतीत फरक पडतो.

मग आपलाही यंदा परदेशी फिरण्याचा प्लॅन असेल तर या गोष्टींचा विचार केला पाहिजे.

हेही वाचा: 

जेटचं विमान बंद का पडलं आणि ते उडणार की नाही? 

टिळकांच्या हरवलेल्या पुतळ्याचा शोध कुठं घ्यायचा? 

ती १५ मिनिटं ठरवणार आपल्या चांद्रयानाचं भवितव्य

चंद्रावर पहिलं पाऊल कोण ठेवणार यावरुन वाद झाला होता