अमिताभप्रमाणे आपलं सोशल मीडिया अकाऊंट हॅक होऊ नये म्हणून

१७ जून २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाऊंट हॅक झालं. त्यावर पाकिस्तानशी संबंधित संदेश देण्यात आला होता. याला अकाऊंट हायजॅक करणं असं म्हणतात.  पण हे हॅकिंग, हायजॅक नेमकं काय असतं? त्याच्यामुळे काय होतं? अमिताभ बच्चनसारखं आपलं अकाऊंट हॅक झालं तर?

आपण ट्विटरवर बीग बी अमिताभ बच्चनला हमखास फॉलो करतो. पण त्यादिवशी त्यांच्या अकाऊंटवर भारत मुस्लिम विरोधी देश आहे, पाकिस्तानच्या पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो, लव पाकिस्तान, तुर्कीशी संबंधित पोस्ट होत्या. त्यादिवशीही आपण रोजच्याप्रमाणे आज अमिताभ काय सांगतायत हे बघायला गेल्यावर काहितरी भलतच दिसलं.

तुर्कीतल्या फुटबॉलप्रेमी हॅकरनी केलं हायजॅक

काही वेळातच अमिताभ यांचं अकाऊंट हॅक झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. ट्विटरवर बीग बींचे ३.७४ कोटी फॉलोवर्स आहेत. ते सोशल मीडियावर खूपच अॅक्टीव असतात. पण त्यादिवशी ट्विटर हॅक करणाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी यूरो २०२० साठी आईसलँडला क्वॉलिफाईंग मॅच खेळण्यासाठी तुर्कीचा फुटबॉल संघ गेला होता. पण तिथे पोचल्यावर विमानतळावर त्यांची कसून चौकशी करण्यात आली.

या घटनेचा निशेध जगभरात पोचवण्यासाठी अमिताभ यांच्या ट्विटर अकाऊंटची निवड करून त्यांचं अकाऊंट हॅक केलं. आणि त्यावर ‘हा संपूर्ण जगासाठी एक महत्त्वपूर्ण संदेश आहे. आईसलॅण्ड रिपब्लिकने तुर्कीच्या फुटबॉल खेळाडूंना दिलेल्या वागणुकीचा आम्ही निषेध करतो. आम्ही प्रेमाने बोलतो, पण आमच्याकडे मोठी छडीही असते. मोठ्या सायबर हल्ल्याबाबत तुम्हाला सांगत आहोत. अयिल्दिज टीम टर्किश सायबर आर्मी.’ असा संदेश दिला.

हा हल्ला झाल्यावर अकाऊंट रिकवर करण्यात आलं. पण नंतर काही भारतीय हॅकर्सनी काही पाकिस्तानी वेबसाईट हॅक करून त्यावर अमिताभ बच्चन यांच्या तिरंग्यासह फोटो टाकून, हिंदुस्तान की जय असा संदेश लिहिला. पण कोणत्या वेबसाईट होत्या याची माहिती कुठेच आली नाही. मात्र हा आपला बदला होता, आपण केलेलं सर्जिकल स्टाईक होतं असं सोशल मीडिया आणि न्यूजचॅनलनी रंगवलं. हे. हे सगळं बघून हॅकिंग नेमकं काय असतं? याने काय होतं? असे प्रश्न पडतात.

हेही वाचा: तर आपण विचार करणंही डिजिटल यंत्रांकडे सोपवून देऊ

हॅकिंग कसं सुरू झालं?

आता हॅकिंग म्हणजे हल्ला काय करणारे आपल्या कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईलच्या सिस्टीममधली माहिती पाहतात, ती कॉपी करून नंतर त्याचा गैरवापर करतात. आपलं सोशल मीडियाचं अकाऊंट हॅक करून त्यातल्या माहितीत बदल करतात किंवा आपली पर्सनल माहिती घेऊन ब्लॅकमेल करतात. इत्यादी प्रकार आपल्याला माहिती आहेत.

पण नेमक्या शब्दात हॅकिंग म्हणजे काय सांगायचं असेल तर आपल्या हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर सिस्टीममधल्या कमकूवत बाजू शोधणं. पण कम्प्युटर हा एकटा फार  काही कामं करत नाही. पण आपण त्याला नेटवर्क करतो म्हणजे इंटरनेटने इतर कम्प्युटरशी जोडतो तेव्हा आपला कम्प्युटर जे आता करतोय ते सर्वकाही करू लागतो.

जेव्हा कम्प्युटर संवाद साधण्यासाठी, माहितीचं देवाण घेवाण करण्यासाठी जगाशी जोडण्यात आले त्यावेळी हॅकिंगमुळे लक्षात आलं की यात बऱ्याच त्रुटी आहेत. पण काही लोकांनी या चुका दुरुस्त करण्याऐवजी त्याचा फायदा घेत फसवणूक करण्यास सुरवात केली. आता जगभरात सायबर क्राईमद्वारे अब्जावधी रुपये लुबाडले जातायत.

जगातला पहिला हॅकर कोण?

जगातला पहिला कम्प्युटर हॅकर म्हणून प्रसिद्ध असलेल्या केविन मिटनिकला १९९५ ला कॅलिफोर्नियातून अटक करण्यात आली. त्याने १९९३ पासून १०० लोकांना फसवल होतं, सरकारी कागदपत्र चोरली होती, अशी माहिती बँकिंग सॉफ्टवेअर तज्ज्ञ चार्ल ऐन्स्ले यांनी नोंदवून ठेवलीय.

आपण आर्मी, सरकारी सिस्टीम्स किंवा वेबासईट हॅक झाल्याचं खूपदा ऐकलंय. हे सगळे हॅकर्स नक्कीच कम्प्युटरमधले एक्सपर्ट असणार. जे या खूप जास्त सुरक्षा व्यवस्था असलेल्या सिस्टीमच्या आत शिरून त्यातली माहिती घेणं हे सोप्पं काम नाही. पण या हॅकर्सचेसुद्धा प्रकार असतात.

हेही वाचा: येणार तर मोदीच हे कळाल्यावर उंचावलेला सेन्सेक्स खाली का गेला?

हॅकिंग एथिकल असतं

आता हॅकिंग म्हणजे थोडक्यात फसवणंच. मग फसवणूक करणारे हे अगदी पूर्वीपासून आहेत. त्या त्या वेळी उपलब्ध असलेल्या साधनांच्या वापराने ते फसवणूक करतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात आपण हॅकिंग हा शब्द वापरू लागलो. हॅकिंग हे पहिल्यांदा टेलिफोनद्वारे केलं गेलं. यात फसवणुक करणाऱ्याला फ्रिकर म्हणतात.

हे फ्रिकर आता मोबाईल हॅक करणाऱ्यांना म्हणतात. या हॅकरचा हॅट म्हणजे टोपी हा सिम्बॉल किंवा लोगो आहे. मुख्यत: हॅकर्सचे तीन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे व्हाईट हॅक हॅकर म्हणजे एथिकल हॅकर. हे हॅकर एखाद्या सिस्टीममधे प्रवेश करून त्यातल्या त्रुटी शोधून, त्यावर काम करून तो प्रोब्लेम दुरुस्त करतात.

हॅकर्सचे किती प्रकार आहेत?

दुसरा प्रकार म्हणजे ब्लॅक हॅट हॅकर यांना क्रॅकरसुद्धा म्हणतात. यामधे हॅकर अनधिकृतरीत्या आपल्या सिस्टीममधे घुसून त्यातली माहिती उदा नेट बँकिंगचे पासवर्ड, ट्रान्झॅक्श डिटेल्स, कामाचा डेटा, वैयक्तिक डेटा काढतात. आणि मग त्या व्यक्तीला फसवतात.

तिसरा प्रकार म्हणजे ग्रे हॅट हॅकर. यात परवानगीशिवाय हॅकर सिस्टिममधे जातो आणि त्यातल्या त्रुटी शोधून सिस्टीमच्या मालकाला कळवतो. हल्ली तर कम्प्युटर एक्सपर्ट नसलेले लोकही हॅकिंग करतात त्यांना स्क्रिप्ट किडीज म्हणतात. हा हॅकिंगचा पहिला उपप्रकार आहे.

हेही वाचा: एनईएफटी आणि आरटीजीएसवरचे चार्जेस रद्द नाही होणारायत

अमिताभचं अकाऊंट हायजॅक केलं होतं

तर दुसरा उपप्रकार म्हणजे हॅकिविस्ट. यात एखादी वेबसाईट, सोशल मीडिया अकाऊंट हॅक करतात. आणि त्यावरुन आपला संदेश पोचवतात. हा संदेश धार्मिक, राजकीय, सामाजिक स्वरुपाचा असतो. यामुळे लोकांच्या भावनाही दुखावल्या जातात, यावरुन वाद होऊ शकतात. यामुळे असे संदेश पाठवण्याने समाजाचं स्वास्थ्य बिघडतं. याला हायजॅकिंग असंही म्हणतात. हॅकरने हायजॅक केल्यावर तो आपला संदेश आणि कोण आहे ही खूण सोडून जातो.

अमिताभ बच्चन याचं ट्विटर अकाऊंट हॅक झालं म्हणजे हायजॅक झालं ज्याद्वारे हॅकने आपला संदेश पोचवला. आपल्याला माहिती आहे का, हॅकिंगचे सरकारमान्य कोर्सही जगभरात चालतात. पण ते हॅकिंग हे चांगल्या कामासाठी असतं, सुरक्षेसाठी असतं.

डेबिट कार्डने पेमेंट करताय?

शेवटी माणसंच त्यांच्या ज्ञानाचा वापर चांगल्या की वाईट कामासाठी करायचा ते ठरवतात. म्हणून एथिकल हॅकिंग आणि सायबर क्राईम असे दोन भाग आहेत. सायबर क्राईममधे स्पॅम म्हणजे जे आपल्याला जाहिरातींचे स्पॅम मेल येतात. वेगवेगळ्या ठिकाणच्या कम्प्युटरवरुन सर्वरवर हल्ला करणं आणि सर्वरवरुन चालणारी सिस्टीम बंद पाडणं. जसं दोन वर्षांपूर्वी मंत्रालयाच्या वेबसाईटचं झालं होतं.

तसंच काही महिन्यांपूर्वी हॉटेलांमधे एटीएमने म्हणजे डेबिट कार्डने पेमेंट केल्यावर कार्ड काढल्यावरही कनेक्शन कॅन्सल न करता त्यातून आणखी पैसे अंकाऊंटला ट्रान्सफर केले जात होते. हेसुद्धा सायबर क्राईम आहे. याचबरोबर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन, बॅंकिंग पासवर्ड, फोन नंबर इत्यादी माहिती चोरणं आणि आपली ओळख चोरणं म्हणजे एखादी व्यक्ती आपली माहिती घेऊन ऑनलाईन जगात ती व्यक्ती आपल्या ओळखीने वावरते.

आपल्याकडे असलेल्या कॉपी राईटच्या किंवा कामाच्या फाईल चोरून दुसऱ्यांना देणं हा वैयक्तिक फायद्यासाठी केलेला गुन्हा. सध्या असे ८ सायबर क्राईमचे प्रकार आहेत. हॅकिंगमधल्या जर ८ सायबर क्राईमपैकी काही केल्यास इनफॉरमेशन अँड टेक्नॉलॉजी अॅक्टच्याअंतर्गत कारवाई होऊ शकते.

हेही वाचा: बॅननंतरही टिक टॉक वाजतं जोरात

आपणही काळजी घेतली पाहिजे

आपल्या कम्प्युटरमधे वायरस जाऊ नये म्हणून आपण अँटीवायरस टाकतो. पण वायरस हा एक कोड असतो जो आपल्या कमकूवत सिस्टीममुळे किंवा आपल्या चुकीमुळे आत शिरतो. आणि इतर कम्प्युटरच्या प्रोग्रॅम, फाईलशी कनेक्ट होतो. त्यामुळे बऱ्याचदा आपला डेटा गायब होतो, फंक्शन्स नीट चालत नाहीत. काही लोक याचा फायदा घेईन आपली सिस्टीम हॅक करू शकतात.

हॅकिंगपासून बचावण्यासाठी अँटीवायरसप्रमाणे अँटी हॅकिंग सॉफ्टवेअरही इंस्टॉल करता येतं. त्याचबरोबर आपण सिक्युरीटी अपडेट्सही टाकून घेऊ शकतो. जो आपल्या सिस्टीमचाच भाग असतो. हे इंजिनियरकडून करून घेता येईल, असं आयटीतज्ज्ञ स्वरुप दांडेकर यांनी सांगितलं.

कधीही आपल्या सिस्टीमच्या म्हणजे कम्प्युटर, मोबाईल, लॅपटॉप नव्याने सुरु करताना वेरिफेक्शनच्या दोन स्टेप्स ठेवा. आपले सर्व पासवर्ड किमान सहा महिन्यांनी बदला. पासवर्ड म्हणून आपला मोबाईल नंबर, नाव, वाढदिवस इत्यादी ठेवू नका. तसंच आपली पर्सनल माहिती थोडक्यात द्या. वायफाय कनेक्ट करताना प्रायेवट नेटवर्कच निवडा इत्यादी सल्ले दांडेकर यांनी दिले.

हेही वाचा: आयट्यून बंद झालं, आता आपल्याला हे ३ पर्याय मिळणार