आपलं जग डिजिटल झालंय. त्यामुळे आपणही अधिकाधिक डिजिटलाइज होतोय. आता तर आपल्याला आपला फोन, पीसी किंवा लॅपटॉप त्यातले फिचर्स, एप्लिकेशन सवयीचे झालेत. दिवसरात्र उठता, बसता, झोपता सगळीकडे आपण कुठलं ना कुठलं तरी अॅप सतत वापरतो. पण हेच अॅप बंद होतं तेव्हा? कारण आता अॅपलने आयट्यून बंद करण्याचा निर्णय जाहीर केलाय.
आपल्याला गाणी ऐकायला खूप आवडतात. म्युझिकमुळे आपला कंटाळा जातो, ताण कमी होतो. इन शॉर्ट आपण रिफ्रेश होतो. पण हे सगळं एका डिवाईसमुळे खूप सहज सोप्पं झालंय. एप्पलच्या आयट्यूनमुळे आपलं जगणं म्युझिकमय झालंय.
जगभरात वेगवेगळ्या प्रकारचं म्युझिक आहे. आणि गाणी ऐकायला कोणाला आवडत नाही. हीच गोष्ट हेरून अॅपल कंपनीने १८ वर्षांपूर्वी २००१ मधे आयपॉड हे डिजिटल ऑडिओ प्लेअर लाँच केलं. स्टीव जॉब आणि स्टीव वॉझेनिक यांनी उभारलेल्या या कंपनीला आपण जगात डिजिटल क्रांती घडवणारी कंपनी म्हणून ओळखतो.
पुढे आयपॉड लोकप्रिय झाल्यानंतर एपलने सॉफ्टवेअर बेस्ड ऑनलाईन म्युझिक स्टोअर म्हणजेच आपलं आवडतं आयट्युन एप्रिल २००३ मधे लाँच केलं. पहिल्या १६ दिवसांतच २ लाख लोकांनी हे एप डाऊनलोड केलं. याची वाढती लोकप्रियता बघून हे एप विंडोजलाही सपोर्ट करू लागलं. मग त्यांनी यात टीवी शो आणि सिनेमेही दाखवायला सुरवात केली. सध्या आयट्युनच्या युजर्सची संख्या तब्बल १ अब्ज ३० कोटी एवढी आहे.
हेही वाचा: आयपॉड क्रांतीची सतरा वर्षं
एपल डिवाइस वापरणाऱ्यांचं आयट्युन हे फेवरेट एप असणार यात काही शंका नाही. गेल्या १८ वर्षांपासून हे सॉफ्टवेअर बेस्ड ऑनलाईन डिजिटल मीडिया स्टोअर आपल्याला एन्टरटेन करतंय. यातला कंटेट विकत घेता येतो आणि डाऊनलोडही करता येतो. त्यामुळे वेगवेगळे एप न वापरता एकाच एपमधे हे सर्व मिळतं. याची खासियत म्हणजे यावर जाहिराती अजिबात नसतात. मग उगाच का आपलं फेवरेट एप आहे.
आयट्युनमधली गाणी आपोआप आयपॉडमधे सिंक होतात. म्हणजे आपल्याला कसलेच कष्ट पडत नाहीत. पण हेच आपलं लाडकं एप आता फार काळ टिकणार नाहीय. नुकत्याच झालेल्या वर्ल्ड वाईड डेवलपर्स कॉन्फर्नसमधे एपलने आयट्युन बंद करण्याची घोषणा केलीय. याऐवजी तीन नवे एप लाँच केले जाणार आहेत. जे गीत-संगीत, टीवी शो आणि सिनेमांसाठी वाहिलेले असतील.
हेही वाचा: आपण मोबाईल गेमचा वीडियो एअर स्ट्राईकचा म्हणून पाहिला
म्हणजेच गेल्या महिन्याभरापासून आयट्युन बंद होण्याच्या अफवा पसरत नव्हत्या. खरंच काही दिवसांनी आयट्युन आपल्या मोबाईलमधून दिसेनासा होणार आहे. आणि त्याऐवजी एपल स्टोअरमधे या तीन फिचर्ससाठी वेगवेगळे एप दिसतील. ज्याची घोषणा आयफोन करेलच. पण विकत घेतलेलं, डाऊनलोड किंवा कोणत्याही हार्ड डिस्कमधे कॉपी केलेला कंटेट मात्र आपल्याकडेच सुरक्षित राहणार आहे.
मॅक युजर्सनी सॉफ्टवेअर अपडेट केल्यावर आयट्युनचं रुपांतर एपल म्युझिक, टीवी आणि मुवी एपमधे होईल. तसंच आपला कंटेंटही आपोआप ट्रान्सफर होईल. तसंच आयट्युनमधल्या कंटेंटचं बॅकअपसुद्धा या एप्समधे सिंक करता येणार आहे.
हेही वाचा: आयफोनः नव्या जगाचा स्टेट्स सिम्बॉल
खरंतर या क्रांतिकारी कंपनीचा बिझनेस खालावलाय. एपलच्या अहवालानुसार, मार्च २०१९ पर्यंत जगातल्या एकूण विक्रीत १७ टक्क्यांनी घट झालीय. तर भारतात गेल्या दोन वर्षांमधे एपल फोनच्या विक्रीत ३५ टक्क्यांनी घट झालीय. त्यामुळे एपलने आपल्या युजर्सना टिकवण्यासाठी आणि त्यांना काहीतरी नवीन देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
यासाठीच आयट्युन हे एप बंद करून त्याऐवजी ३ वेगळे एप आणणार आहे. याच्या सबस्क्रिप्शनमधून पैसे उभे राहतीलच पण त्याचबरोबर रिलायन्स आणि नेटफ्लिक्स सारख्या कंपन्याही यात गुंतवणूक करणार असल्याचं बिझनेस स्टॅंडर्डने आपल्या एका स्टोरीत म्हटलंय. म्हणजेच एकाच प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना ३ गोष्टींचा आनंद घेता येत होता. पण त्याचा फायदा कंपनीला होत नसल्यामुळे आयट्युन बंद करून नवे ३ एप आणले जाणार आहेत.
हेही वाचा: