अंबाती रायडूने आज क्रिकेटच्या सर्व फॉर्ममधून निवृत्ती घेत असल्याचं घोषणा केली. क्रिकेटप्रेमिंना चटका लावणाऱ्या निवृत्तीवर सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. पण अंबाती रायडूचा बंडखोर स्वभाव माहीत असणाऱ्यांना या निर्णयाचं आश्चर्य वाटत नाही.
तो काळ २००२ ते २००५चा असेल. त्यावेळी भारताच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधे एका नावाची जोरदार चर्चा सुरु असायची. ते नाव होते अंबाती रायुडूचं. ज्या खेळाडूंनी विशीच्या आतील बॅट्समनची फलंदाजी पाहिली होती ते कायम तुझ्या फिअरलेस फलंदाजीबद्दल बोलत होते. त्यावेळी आयपीएल वगैरे काही नसतानाही तुझी माऊथ पब्लिसिटी इतकी होती की जे ज्युनिअर लेवलवर खेळायचे त्यांच्याही कानावर अंबाती रायडुचे नाव पडत होते.
तू हैदराबादच्या मोहम्मद अझरुद्दीन आणि वीवीएस लक्ष्मणचा वारसा खांद्यावर घेवून पुढे निघाला होतास. पण तुझं नाव अचानक गायब झालं. आम्ही लहान असल्याने तुझं काय झालं याची काही कल्पना नव्हती. पण ज्युनिअर लेवलवर खेळणाऱ्या अनेक गोलंदाजांच्या स्टेट लेवलवरच्या ड्रीम विकेट्समधे तुझं नाव हमखास असायचं.
हेही वाचाः पाकसोबत मॅच नको म्हणणारा गौतम गंभीर आता काय म्हणतोय?
जसंजसं आम्ही मोठे होत गेलो तसंतसं तुझ्या बागीपणाची कहाणी आम्हाला समजत गेली. तू उत्तम खेळायचास. तू फार कमी वेळात फार मोठी उंचीही गाठली होतीस. पण त्या काळात भारतीय संघ पॅक होता. तुझ्यासारखे अनेक खोऱ्याने रन्स करणारे खेळाडू टीम इंडियाचं दार उघडावं यासाठी दारावर सतत धडका मारत होते. त्यातले बरेच तुझ्यापेक्षा वयाने सिनिअर होते. त्यातलाच तू एक होतास.
त्यातच तुझं आणि असोसिएशनचं काहीतरी बिनसलं आणि गरम रक्ताचा तू तडक एक वेगळा निर्णय घेतलास. तू त्या काळात भारतीय क्रिकेट वर्तुळात बागी समजल्या जाणाऱ्या कपिल देव यांच्यासारख्या दिग्गजांच्या वळचणीला जावून बसलास. तुझ्यासारख्या अनेक तरूण रक्ताच्या खेळाडूंना एका नामांकित वाहिनीच्या रिबेलियस प्रोग्रॅममधे सहभाग मिळाला. या प्रोग्रॅमचं नाव होतं ‘आयसीएल’ इंडियन क्रिकेट लीग. या प्रोग्रॅममधे सहभागी झाल्यानेच तुझ्या नावाची चर्चा थांबली. किंबहुना नव्या नावाने ही चर्चा झाली. टीम इंडियातला ‘बागी’ खेळाडू.
या आयसीएलच्या मर्यादा आणि उद्देश हळूहळू स्पष्ट झाल्यानंतर कपिल देवसकट तुझ्यासारख्या अनेक खेळाडुंनी आपलं हे बंड थंड केलं. आणि पुन्हा मुख्य प्रवाहात आले. बीसीसीआयने प्रत्येक खेळाडूवर मेहरबानी केली नाही. पण तुझी गुणवत्ता पाहून तुला पुन्हा मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली. त्या संधीचं तू सोनं करुन दाखवलंस.
तू आयपीएल गाजवलीस आणि तुझ्यासाठी टीम इंडियाची दारं २०१२ ला उघडली. पण इथेही तुझा संघर्ष थांबला नाही. तू टीममधे आत बाहेर करत राहिलास. पण तू लढणं सोडलं नाहीस ना तुझं बागीपण सोडलं नाहीस. तुझ्यात बागीपण जिवंत असल्याचं लक्षण सांगणारा एक किस्सा आजही आठवतो.
हेही वाचाः क्रिकेट म्हणजे पुरुषांचा खेळ, हा समज खोटं ठरवणाऱ्या बायका
तू मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळत होतास. त्यावेळी हरभजन तुझ्यावर एक चौकार अडवण्यावरुन जाम भडकला होता. पण तू एक सिनिअर खेळाडू आहे. भडकला तर भडकला. आपण नमते घेवू असं केला नाहीस. तू त्याला त्याच्याच तोऱ्यात त्याला हा चौकार अडवणं अवघड होतं हे ठासून अंगावर जावून सांगितलंस. त्याचवेळी तू तुझ्यातला बागीपणा अजून जिवंत असल्याचं दाखवून दिलंस.
त्यानंतर तुला पुन्हा टीम इंडियात एंट्री मिळाली. तू आपल्या कामगिरीने कॅप्टन विराट कोहलीचं मन जिंकलंस. त्याने वर्ल्डकपला अजून वर्षभर अवधी असतानाच चौथ्या क्रमांकाचा आमचा शोध संपल्याचं जाहीर केलं. पण काही सिरिजमधे तुझी कामगिरी खालावली आणि निवड समितीने ३३व्या वर्षी का होईना तुझ्या पहिला वर्ल्डकप खेळण्यावर सपशेल फुली मारली.
निवड समितीने तुझ्या ५५ वनडेमधे ४७.०६ च्या सरासरीने १ हजार ६९४. त्यात ३ शंभर १० पन्नास या सर्वांकडे कानडोळा करण्यात केला. विजय शंकर नामक थ्रीडी खेळाडू ज्याला १० वनडे खेळाण्याचाही अनुभव नाही त्याला वर्ल्डकपची लॉटरी लागली. यामुळे पुन्हा तुझ्यातला बागी रायुडू जागा झाला. तू निवड समितीच्या थ्रीडी थेअरीवर निशाणा साधला.
रायुडूने असं बोलणं योग्य की अयोग्य अशी चर्चा झाली. पण हे एका सतत विनाकारण डावलल्या जाणाऱ्या झुंजार खेळाडूची प्रतिक्रिया होती. ज्याची संघात वशिल्यावर कधी वर्णी लागल्याचं ऐकिवात नव्हते. त्या खेळाडूची प्रतिक्रिया ही अशीच असते.
बरं झाली चूक निवड समितीची. पण ती चूक सुधारण्याची निवड समितीला दोनवेळा संधी चालून आली होती. पहिल्यांदा शिखर धवन जायबंदी होवून वर्ल्डकपला मुकला. त्यावेळी आणि दुसऱ्यांदा थ्रीडी प्लेअर विजय शंकर जायबंदी झाला आणि त्याने वर्ल्डकप सोडला त्यावेळी. पण पहिल्यांदा मीडियाचा लाडका डॅशिंग ऋषभ पंत इंग्लंडच्या विमानात बसला आणि दुसरा आश्चर्याचा धक्का म्हणजे चौथ्या क्रमांकाच्या जायबंदी खेळाडूसाठी एक सलामीवीर बदली खेळाडू म्हणून पाठवला गेला.
या सर्व घटना तुझ्या स्वाभिमानाला ठेच पोचवणाऱ्या होत्या. त्यामुळे तू लगेचच त्याच्यावर आपली प्रतिक्रिया दिलीस. आता तुला आईसलँड क्रिकेटने त्यांच्या टीमसाठी खेळण्याची ऑफर दिलीय. पण तू निवृत्ती घेतलीस. अखेर टीम इंडियाल्या इतिहासातल्या एक बागी खेळाडूची बॅट शांत झाली.
हेही वाचाः
आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा
वडिलांमुळे युवीला स्केटींगऐवजी क्रिकेटमधे यावं लागलं