चला टीडीएस वाचवण्याचे चांगले पर्याय शोधण्याची वेळ आली!

२४ फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


चालू आर्थिक वर्ष आता संपत आलंय. आर्थिक वर्ष संपायला येत असतानाच नोकरदार वर्गाला वेध लागतात ते इन्कम टॅक्स रिटर्नचे. आपल्या इन्कमवर कशी कर सवलत मिळवू शकतो, यासाठी लगबग सुरू होते. आता आपण करसवलतीचे ११ पर्याय बघणार आहोत.

२०१९-२० आर्थिक वर्ष संपत आलंय. त्याचबरोबर संपूर्ण वर्षभराच्या गुंतवणुकीचं विवरण देण्याचीही वेळ आलीय. आतापर्यंत आपण करसवलत देणार्‍या योजनेत गुंतवणूक केली नसेल, तर अजूनही वेळ गेलेली नाही. या आधारावर आपला टीडीएस वाचेल. करसवलतीचा लाभ मिळवण्यासाठी आणि टीडीएस वाचवण्यासाठी पुढील दहा पर्यायांचा अवलंब करणं हिताचं ठरू शकतं.

हेही वाचाः ट्रम्प यांच्या बायकोला का बघायचाय केजरीवालांच्या शाळेचा हॅपीनेस क्लास?

१) बचत खात्याचे व्याज:

सेक्शन ८० टीटीएनुसार करसवलत मिळते. बचत खात्यावर दहा हजारापर्यंतचं व्याज करमुक्‍त आहे. बँक, पोस्ट ऑफिस, सहकारी बँकांमधील बचत खात्यावरील लाभ, मुदत ठेवी, रिकरिंग खाते, कॉर्पोरेट बाँड यापासून मिळणारं व्याज हे करमुक्‍त नाही. दहा हजारापर्यंतच्या व्याजमुक्‍तीचा लाभ व्यक्‍ती किंवा हिंदू युनिफाइड फॅमिली अर्थात एचयूएफ घेऊ शकते.

२) वैद्यकीय विमा:

सेक्शन ८० डी नुसार करसवलत मिळते. वैयक्‍तिक, कुटुंबासाठी वैद्यकीय विम्याच्या हप्त्यावर २५ हजारांपर्यंत करसवलत मिळते. पालकांसाठी उतरवलेल्या वैद्यकीय विम्याच्या हप्त्यापोटी २५ हजारांची अतिरिक्‍त सवलतही मिळते. एवढेच नाही तर सीनिअर सिटिझन पालकांचा हप्ता भरल्यास ५० हजारांपर्यंतची सवलत मिळते. आगावू आरोग्य तपासणीवर झालेल्या खर्चावर पाच हजारांपर्यंतचा दावा करता येतो.

३) शैक्षणिक कर्ज:

कलम ८० इ नुसार सवलत मिळते. उच्च शिक्षणसाठी कर्जावर करसवलत मिळते. स्वत:, पत्नी, मुले यासाठी शैक्षणिक कर्ज घेतल्यास करात सवलत दिली जाते. ही सवलत आठ आर्थिक वर्षापर्यंत मिळू शकते. 

हेही वाचाः बोडो शांतता कराराने आता तरी आसाम शांत होणार का?

४) एचआरएशिवाय घरभाडे:

कलम ८० जीजीनुसार करात सवलत मिळते. ज्यांना वेतनात एचआरए मिळत नाही, त्यांना भाड्यापोटी करसवलत मिळते. करदाता, त्याची पत्नी, अल्पवयीन मुलांकडे कोणतीही निवासी मालमत्ता नसल्यास या कायद्याचा लाभ घेता येतो. दरमहा पाच हजारापर्यंतचा दावा करू शकतो. 

५) देणगी:

कलम ८० जीनुसार करात सवलत मिळते. मान्यताप्राप्त संस्थांना दिलेल्या देणगीवर करसवलत मिळते. दोन हजारांपेक्षा अधिक देणगी रोकड स्वरूपात देता येत नाही. काही वेळा शंभर टक्के, तर काही प्रकरणात ५० टक्क्यांपर्यंत कपाताची दावा मंजूर होतो. 

६) इलेक्ट्रिक मोटार खरेदी:

कलम ८० इइबीनुसार करात सवलत मिळते. इलेक्ट्रिक वाहनाच्या खरेदीसाठी घेतलेल्या कर्जावर करसवलत मिळते. या आधारावर दीड लाखांपर्यंतचे व्याज करमुक्‍त आहे. हा दावा एक एप्रिल २०२० पासून कलम ८० इइबीनुसार केला जाऊ शकतो. कर्ज १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२३ या काळात घेतलेलं असावं.

हेही वाचाः आर्थिक मंदी हटेना, मग ५ ट्रिलियन इकॉनॉमीच्या स्वप्नाचं काय होणार?

७) दिव्यांग:

कलम ८० डीडी आणि ८० यू नुसार करसवलत मिळते. जर करदाता दिव्यांग असेल तर ७५ हजार ते १.२५ लाखपर्यंत करसवलत मिळू शकते. ७५ हजारापर्यंतचे टॅक्स डिडक्शन हे शारीरिक, मानसिक आधारावर दिव्यांग व्यक्‍तीसाठी तर गंभीररीत्या शारीरिक व्यंग असणार्‍या प्रकरणात कर कपात १.२५ लाखांपर्यंत मिळते. 

८) वैद्यकीय उपचार:

कलम ८० डीडीबीनुसार करसवलत मिळते. करदात्यावर अवलंबून असलेल्या व्यक्‍तीच्या वैद्यकीय उपचारावर करसवलतीचा लाभ घेऊ शकतो. विशेष आजार असेल तर ४० हजारांपर्यंत डिडक्शनचा दावा करू शकतो. सीनिअर सिटिझनच्या उपचारासाठी एक लाखांपर्यंतची सवलत मिळते. यासाठी वैद्यकीय उपचाराचं बिल दाखवणं गरजेचं आहे. 

९) कलम २४ नुसार करसवलत:

गृहकर्जाच्या व्याजावर करसवलतीचा लाभ मिळते. हा लाभ दोन लाखांपर्यंत घेता येतो. तसेच गृहकर्जाच्या मूळ रकमेवरही कलम ८० सी नुसार करसवलत घेता येते.

हेही वाचाः भारताच्या जावयाकडे थेट इंग्लंडच्या तिजोरीची चावी

१०)  कलम ८० सी:

कलम ८० सी नुसार दीड लाखांपर्यंतची सवलत मिळते. ८० सी अंतर्गत गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यानुसार पीपीएफ, इपीएफ, व्हीपीएफ, एनपीएस, एनएसई, इएलएसएस, एसएसवाय, एससीएसएस.

११) जीवन विमा:

एका पॉलिसीत सर्व कुटुंबाला बसवणे कठीण आहे. त्यामुळे विमा नियामक संस्था ‘इर्डा’ यांनी कालसुसंगत विमा योजना आणण्याचं आवाहन केलंय.

हेही वाचाः 

ट्रम्प यांचं एअर फोर्स वन विमान म्हणजे उडतं व्हाईट हाऊसच!

बजेट २०२०: मोदी सरकार असा विकणार एलआयसीमधला आपला वाटा

नमस्ते ट्रम्पसाठी सजलेलं मोटेरा क्रिकेट स्टेडिअम आतून दिसतं तरी कसं?

भारतामुळेच जगात मंदी, असं आयएमएफच्या गीता गोपीनाथ का म्हणाल्या?

(साभार दैनिक पुढारी.)