घाशीराम कोतवाल हे मराठीच नाही तर भारतीय रंगभूमीवरचं महत्वाचं नाटक मानलं जातं. १६ डिसेंबर १९७२ या दिवशी पीडीए या नाट्यसंस्थेनं पुण्यात ‘घाशीराम कोतवाल’चा पहिला प्रयोग सादर केला. त्याला आता पन्नास वर्ष झाली. संहिता आणि प्रयोगमूल्य या दोन्ही अर्थानी हे नाटक वेगळं ठरतं. अर्धशतकानंतरही ते कालबाह्य ठरलेलं नाही.
आज मुंबईतल्या इमारती आकाशाला भिडल्या असल्या तरी ही मुंबई घडली ती चाळीतल्या माणसांच्या घामावरच. गिरगावामधल्या फणसवाडीच्या चाळीत राहणारी बबन अशीच गणपतीच्या कार्यक्रमात, त्यावेळी होणाऱ्या मेळ्यामधे गाणं म्हणायची. जेमतेम चौथीपर्यंत शिकलेल्या तिनं पोटासाठी गाणं म्हणायला सुरवात केली आणि ती पुढे प्रसिद्ध लावणीगायिका पद्मश्री सुलोचना चव्हाण बनली.
आज कार्तिक वद्य कालाष्टमी. हा दिवस भारतभर काळभैरव जयंती म्हणून साजरा केला जातो. काळभैरवाच्या प्रमुख स्थानांपैकी एक असलेल्या उज्जैनमधे त्याला ‘बेवडा भैरव’ म्हणतात. इंटरनेटवरही त्याचं हेच रूप प्रसिद्ध आहे. पण महाराष्ट्रात त्याचं माणूसपण साजरं केलं जातं. तो इथं क्षेत्रपाल म्हणून पूजला जातो. आज त्याचं हे वेगळं स्वरूप समजून घ्यायलाच हवं.
‘कांतारा’ या सिनेमानं भूत कोला, यक्षगान या लोककलांमधल्या नृत्यप्रकारांना लोकांपुढे आणलंय. आज कर्नाटक सरकारनं या लोककलावंतांसाठी पेन्शन योजनाही जाहीर केलीय. पण या ‘कांतारा’एवढ्याच पारंपरिक आणि लोकप्रिय असलेल्या दशावताराला आज राजाश्रयाची गरज आहे. त्याबद्दल दशावतारी रंगभूमीवरचे लोकप्रिय कलावंत आबा कलिंगण यांच्याशी साधलेला संवाद.
रावण हा द्राविडी संस्कृतीचं प्रतीक समजलं जातं. आपल्याकडे कालौघात पुरातन साहित्यात या ना त्या कारणाने घालघुसड करण्याची प्रवृत्ती असल्यामुळे रामायणाची मूळ कथा नेमकी काय असावी याचा केवळ तर्क करावा लागतो. त्यामुळेच रावणाचं मूळ चारित्र्य आणि त्याच्या जन्माचा इतिहासही काय होता हे सुद्धा आपल्याला माहित नाही.
गणपतीपाठोपाठ गौराई येते. गौराईची प्रथा महाराष्ट्रात आहे, तेवढी इतर प्रांतांमधे नाही. गौरी ही यक्षकुळातली आहे. ती कुबेर कुळातली आहे. ‘धनदा’ म्हणूनही तिची उपासना केली जाते. गौराईच्या रूपानं ‘सर्जक-पोषक-रक्षक’ अशी तिन्ही रूपं आपण ‘स्त्री’देवतेमधे पाहतो.
महाजन पब्लिशिंग हाऊस, पुणे यांनी प्रकाशित केलेला ‘एक कैफियत’ हा बाळासाहेब लबडे यांचा गझलसंग्रह आहे. हा गझलसंग्रह समकालीन प्रश्नांनी उकल करणारा आणि शाश्वत मानवी जीवनाविषयी मंथन करणारा, अंतर्मुख करणारा, संस्कृतीला गदागदा हलवणारा आहे. त्याने मराठी गझलेच्या समृद्धतेत भर टाकलीय. तुमच्या आणि आमच्या मनाचा ठाव घेणारी ही गझल आहे.
सारनाथ इथल्या सिंहमुद्रेचं बदललेलं स्वरुप नव्याने उभारलेल्या संसद भवनाच्या आवारात उभारलं गेलंय. त्यावरून वाद निर्माण झालाय. ही सिंहमुद्रा वर वर सारनाथच्या मूळ सिंहमुद्रेसारखी दिसत असली तरी त्यात असलेले सिंह निरंकुश सत्तेची लालसा, त्यासाठीचा आक्रमपणा, होणारी हिंसेची जरब दाखवून, माणसांमधे भीती अविश्वास पेरणारे असल्याचं मतं संजय सोनवणे व्यक्त करतात. त्यांची ही फेसबुक पोस्ट.
आज आषाढी एकादशी. सगळ्या संतांचं दैवत असणारा ‘पंढरीनाथ’ हा वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत मानला जातो. वारकरी संप्रदायाची बांधणी करणारी, पांडुरंगाला भजणारी बहुतेक संतमंडळी तरुण होती. त्यांनी त्यांच्या उमेदीच्या काळातच अध्यात्म-परमार्थ आणि स्वार्थ-प्रपंच यांची सांगड घातलेली दिसते. गेल्या सातशे-साडेसातशे वर्षांत या चळवळीनं प्रचंड रूप धारण केलेलं पाहायला मिळतं.
ज्ञानव्यापी मशिदीवरून सध्या वादळ उठलंय. या मशिदीत शिवलिंग आढळल्याचा दावा हिंदू पक्षकारांनी केल्यामुळे मुस्लिम पक्षकारांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली. हे प्रकरण वाराणसीच्या दिवाणी कोर्टात चालवायचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलाय. या प्रकरणातल्या वेगवेगळ्या बाजू आणि यात केंद्रस्थानी असलेल्या प्रार्थनास्थळांसंबंधीच्या कायद्याचं ज्येष्ठ कायदेतज्ञ फैजान मुस्तफा यांनी त्यांच्या युट्युब चॅनेलवर केलेलं हे विश्लेषण.