महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अभूतपूर्व राजकीय नाट्य पहायला मिळतंय. शिवसेना नेते एकनाथ शिंदेच्या बंडामुळे सरकारसमोर पेच निर्माण झालाय. भाजपच्या या 'ऑपरेशन लोटस'ची तयारी मागच्या अनेक वर्षापासूनची आहे. त्यात त्यांना यश आलंय. दुसरीकडे बाळासाहेबांच्या पुण्याईमुळे बंड होणार नाही हे उद्धव ठाकरेंनी गृहित धरल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आलीय.
0
रडार यंत्रणा, लेझर सेन्सर, आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी म्हणून नाटोनं एक नवं तंत्रज्ञान आणलंय. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हे तंत्रज्ञान ९९ टक्के काम करेल असं म्हटलं जातंय. असं झालं तर हल्ले होण्याआधीच सर्वसामान्यांची सुरक्षा करणं, खबरदारी घेणं सोपं जाईल.
0
डॉक्युमेंटरी, शॉर्टफिल्म आणि अॅनिमेशनपट यांच्यासाठी हक्काचं विचारपीठ समजला जाणारा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच मिफ नुकताच पार पडला. त्यातून काही लक्षणीय कलाकृती पाहण्यात आल्या. आशय आणि तांत्रिकदृष्ट्या सरस ठरलेल्या या कलाकृतींचा आढावा घेणारा हा लेख.
0
कोरोनामुळे गेली दोन वर्ष सैन्य दलातली भरती प्रक्रिया लांबणीवर पडत चाललीय. अशातच सरकारने कंत्राटी पद्धतीने सैनिकभरती व्हावी, यासाठी ‘अग्निपथ’ नावाच्या नव्या योजनेची घोषणा केली. संरक्षण दलावर होणारा खर्च कमी व्हावा, हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट असलं तरी सरकारच्या या निर्णयाला देशभरातून विरोध होताना दिसतोय.
0
साधारण पन्नास वर्षांपूर्वी सात जूनला पाऊस येणार, असं ठरलेलं असायचं. आज पाऊस पडतो. पूर्वीइतकाच पडतो. पण तो कुठं, किती आणि केव्हा पडणार, हे नेमकं सांगता येणं कठीण झालंय. माणसाचं निसर्गाशी असलेलं नातं दुरावलेलं आहे. झाडं, पशू, पक्षी यांनी ते आजही घट्ट जपलंय. त्यामुळे निसर्गातल्या बदलांबद्दल हे घटक माणसापेक्षा जास्त संवेदनशील असतात. त्याप्रमाणे ते व्यक्त होतात. माणसाला ते समजून येत नाही.
0
भारतात राष्ट्रपती निवडणूक नेहमीच चित्तवेधक ठरलेली आहे. देशाच्या राजकारणात राष्ट्रपती निवडणूक दोन वेळा प्रचंड वेगळी ठरली. १९६९ आणि १९७७ या दोन निवडणुका पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने झाल्या होत्या. त्याचप्रमाणे २०२२ मधल्या निवडणुकीलाही वेगळा कंगोरा आहे.
0
जीवनावश्यक वस्तूंमधल्या भाववाढीचे मे महिन्यातले आकडे आजपर्यंतचे महागाईचे सगळेच रेकॉर्ड ब्रेक करणारे ठरलेत. दुसरीकडे रिझर्व बँकेनं रेपो दरात वाढ केल्यामुळे बँकांनी व्याजदर वाढवलेत. त्यामुळे लोन घेणाऱ्या सर्वसामान्यांचं टेंशन वाढणार आहे. तर इंधनांमधली भाववाढ सर्वसामान्यांचं कंबरडं मोडत असताना जीडीपीच्या फुगीर आकड्यांवर अर्थतज्ञ प्रश्नचिन्ह निर्माण करतायत.
राजमाता जिजाऊ यांचा आज स्मृतिदिन. त्या कणखर, निर्भीड, हिंमतवान होत्या. परकीयांची चाकरी करण्यापेक्षा भूमिपुत्रांच्या स्वराज्याची त्यांना ओढ होती. शहाजीराजे, शिवाजीराजे आणि संभाजीराजे या तीन पिढ्यांमधे त्यांनी स्वराज्याची ज्योत पेटवली. त्या स्वराज्याचे प्रेरणापीठ, ज्ञानपीठ, विद्यापीठ आणि संस्कारपीठ होत्या.
दोन वर्षांपूर्वी कोरोना विषाणूचा संसर्ग जगभरात झपाट्यानं होऊ लागला तेव्हाच आगामी काही वर्षं कोरोनासोबत जगावं लागणार, असं विषाणूतज्ज्ञांकडून सांगितलं जात होतं. प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे आणि एका मर्यादेपलीकडे अथक प्रवास केल्यामुळे या विषाणूंची क्षमता कमी होत जाते. पण त्यांच्यातलं म्युटेशन सुरुच असतं. त्यातून नवे वेरियंट जन्माला येतात. सध्या अशाच दोन वेरियंटमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय.
काश्मीरमधे काश्मिरी ब्राह्मण आणि लढवय्या रजपूत समाज असलेल्या डोगरांनाही हुडकून-वेचून ठार मारण्यात आलं, ती काश्मीर फाइल्स या सिनेमाच्या परिणामांची लक्षणं आहेत. ही लक्षणं जर इतकी क्रूर, भीषण असतील तर त्याचं टोक कसं असेल? काश्मीरचं वेगळेपण राखणारं कलम ३७० हटवल्यानंतर दोन वर्षं शांत बसलेला दहशतवाद काश्मीर फाइल्सनंतर उसळून उठतो; याला अपेक्षित योजकता का म्हणायचं नाही?
इतिहासातल्या अतिशयोक्त वर्णनांच्या किंवा सांगोवांगीच्या गोष्टींच्या आधारे एका संपूर्ण समाजाबद्दल मनात द्वेष भिनवून घेण्याची मानसिकता कुठून येते? संघर्षाच्या आकर्षणातून? मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय समाजाचा जगण्यातला मूलभूत संघर्ष किमान पातळीवर गेल्यामुळे हे असे काल्पनिक संघर्ष लोकांना हवेसे वाटतायत की काय अशी शंका येते.
भारतीय महिला क्रिकेट खेळाडू मिताली राजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. तिच्या वाट्याला कौतूक आलं, तसंच टीकाही आली. अर्थात कुठलाही खेळाडू आपल्या खेळातूनच टीकेला उत्तर देतो तसंच तिनेही केलं. आज भारतीय महिला क्रिकेटला चांगले दिवस आले आहेत. महिला क्रिकेट टीम संक्रमणातून जातेय. या परिस्थितीत महिला क्रिकेटला मिताली सारख्या खेळाडूंच्या अनुभवाची गरज आहे.
कमल हासन अभिनित आणि लोकेश कनकराज दिग्दर्शित ‘विक्रम’ हा तमिळ सिनेमा देशभरातल्या थियेटरमधे जोमाने गर्दी खेचून आणतोय. दिग्दर्शक लोकेश हा खरं तर कमल हासनचा डाय-हार्ड फॅन! आपला आदर्श असलेल्या सिनेनायकाला किंवा नायिकेला घेऊन सिनेमा बनवणारे दिग्दर्शक सिनेजगताला काही नवीन नाहीत. अशाच काही फॅनबॉय दिग्दर्शकांनी गेल्या काही वर्षात तमिळ सिनेमाला वेगळीच दिशा मिळवून दिलीय.
मराठी पाट्यांचा मुद्दा हे राजकीय धरसोडवृत्तीचंच उदाहरण आहे. इतक्या वर्षांचा हा प्रश्न आता अगदी चुटकीत सुटलाय. याचा अर्थ, हा विषय अत्यंत साधा आणि कायद्याच्या चौकटीतला होता. पण त्याचं राजकारण केलं गेलं आणि मराठीला विरोध करणार्यांच्या ते पथ्यावर पडलं.
रॉबर्ट झेमेकिस दिग्दर्शित ‘फॉरेस्ट गम्प’ हा सिनेमा वेगवेगळ्या कारणांनी गाजला. आता अठ्ठावीस वर्षांनी तो हिंदीत ‘लाल सिंग चढ्ढा’ या नावाने परत येतोय. अमेरिकेतल्या साठ-सत्तरच्या दशकातल्या अतिशय महत्त्वाच्या ऐतिहासिक घडामोडींना वेगळ्या पद्धतीने पडद्यावर आणणाऱ्या या सिनेमाचं ‘भारतीयीकरण’ हा चर्चेचा नवा विषय ठरू शकतो.
प्रतिष्ठेचं ‘बुकर पारितोषिक’ मिळवणार्या गीतांजली श्री या पहिल्या हिंदी भाषिक लेखिका आहेत. त्यांची ‘रेत समाधी’ ही कादंबरी देशातल्या आणि जगातल्या हिंदी वाचकांच्या आत्म्याशी जोडलेली आहे. या कादंबरीत स्त्रीच्या मनाची अवस्था अतिशय हृदयस्पर्शी आणि संवेदनशील भाषेत साकारली आहे. हिंदीला जागतिक स्तरावर नवं स्थान मिळवून देण्यात गीतांजली श्री यांचं यश महत्त्वाची भूमिका बजावेल.
आशिया आणि युरोपच्या सीमेवर असलेलं तुर्कस्थान पर्यटकांचं आकर्षण ठरतंय. एरवी मालदीवला जाणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींची पावलंही यावेळी तुर्कस्थानकडे वळलीत. सारा अली खानपासून मलायका अरोरापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियातून शेअर केलेले फोटो चांगलेच वायरल झालेत. तुर्कस्थानमधली प्राचीन ऐतिहासिक स्थळं, गजबजलेल्या बाजारपेठा, निसर्गातलं वैविध्य मोहात पाडणारं आहे. तेच वैविध्य बॉलिवूडलाही खुणावतंय.
भारताच्या कर्णधारपदासाठी असलेल्या संभाव्य शिलेदारांपैकी हार्दिक पंड्या याने सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी कामगिरी केली आहे. आपल्या कुशल नेतृत्वाच्या जोरावर त्याने आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या गुजरात टायटन टीमला सनसनाटी विजेतेपद मिळवून दिलं. हार्दिकने बॅटिंग, बॉलिंग, क्षेत्ररक्षण आणि नेतृत्व या सर्वच आघाड्यांवर सर्वोत्तम कामगिरी करत आपलं अष्टपैलूत्व सिद्ध केलंय.
लोकांना आवडतात म्हणून कुठलेही गाणं गाणार्या गायकांपैकी ‘केके’ नव्हता. त्याच्या प्रत्येक नव्या गाण्याची वाट पाहिली जायची आणि त्याबद्दल उत्सुकताही असायची. आता त्याचं नवं गाणं येणार नाही, ही हुरहुर त्याच्या प्रत्येक चाहत्याला लागून राहील. ‘केके’च्या मृत्यूने आता किमान कलाकारांना जीव असतो. ही माणसंच आहेत, यंत्रमानव किंवा आधुनिक यंत्रं नाहीत, याचं भान येणं महत्त्वाचं आहे.
आंध्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या झरीजामणी या आदिवासीबहुल तालुक्यात कोलाम ही आदिम जमात मोठ्या प्रमाणावर आहे. इथंच शिराटोकी नावाचं एक गाव आहे. निसर्गाच्या जवळ नेणारी नैसर्गिक शेती करायची असं इथल्या गावकऱ्यांनी ठरवलं. त्यातून अशिक्षित, अज्ञानी वाटणाऱ्या या लोकांनी एकत्र येऊन सामुदायिक शेती करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय.
अमेरिकेतल्या श्वेतवर्णीयांच्या वर्चस्ववादी विचारधारेत ‘ग्रेट रिप्लेसमेंट थिएरी’ म्हणजे महान बदल ही संकल्पना मोठ्याप्रमाणात रुजू होताना दिसतेय. श्वेतवर्णीय समुदायाची जागा, त्यांचे हक्क, महत्व, संधी हे स्थलांतरित लोक बळकावत आहेत अशा निराधार तत्त्वावर ही संकल्पना आधारलेली आहे. त्यातूनच इतर वंश, वर्णाच्या लोकांच्याप्रती द्वेष मनात धरून हल्ले करण्याचं प्रमाण वाढलंय.
महाराष्ट्र फाऊंडेशन देत असलेल्या साहित्य आणि समाजकार्य क्षेत्राशी संबंधित पुरस्कारांमागची भूमिका, विजेत्या व्यक्तींवर लिहलेले आटोपशीर लेख, त्यांचं मनोगत, फोटो आणि इतर कामं, यापूर्वीच्या पुरस्कारप्राप्त मान्यवरांची यादी असं सगळं सामावलेली ‘स्मरणिका २०२२-महाराष्ट्र फाउंडेशन’ नुकतीच प्रसिद्ध झाली. यातला पत्रकार, लेखक, संपादक राम जगताप यांच्यावर लिहलेला हा लेख.
'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या नुकत्याच झालेल्या वार्षिक बैठकीत ऑक्सफॅमचा एक अहवाल प्रकाशित करण्यात आलाय. 'प्रॉफिटिंग फ्रॉम पेन' नावाच्या या अहवालात कोरोना काळात लोक भूक, गरिबीमुळे आक्रोश करत असताना औषध, तेल, तंत्रज्ञान क्षेत्रातल्या ठराविक कंपन्यांनी भरमसाठ कमाई केलीय. त्यातून कोरोना काळात प्रत्येक ३० व्या मिनिटाला एका अब्जाधीशाचा जन्म झाला. या काळातली सरकारची धोरणं त्यांच्या फायद्याची ठरलीत.
आर. माधवन म्हणजेच मॅडी हा पहिलाच असा अभिनेता होता ज्याला पदार्पणातच प्रख्यात सिनेदिग्दर्शक मणी रत्नमच्या सिनेमात प्रमुख भूमिका मिळाली आणि त्याने हे अग्निदिव्य यशस्वीपणे पारही पाडलं होतं. मणी रत्नमने या रत्नाची पारख एकदम अचूक केलीय हेच मॅडी वर्षानुवर्षे त्याच्या अभिनयातून दाखवत राहतो.
निखत झरीन ही भारतीय बॉक्सर आता नवी विश्वविजेती ठरलीय. ‘निखत’ हा एक सुफी शब्द असून, त्याचा अर्थ सुगंध असा आहे; तर झरीनचा अर्थ आहे सोनं! नावाप्रमाणेच निखतनं आपल्या ऐतिहासिक कामगिरीचा सोनेरी सुगंध सर्वत्र पोचवला असून, त्याचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान आहे.
सध्या जगातल्या काही देशांत ‘मंकीपॉक्स’ या वायरसचा संसर्ग झालेले पेशंट सापडत आहेत. हा वायरस प्रामुख्याने मध्य आफ्रिका आणि पश्चिम आफ्रिकेच्या उष्णकटिबंधीय जंगलांमधे आढळतो. पण, आता सापडलेल्या पेशंटनी कोणत्याही कारणाने आफ्रिकन देशांमधे प्रवास केला नव्हता. याचाच अर्थ, काही ठिकाणी याचा सामूहिक संसर्ग झालेला असण्याची शक्यता दिसून येतेय.
एकीकडे गणेशोत्सव, मुंज, वैदिक पद्धतीनं लग्न तर दुसरीकडे ‘थँक्स गिविंग’सारख्या अमेरिकन उत्सवाची नक्कल, यात उच्चवर्णीय अडकलेत, तर त्याचवेळी इथून गेलेल्या बहुजनांना ते वाईट वागणूक देत असल्याच्या तक्रारी पुढं येतायत.
पाचव्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाचा लेखाजोखा मांडणारा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आलाय. २०१५-१६ला झालेलं चौथं राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण ते २०१९-२१ या कालावधीत लोकसंख्या, कुटुंब कल्याण आणि आरोग्य अशा सर्व क्षेत्रात झालेल्या घडामोडींचा मागोवा या अहवालात घेतला गेलाय.
अमेरिकेत सध्या गर्भपाताबद्दलच्या बंधनांवरून वादविवाद सुरु आहेत. मोर्चे काढले जातायत. ‘माझं शरीर माझा निर्णय’, ‘आमच्यावरची बंधनं काढा’ अशा आशयाचे फलक घेऊन हजारो महिला आणि मुली वेगवेगळ्या शहरांमधून निदर्शनं करतायत. अमेरिकेत व्यक्तिस्वातंत्र्याला महत्त्व दिलं जात असलं तरी सरसकट गर्भपात केला जात नाही. उलट याबद्दल कायदे कडकच आहेत.
जपानच्या टोकियोत नुकतीच क्वाड देशांची तिसरी परिषद झाली. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी १२ आशियाई देशांसोबत 'इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क' नावाच्या व्यापारी कराराची घोषणा केलीय. स्वच्छ ऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान, पायाभूत सुविधांवर काम करणारा हा करार असल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. पण आशियाई देशांच्या आडून चीनला एकटं पाडायचा हा प्रयत्न असल्याची जोरदार चर्चा होतेय.
भारतीय खेळाडूंनी अनेक धक्कादायक निकाल नोंदवत थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत बॅडमिंटन क्षेत्रातल्या सर्वच मातब्बर टीमचा समावेश होता. पण भारतीय टीमने त्या सर्वांना मात दिली. भारतीय पुरुष टीमची कामगिरी ही भावी ऑलिम्पिक सुवर्णपदकाच्या दिशेनं वाटचाल आहे. बॅडमिंटनपटूंसाठीच नाही, तर प्रत्येक क्रीडा प्रकारातल्या खेळांडूसाठी ही घटना प्रोत्साहन देणारी आहे.
हॉलीवूडच्या काही सिनेमांमधला नायक इतर ग्रहांवर जाऊन शेती करून उदरनिर्वाह करताना दाखवला गेला आहे. पण हे वास्तवात कधी येईल का? असा प्रश्न होता. आता चंद्रावर शेती करण्याच्या दृष्टीने एक छोटंसं पाऊल टाकत चंद्राच्या मातीत एक वनस्पती वाढवण्यात शास्त्रज्ञांना यश आलंय. ही माती नासा या अमेरिकी अंतराळ संस्थेच्या ‘अपोलो’ मोहिमेदरम्यान पृथ्वीवर आणण्यात आली होती.