साठीच्या दशकात ग्रामपंचायत निवडणुकांत हिंदुत्व परिघावर होतं. यावेळी झालेल्या निवडणुकांमधेही तेच दिसलं. गावागावांत आणि वाडी वस्तीवर हिंदुत्व हाच मुद्दा आधीपेक्षा कितीतरी जास्त प्रकर्षाने ऐरणीवर आला. ग्रामपंचायतीला राजकीय पक्षांच्या छताखाली आणण्याचे कित्येक वर्षांपासून चालू असलेले प्रयत्न यावेळी सफल झाले. इलेक्ट्रॉनिक साधनांमुळे ही क्रांती झालली दिसते.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग दाखल झालाय. ६ जानेवारीला अमेरिकेच्या संसदेवर झालेल्या हल्ल्यांसाठी त्यांना जबाबदार धरलं गेलंय. दोन वेळा महाभियोग दाखल होणारे ते पहिलेच राष्ट्राध्यक्ष आहेत. २० जानेवारीला त्यांची राष्ट्राध्यक्ष पदाची कारकीर्द संपली. आता त्यांच्या राजकीय कारकिर्दीलाच पूर्णविराम मिळण्याची शक्यता दिसू लागलीय.
हत्तींच्या भांडणात रान उद्ध्वस्त व्हावं तशी परिस्थिती सध्या पाकिस्तानची झालीय. राजकीय पक्षांमधली चढाओढ वाढतेय. चीन वगळून इतर आंतराष्ट्रीय संस्थांनी पाकिस्तानची आर्थिक रसद बंद केलीय. लष्कराची सत्तेवर पकड आहे. त्यामुळे भारताची भीती दाखवून लष्कर एकीकडे देशाची संपत्ती लुटतंय. तर दुसरीकडे सर्व राजकारणी आपली घरं भरतायत. अशा स्थितीत तिथल्या गरीब जनतेला कुणीही वाली उरलेला नाही.
अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडेन उद्या २० जानेवारीला शपथ घेतील. त्यांच्यापुढं जहाल राष्ट्रवादाला आवर घालण्याचं, राजकीय प्रक्रियेबाबत अमेरिकी नागरिकांमधे पुन्हा विश्वास निर्माण करण्याचं आणि देशाच्या आर्थिक विकासाचा गाडा लवकरात लवकर रुळावर आणण्याचं आव्हान आहे. बायडेन यांच्या वाटेवर आधीच काटे पेरले गेलेत. त्यातून मार्ग काढत बायडेन यांना अमेरिकेला सावरावं लागेल.
आपल्या डीएनएत मराठीपण घेऊन मिरवणारी शिवसेना आता मुंबईतल्या गुजराती समाजावर राजकीय जाळं टाकतेय. पुढच्या वर्षी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ‘जलेबी अने फाफडा अने उद्धव ठाकरे आपडा’ अशी साद घातली जातेय. यामागचं कारण म्हणजे गुजराती समाजाचा मुंबईत वाढत असलेला प्रभाव. भाजपबरोबर युती तुटल्यापासून महानगरपालिकेतल्या जागा जिंकण्यासाठी लागणाऱ्या मतांची रुखरुख नक्कीच शिवसेनेला लागून राहिलीय.