पत्रकार निधी राजदान यांनी हार्वर्ड युनिवर्सिटीतून प्रोफेसरपदाची ऑफर आल्याचं ट्वीट टाकलं होतं. त्यासाठी त्यांनी एनडीटीवीतली नोकरी सोडली होती. पण त्या स्वतः सायबर फसवेगिरीच्या शिकार ठरल्या असल्याचं स्पष्ट झालंय. या सगळ्या प्रकारामुळे सायबर सेफ्टीचा मुद्दा चर्चेत आलाय. आपल्या भावनांचा मागोवा घेऊन आपल्याला फसवणाऱ्यांपासून नेमकी काय सावधगिरी बागळायची हे सांगणाऱ्या पत्रकार मुक्ता चैतन्य यांच्या फेसबुक पोस्टचा हा संपादित भाग.
इफ्फी हा गोव्यात होणारा आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सव. यातला एक सिनेमा पाहिला तरी हजार पानांचं पुस्तक वाचल्याचा अनुभव येईल इतका दर्जेदार असतो. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या या महोत्सवाची सुरवात यंदा कोरोनामुळे १६ जानेवारीपासून झालीय. प्रत्यक्ष आणि ऑनलाईन असं त्याचं हायब्रीड स्वरूप असणार आहे. यानिमित्ताने गेल्या काही वर्षातल्या महोत्सवातल्या आठवणी ताज्या करायला हव्यात.
‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि ‘आई कुठे काय करते’ या तशा एकाच विषयावरच्या मालिका. नवरा आपल्या साध्या बायकोला सोडून मॉडर्न, स्मार्ट मुलीच्या प्रेमात पडतो आणि त्यामुळे गृहिणीत कसा बदल होतो हेच राधिका आणि अरुंधतीच्याही गोष्टीतून दिसतं. पण तरीही राधिकापेक्षा अरुंधती वेगळी आहे. तिचं हे वेगळेपण समाजात बाईविषयी नेमके काय समज असतात याची अनेक गुपितं उघड करणारं आहे. म्हणूनच आपणही ते समजून घ्यायला हवं.
घोडा हा उमदा प्राणी. फक्त खिंड लढवणारे लढवय्येच त्यांच्या घोड्याचे लाड करतात असं नाही. वेगवेगळ्या जातीतली, धर्मातली आणि स्तरावरची माणसंही आपापल्या परीने घोडा पोसत असतात. या सगळ्याचं घोड्यांशी असणारं नातं सांगणारं, घोड्याचं अर्थकारण सांगणारं ज्येष्ठ लेखक महावीर जोंधळे यांचं पुस्तक लवकरच बाजारात येतंय. या आगामी पुस्तकातला राजस्थानातल्या पुष्कर गावातल्या घोड्यांच्या प्रदर्शनाच्या आठवणी सांगणारा काही भाग इथं देत आहोत.
७० वर्षांत ऑस्ट्रेलियातली टेस्ट सिरीज जिंकणारा विराट कोहली हा पहिला आणि एकमेव भारतीय कॅप्टन. यंदा मात्र कोहलीला अॅडलेडच्या टेस्टमधे अपयशी सलामीला सामोरं जावं लागलं. भारतीय टीमची वाताहत झाली. अवघ्या ३६ धावातच भारतीय टीम गारद झाली. ८८ वर्षांच्या भारतीय टेस्ट क्रिकेट इतिहासातली भारताची ही नीचांकी धावसंख्या! त्यामुळे होईल काय तर भारतीय क्रिकेटला अव्वल क्रमांकावर नेणार्या कॅप्टन विराट कोहलीच्या माथ्यावर मात्र ‘३६’चा शिक्का कायम बसेल.
उगवत्या वर्षात सगळ्यात जास्त गरज कशाची असेल, तर संयमाची आणि सुजाणपणाची. आपली मनं भक्कम हवीत! आणि त्यासाठी मनात एक विश्वास हवा, प्रेमाची चार माणसं हवीत, आर्थिक नियोजन हवं आणि न हरण्याची वृत्ती हवी! कोल्हापूरच्या आखाड्यातल्या मल्लाकडे असते तशी! ती फायटर स्पिरिट महत्त्वाची आहे फार.
एखाद्या भितीदायक स्वप्नाप्रमाणे २०२० हे वर्ष पार पडलं. आता या वर्षाच्या शेवटाकडे आपण आलोय. नवं वर्षं कोरोनाला संपवेल, असे अंदाज बांधले जातायत. पण हे वर्ष फक्त कोरोनाच नाही तर राजकारण आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही नवी नांदी घेऊन येऊ शकतं. त्यामुळे सरत्या वर्षीच्या जखमांवर मलम लावलं जाईल.
२०२४ ला फ्रान्समधे होणाऱ्या ऑलिंपिकमधे ब्रेकडान्स या खेळाचा समावेश करण्यात आलाय. १९७० च्या दशकात अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात याची सुरवात झाली होती. आज जगावर प्रभाव टाकणाऱ्या या डान्स प्रकाराला तेव्हा मात्र अजिबात मान्यता नव्हती. कारण हा डान्स आणि त्याचं हिप हॉप कल्चर शोधणारी तरूणाई कृष्णवर्णीय होती. अमेरिकेच्या आर्थिक हलाखीमुळं मनातून तुटलेल्या तरूणाईनं आपल्या अभिव्यक्तीचं शोधलेलं हे अनोखं माध्यम होतं.
२५ आणि २६ डिसेंबर २०२० ला सह्याद्री साहित्य, कला आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने अखिल भारतीय कविता महोत्सव ऑनलाईन होत आहे. ज्येष्ठ हिंदी कवी विजयकुमार यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होईल. भारतातले महत्त्वाचे कवी आणि अभ्यासक या महोत्सवात सहभागी असतील. यंदा महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून कवी, अनुवादक गणेश विसपुते यांची निवड करण्यात आलीय. या कार्यक्रमातलं त्यांचं हे अध्यक्षीय भाषण.
कोरोनासारख्या साथरोगाच्या काळात एखाद्या चांगल्या डॉक्टरचा सल्ला आपल्याला सतत लागत असतो. पण हा चांगला डॉक्टर नेमका राहतो कुठे ते काही आपल्याला कळत नाही. भरपूर डिग्र्या असणारा, गाडी वगैरे असणारा, स्मार्ट डॉक्टर चांगला असा गैरसमज अनेकांना असतो. त्यामुळेच एखाद्या चांगल्या डॉक्टरचा पत्ता शोधायचा तर त्याच्या आसपासच्या लोकांना आणि त्या डॉक्टरला कोणते प्रश्न विचारायचे ते ठरवावं लागेल.